गंगेत थुंकलात तर तीन दिवसांचा तुरुंगवास?

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 17:34

गंगा स्वच्छतेसाठी केंद्र सरकारनं कंबर कसलीय. गंगेमध्ये प्रदूषण करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची तरतूद असलेला कायदा लवकरच होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीत थुंकल्यास देखील मोठा दंड होऊ शकतो.

पुण्याची आल्हाददायी आरोग्यवर्धक हवा बिघडलेय

Last Updated: Friday, May 9, 2014, 21:02

कधीकाळी आरोग्यदायी असलेली पुण्याची हवा आता पार बिघडलीय. शहरातील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलीय. आयआयटीएम संस्थेनं राबवलेल्या हवा तपासणी प्रकल्पातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत.

जपाननं नाकारला रत्नागिरीचा हापूस!

Last Updated: Friday, March 14, 2014, 09:03

कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय.

`पंचगंगा` प्रदूषणाला साखर कारखाने जबाबदार, बंदची नोटीस

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 18:29

पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.

पंचगंगेत मैला, कोल्हापूर पालिका आयुक्तांनाच कारणे दाखवा नोटीस

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 21:47

पंचगंगा नदीत मैला सोडण्याचं काम कोल्हापूर प्रशासनाकडून सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. त्याचबरोबर महापालिका प्रशासन अनेकवेळा दिलेली आश्वासनं का पाळली नाहीत, याचा खुलासाही येत्या सात दिवसात करावा असे आदेशही या नोटीशीत देण्यात आलेत.

भारतीयांची फुफ्फुसं अकार्यक्षम!

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 10:58

भारतीयांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता ही युरोपियन नागरिकांच्या फुफुसांच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी असल्याचं नुकतंच एका अभ्यासात निष्पन्न झालंय. केवळ एवढंच नाही तर जगभरातील १७ देशांतील नागरिकांच्या फुफ्फुसांच्या तुलनेत भारतीयांची फुफ्फुसं ही सर्वाधिक अकार्यक्षम असल्याचं धक्कादायक वास्तव एका कॅनेडियन सर्वेक्षणात पुढं आलंय.

प्रदूषणानं पंचगंगेचं पावित्र्य नष्ट!

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 12:13

कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न काही मिटताना दिसत नाहीय. शहरातल्या जयंती नाल्याचं पाणी आता थेट पंचगंगा नदीत मिसळतंय. त्यामुळे पुन्हा एकदा नदी काठच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे

घंटागाडी पडली मागे, आता `रोबोटिक मशीन्स`चा घाट!

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 09:35

गेले कित्येक महिने प्रदूषणात अडकलेली गोदावरी आता कुठे मोकळा श्वास घेतेय आणि हे शक्य झालं महापालिकेच्याच पाण्यावरची घंटागाडी या प्रकल्पातून... त्याचं यश दिसत असतानाच महापालिकेनं नवा घाट घातलाय रोबोटिक मशीन्स खरेदीचा...

आता शुद्ध हवा मिळणार ‘डबाबंद’

Last Updated: Thursday, January 31, 2013, 11:52

ग्लोबल वार्मिंगची समस्या जगाला भेडसावत आहे. प्रदूषणाचा प्रश्न सर्वांनाच ग्रासतो आहे. आता तर चीनमध्ये शुद्ध हवा देण्याचा उपक्रम हाती घेतला गेला आहे.

राज्यातील आठ नद्या प्रदूषित

Last Updated: Monday, October 29, 2012, 21:36

पिंपरी-चिंचवडमधील पवना, इंद्रायणी आणि पुण्यातील मुळा, मुठा या नद्यांची गणना देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं अर्थात सीपीसीबीन नुकत्याच तयार केलेल्या अहवालात देशातील सर्वाधिक ३६ प्रदूषित नद्यांत राज्यातील आठ नद्यांचा समावेश आहे. पालिका प्रदूषण रोखण्यासाठी काय करतेय असा सवाल उपस्थित केला जातोय.

वाघाची डरकाळी ५० डेसिबल्सपेक्षा जास्तच

Last Updated: Friday, October 26, 2012, 11:14

शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन झालंय. कोर्टानं ५० डेसिबलची मर्यादा घालून दिली असताना प्रत्यक्षात ६५ डेसिबल ते १०५ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद झाली आहे. त्यामुळं मेळाव्याचे आयोजक सदा सरवणकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

गोदावरीला नवं संरक्षण, पण थांबणार कधी प्रदूषण?

Last Updated: Friday, July 27, 2012, 23:57

गोदावरीचं रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे खाजगी सुरक्षारक्षकांच्या हातीच गोदामाईची सुरक्षा सोपवली जाईल, असा संशय व्यक्त होतोय. पण या सगळ्या गदारोळात गोदावरीच्या प्रदुषणाचा मुद्दा मात्र बाजूलाच राहतोय.

पुन्हा दिसणार 'महाशीर' !

Last Updated: Sunday, November 6, 2011, 06:33

एकेकाळी पुणे जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदीत आढळणारा महाशीर मासा १९८२ मध्ये नामशेष झाला. मात्र तळेगावच्या 'फ्रेन्डस् ऑफ नेचर' आणि केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी हा मासा परत इंद्रायणीमध्ये पहायला मिळणार आहे.

मनसेचा महाआरतीद्वारे पोलिस कारवाईचा निषेध

Last Updated: Sunday, October 2, 2011, 13:04

पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांवर केलेल्या या कारवाईच्या विरोधात राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाआरती करुन पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.