SIES कॉलेजमध्ये रॅगिंग - Marathi News 24taas.com

SIES कॉलेजमध्ये रॅगिंग

झी २४ तास वेब टीम, नवी मुंबई
 
नवी मुंबईच्या SIES कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्याचं उघड झालं. कॉलेज प्रशासनानं याबाबत जास्त बोलण्यास नकार दिला. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांना शोधून कारवाई करणार असल्याचं म्हटलं. नवी मुंबईच्या SIES कॉलेजमध्ये बीएससीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीवर रॅगिंग झाल्याचं उघड झालं.
 
तिला कॉलेजमधल्या मुलांनी कॉरिडॉरमध्ये रॅगिंग करत उठाबशा काढायला सांगितल्या तसंच मिरची खायला सांगितलं. यावेळी कॉलेजमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी गेले होते. असता हा प्रकार उघडकीस आला.
 
कॉलेज प्रशासन याबद्दल जास्त बोलण्यास तयार नाही, पण कारवाई करणार असल्याची भूमिका कॉलेज प्रशासनानं घेतली. रॅगिंगप्रकरणी पालकांनी तसंच कॉलेजनं तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, याबाबत कॉलेज प्रशासनानं दखल घेतली नाही तर पोलिसांत तक्रार करण्यात येणार असल्याचं आरोग्य सभापतीतर्फे सांगण्यात आलं.

First Published: Tuesday, November 29, 2011, 05:59


comments powered by Disqus