Last Updated: Thursday, March 28, 2013, 13:36
www.24taas.com, सिडनी अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाला काही तासांवर येऊन ठेपलंय. संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून आयोजकांची धावपळ, कलाकारांची आतुरता आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
ऑस्ट्रेलियात न्यू साऊथ वेल्स भागातील सिडनी या शहरात २९ ते ३१ मार्च दरम्यान हे संमेलन होणार आहे. संमेलनासाठी भारतामधून अनेक मान्यवर पाहुणे दाखल झालेत. अभिनेते प्रशांत दामले बुधवारीच सिडनीमध्ये दाखल झालेत.
अभिनेत्री मुक्ता बर्वे, गायक स्वप्निल बांदोडकर तसंच कवी रामदास फुटाणे संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
First Published: Thursday, March 28, 2013, 13:34