Last Updated: Sunday, May 12, 2013, 18:20
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकिशोरवस्था, शाळेतली भांडणं, शाळेतलं पहिलं प्रेम, जाडेपणा यासंगळ्याचा गॉसिप मसाला म्हणजे गिप्पी.एखाद्या किशोरवयीन मुलीच्या शालेय जीवन, तिचा मस्तीखोरपणा, तिच्यातील अल्लडपणाचे चित्रीकरण या सिनेमामधून करण्यात आले आहे.
गुरप्रीत कौर म्हणजे गिप्पी एक १४ वर्षीय मुलगी शिमल्यामधील शाळेत शिकत असते जिच्या सोबत असते तिची एकुलती एक मैत्रीण आंचल ( दुर्वा त्रिपाठी). वयानुसार तिच्या मानसिक आणि शारीरिक रूपात बदल होत असतात. अर्थात या बदलांना सामोरी जाताना तिची आई (दिव्या दत्ता) हिचाही पांठीबा मिळतो. जेव्हा गिप्पीला वाटायला लागतं की ती मोठी झाली आहे तेव्हा तिला तिच्या शाळेतला मुलगा अर्जुन (ताहा शहा) आवडायला लागतो. मग हळू-हळू तिच्या आयुष्यात एक एक प्रसंग येत जातात त्यातून ती शहाणी होते.
रिया विज हिचा अभिनय चांगला आहे. इतर कलाकारांचीही तिला चांगली साथ लाभली आहे. मात्र करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’चीच ही टिन एज कॉपी आहे. हा सिनेमा तितकासा इंटरेस्टिंग वाटत नाही. यात शालेय जीवनातील प्रेम, भांडणं, शाळेतील निवडणूका, वयात येत असताना उभे राहाणारे प्रश्न इत्यादी गोष्टींचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र तरीही हा सिनेमा पाहाताना मजा येत नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, May 12, 2013, 18:20