मिळवा तुमच्या मनासारखी नोकरी..., get job how u want...

मिळवा तुमच्या मनासारखी नोकरी...

मिळवा तुमच्या मनासारखी नोकरी...
www.24taas.com, मुंबई

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, हरएक प्रयत्न करून झाला असेल, तरीही मनासारखी नोकरी मिळाली नसेल तर फारशी काळजी करण्याची गरज नाही. तंत्र-विज्ञानाच्या साहाय्यानं तुम्ही तुमची ही अडचण दूर करू शकता...

नोकरी नसणाऱ्या व्यक्तीला समजात, घरात कुठेही मन-सन्मान मिळत नाही. तुम्हीही नोकरीच्या शोधत असाल आणि खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल तर निराश होण्याची काहीच गरज नाही. काही सोपे तांत्रिक उपाय करून तुम्ही रोजगार प्राप्त करू शकता.

 शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन सव्वा किलो बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि मंदिरात बसून लाल चंदनाच्या माळेने खालील मंत्राचा १०८ वेळेस जप करावा.
कवन सो काज कठिन जग माही। जो नहीं होय तात तुम पाहिं।।
त्यानंतर ४० दिवस दररोज आपल्या घरी या मंत्राचा १०८ वेळेस जप करावा. ४० दिवसांच्या आत तुम्हाला रोजगार मिळेल.

 शनी अमावास्येच्या दिवशी एक इडलींबू घेऊन संध्याकाळी त्याचे चार तुकडे करा आणि चारही दिशांना ते तुकडे फेकून द्या. याच्या प्रभावाने तुमची रोजगाराची समस्या दूर होण्यास मदत होईल.

 मंगळवारपासून दररोज सकाळी ४० दिवस अनवाणी पायाने हनुमानाच्या मंदिरात जा आणि लाल गुलाबाचे फुल अर्पण करा. असे केल्यास लवकर नोकरी मिळण्याचे योग जुळून येतील.

 इंटरव्यूला जाण्याच्या अगोदर लाल चंदनाच्या माळेने खालील मंत्राचा ११ वेळेस जप करा.
मंत्र : ऊँ वक्रतुण्डाय हुं
जप करण्यापूर्वी गणपतीची पूजा करा तसेच अथर्वशिर्षाचे पाठ करत दुधाचा अभिषेक करा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


First Published: Tuesday, May 14, 2013, 07:58


comments powered by Disqus