Last Updated: Wednesday, May 22, 2013, 07:21
www.24taas.comसुरी, कात्री व काटा चमचा आदी वस्तू विषारी बाणाचे काम करतात. या वस्तुंचा टोकदार, धारदार भाग सरळ सरळ कोणाही व्यक्तीच्या दिशेने केल्यास, तो अत्यंत वाईट उर्जांचे निर्माण करतात. त्यामुळे टोकदार व धारदार वस्तू कधीही आपल्याकडे किंवा दुसर्याकडे सरळ दिशेने दाखवू नये.
तसेच कधी कोणत्या व्यक्तीला भेटवस्तू द्यायची झाल्यास एक ही गोष्ट लक्षात घ्या की, अत्यंत धारदार वस्तू कोणालाही भेट म्हणून देऊ नये. धारदार वस्तू या शत्रुत्त्वाची शक्ती निर्माण करतात. निर्माण होणारी शक्ती दोन मित्रामध्ये संघर्ष निर्माण करू शकते.
विपरित परिणाम म्हणजे त्यांची मैत्री संपुष्टात येऊ शकते. स्नेह संबंधामधील कढुता टाळण्याकरता अत्यंत धारदार आणि टोकदार वस्तू आपल्या जवळपासही ठेवू नये.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, May 22, 2013, 07:19