कुलगुरू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल - Marathi News 24taas.com

कुलगुरू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना हटवण्यासाठी युवा सेना आक्रमक झाली आहे. कुलगुरूंना पदावरुन हटवावं या मागणीसाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा राज्यपालांची भेट घेतली.
 
दरम्यान  वेळुकर आणि नारायण राणे यांच्या भेटीवरुनही आदित्य ठाकरे यांनी राणेंवर  टीका केली आहे. विद्यापीठातील घोटाळे आणि परीक्षेतील घोटाळयांना राणेंचं पाठबळ आहे का असा सवाल त्यांनी केलाय. राणे-कुलुगुरू भेटीमुळं विद्यार्थ्यांसोबत कोण आणि विरोधात कोण याचा पर्दाफाश झाल्याची टीकाही आदित्य यांनी केलीय. कुलगुरूंशी वैयक्तिक शत्रुत्व नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढत असल्याचं आदित्य यांनी म्हटलंय.
 
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांच्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीय. कुलगुरू प्रकरणाची योग्य स्तरावर चर्चा सुरू असून त्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रीच माहिती देतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.काही दिवसांपूर्वी राज्यपाल शंकरनारायण यांनी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांना बोलावून मुंबई विद्यापिठातील कारभाराबाबत माहिती घेतली होती. त्यामुळे कुलगुरू प्रकरणावर तेच माहिती देतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

First Published: Thursday, April 5, 2012, 19:10


comments powered by Disqus