टरबुजांमुळे 2.5 लाखांचं उत्पन्न, earned 2.5 lacs through water melon

टरबुजांमधून२.५ लाखांचं उत्पन्न

टरबुजांमधून२.५ लाखांचं उत्पन्न
www.24taas.com

बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल शिंदे या शेतक-यानं एका एकरावर टरबूजची लागवड केली. सध्या बाजारात टरबूज नसल्याने त्यांच्या टरबूजांना चांगला भाव मिळून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या मंगरूळ येथील युवा शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी कमाल केली आहे.. शेतीत नावीन्याच ध्यास आणि प्रयोगशील वृत्ती असल्याकारणाने त्यांनी आजवर विक्रमी उत्पादन घेतलंय. येत्या हंगामात त्यांनी सिंजेंटाचं शुगर क्विन टरबूजाची एक एकरावर लागवड केली.याकरिता त्यांनी अगोदर जमिनीची नागाती करून बेड तयार केले. नंतर सरीरेझरच्या साह्याने दोन सारीमधील अंतर ६ फुट ठेवले. त्यात दोन ट्राली शेणखत, ४ थैल्या डी.ए.पी., २ थैल्या सुपर फॉस्फेट, १ थैली पोटाश, ५३ किलो मायाक्रोन्युट्रियन्ट्स, टाकून बेड तयार केले. बेडवर ड्रीप करून त्यावर ३५ मायक्रोनचा मल्चिंग पेपर टाकला आणि १ जून रोजी रोपाची लागवड केली. त्यानंतर ड्रीप मधून १९ १९ १९, १२ ६१ ०, ० ५२ ३४ नंतर ० ० ५० अशाप्रकारचे वाटर सोलुबल दिलेत. तसेच चार चार दिवसांनी बुरशीनाशक दिलेत.

शास्त्रोक्त पद्धीतने उत्पादन घेतांना त्यांनी अवघ्या ८० दिवसात टरबुजाचं पिक आणलं.एकरात त्यांना २० टनापर्यंत माल होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत ठिबक करिता ३० हजार रुपये, बियाणे,मल्चिंग पेपर,मजूरी,रासायनिक खत आणि औषधांकरिता एकूण ६५ ते ७० हजार रुपये खर्च आला आहे.

आज रोजी बाजारात टरबूज मिळत नसल्याने त्यांना कमीत कमी १५०० रुपये टनाचा भाव मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच त्यांना खर्च वजा जाता अडीज लाख रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे.

यानंतर ते याच ठिकाणी पुन्हा दोन वेळा टरबूजाची लागवड घेण्यात येणार आहे. त्यामुळे मल्चिंग पेपर, ठिबक आणि मशागतीचा एकूण ४५ ते ५० हजार रुपये खर्च वाचणार आहे. पिकाचं शास्त्रोक्त अभ्य़ास करुन एकाच ठिकाणी पुन्हा तेच पिक घेण्याचं धाडस दाखवणा-या विठ्ठलाचा आदर्श घ्यायलाच हवा.

First Published: Wednesday, August 29, 2012, 13:23


comments powered by Disqus