पुण्याची आरोग्यदायी हवा पार बिघडलीय , air pollution in Pune

पुण्याची आल्हाददायी आरोग्यवर्धक हवा बिघडलेय

पुण्याची आल्हाददायी आरोग्यवर्धक हवा बिघडलेय
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

कधीकाळी आरोग्यदायी असलेली पुण्याची हवा आता पार बिघडलीय. शहरातील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलीय. आयआयटीएम संस्थेनं राबवलेल्या हवा तपासणी प्रकल्पातून धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. ही हवा आता आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

पुण्याची हवा स्वच्छ, सुंदर आणि आल्हाददायी आहे, हे विधान आता भूतकाळ ठरणार आहे. पुण्याच्या कुठल्याच भागातील हवा आता शुद्ध राहिलेली नाही. त्यामुळे ती आरोग्यास हानीकारक ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. इंडियन इंस्तीत्युत ऑफ ट्रोपीकल मिटीरोलॉजि संस्थेनं पुण्यातील हवा तपासण्याचा प्रकल्प हाती घेतला होता.

सफर म्हणजेच सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग एंड रिसर्च या प्रणालीमार्फत वर्षभरातील प्रदूषणाबाबतचे निष्कर्ष नोंदवले गेले. ६० मायक्रोन प्रति घन मीटरपेक्षा जास्त अतिसूक्ष्म कण नसलेल्या हवेला शुद्ध हवा म्हटलं जातं. पुण्याच्या कुठल्याच भागात अशी शुद्ध हवा नसल्याचं या निष्कर्षांतून स्पष्ट झालय.

पुण्यातील पाषाण, शिवाजीनगर , लोहगाव, आळंदी , कात्रज , हडपसर , भोसरी , निगडी आणि मांजरी या १० ठिकाणच्या प्रदूषणाची पातळी या प्रकल्पाद्वारे तपासण्यात आली. त्यानुसार हडपसरमध्ये सर्वाधिक प्रदूषण नोंदवलं गेलय.

मांजरी आणि निगडीतील हवा तुलनेनं बरी आहे. वाहनांची वाढती संख्या तसेच औद्योगीकरणामुळे शहरातील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. थोडक्यात काय तर पुणे शहराचच आरोग्य धोक्यात आलय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 20:25


comments powered by Disqus