पुण्यात सायबर रॅकेटचा पर्दाफाश, ५६ लाखांचा गंडा, cyber racket in pune

पुण्यात सायबर रॅकेटचा पर्दाफाश, ५६ लाखांचा गंडा

पुण्यात सायबर रॅकेटचा पर्दाफाश, ५६ लाखांचा गंडा
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका मोठ्या सायबर गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोठी रक्कम जिंकल्याचा ई मेल पाठवून लोकांना फसवणा-या एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड मधल्या एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतलयं. त्यान पिंपरी चिंचवड मधल्या एका नागरिकाला तब्बल ५६ लाखांचा गंडा घातल्याचं उघड झाले आहे.

पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही अनेकजण खोट्या ई-मेल आणि एसएमएसला बळी पडतात. असाच एक धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघड झालाय. पिंपरी चिंचवडमधल्या दिलीप मधुकर पाटील या व्यक्तीला असाच खोटा मेल पाठवून घाना देशातल्या एका भामट्यान तब्बल ५६ लाख ८० हजार रुपयांना गंडा घातला.

या संदर्भात पाटील यांनी पोलिसांकड तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सापळ रचून अटक केली. जेफ डेरेक अलेक्झान्डर असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्या इतर साथीदारांसह विविध कम्पन्यांची नाव सांगत लॉटरीसाठी निवड झाल्याचं ई मेलद्वारे सांगून तो सावज जाळ्यात ओढत असे. मात्र चिंचवड पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केलाय.

जेफ आणि त्याच्या साथीदारांनी पाटील यांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे टाकण्यास सांगितलं होत. त्यामुळ जेफ बरोबरमोठी टोळी काम करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मुंबई आणि उपनगरात त्याचे साथीदार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आलीयेत.

सायबर क्राईम उघड करणं तसं मोठं जिकीरीचं काम एमआयडी सी पोलिसांनी एका मोठ्या खुबीनं या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. मात्र यामुळं अशा प्रकारच्या गुन्ह्यांची मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 31, 2013, 12:11


comments powered by Disqus