IPLचा तमाशा IPL

IPLचा तमाशा

IPLचा तमाशा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारा सिंगला अटक झाली आणि फिक्सिंगचं बॉलीवूड कनेक्शन उघड झालं..पण हे सारं फिक्स प्रकरण केवळ आयपीएल सिंक्स पुरतं मर्यादित नाहीय तर, विंदू हा गेल्या तीन वर्षांपासून क्रिकेटवर सट्टा लावत असल्याचं तपासात उघड झालंय..


फिक्सिंगचं बॉलीवूड कनेक्शन !

विंदू दारा सिंग जेरबंद !

बॉलीवूडमधील आणखी काही नावं चर्चेत !

कोण आहेत ते बॉलीवूडमधील फिक्सर ?

आणखी कितीजण अडकणार फिक्सिंगच्या जाळ्यात ?


आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणात क्रिकेटर श्रीशांतच्या अटकेनंतर बॉ़लीवूडचं कनेक्शनं उघड झालंय...विंदूच्या अटकमुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडालीय...राजस्थानमधून अटक कऱण्यात आलेला सट्टेबाज रमेश व्यासच्या चौकशीत विंदू दारा सिंगचं नाव समोर आलं..रमेश व्यासशी विंदूची मैत्री असल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी विंदूकडं चौकशी केली आणि त्यांनंतर त्याला अटक करण्यात आली..

फिक्सिंगप्रकरणात केवळ बॉ़लीवूडचं कनेक्शन उघड झालं असं नाही तर हवाला कनकेक्शनही समोर आलंय..मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नुकतेच हवाल एजन्ट अल्पेश याला अटक केलीय..अल्पेशकडून पोलिसांनी एक कोटी २८ लाखांची रोकड जप्त केलीय..या प्रकरणात आणखी एकाला अटक केली असून असून प्रेम तनेजा असं त्याचं नाव आहे...

विंदूला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या आयपीएलमधील उपस्थिती बाबात चर्चा सुरु झालीय..आयपीएलच्या मॅचेस दरम्यान विंदू स्टेडियममध्ये केवळ उपस्थितच होता असं नाही तर तो चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महिंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी हिच्या शेजारी बसून टीमला प्रोत्साहन देत असल्याचं पहायला मिळालं..मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्पॉट फिक्सिंगप्रकरण उघडकीस येण्याआगोदर विंदू हा सट्टेबाजांच्या संपर्कात होता..विंदूच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली पोलीस सूत्रांनी वर्तवलीय...फिक्सिंगप्रकरणी विंदूच्या अटकेमुळे बॉ़लीवूडमध्ये भूकंप आला असून या प्रकरणात आणखी काही बॉलीवूड कलाकारांच्या नावाची चर्चा आहे....
विंदू दारा सिंगच्या अटकमुळे चेन्नई सुपर किंग्ज यांचा कॅप्टन महिंद्र सिंग धोनीची पत्नी वादाच्या भोव-यात अडकण्याची शक्यता निर्माण झालीय..कारण मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या दरम्यान चेन्नईत झालेल्या आयपीएल मॅचच्यावेळी विंदू हा धोनीच्या पत्नी शेजारी बसला होता..त्याने साक्षी धोनीशी ओळख असल्याचं सांगितलय...
तारीख

६ एप्रिल २०१३



ठिकाण

एम.चिदंबरम स्टेडियम, चेन्नई



सामना

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज


हे दृश्य मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या दरम्यान चेन्नईत झालेल्या आयपीएल मॅचची आहेत..फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारा सिंग याला अटक करण्यात आल्यानंतर ही दृश्य चर्चेत आली..या दृश्यात चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महिंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी आणि अभिनेता विंदू दिसत आहेत...या प्रकरणात आता साक्षीची चौकशी होणार असल्याचं बोललं जातंय..


साक्षीची होणार चौकशी ?

साक्षी शेजारी बसला होता विंदू

ही दृश्य पुन्हाएकदा पहा..फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आलेला विंदू दारा सिंग हा धोनीची पत्नी साक्षी हिच्या शेजारी बसला होता...या सामन्यासाठी विंदूला चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मयप्पन याने आमंत्रीत केल्याचं तपासात उघड झालंय.....विशेष म्हणजे गुरुनाथ मयप्पन हा बीबीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई आहे...या प्रकरणात आता चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मयप्पनचीहीमुंबई पोलीस चौकशी करणार आहेत.. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विंदूची साक्षीशी ओळख असून त्यामुळेच या मॅच दरम्यान तो साक्षी शेजारी बसला होता...विंदू हा सेलिब्रिटि असल्यामुळे त्याला आयपीएल मॅच दरम्यान व्हीआयपी गॅलरीत सहज प्रवेश मिळत असे तसेच त्याचे सट्टेबाजांशी घनिष्ठ संबध असल्यामुळे त्याने मॅच संबंधीची माहिती सट्टेबाजांना पुवल्याचा पोलीस सूत्रांना संशय आहे....मुंबई पोलीस विंदूकडं या प्रकरणी कसून चौकशी त्याच्या चौकशीत आणखी काही माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्जचे मालक गुरुनाथ मयप्पन यांची चौकशी मुंबई पोलीस करणार आहेत...गुरुनाथ मयप्पन हे केवळ आयपीएल मधील एका टीमचे मालक आहेत असं नाही तर ते बीबीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई देखील आहेत..त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलंय..

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या दरम्यान चेन्नईत खेळल्या गेलेल्या या आयपीएल मॅचमधील ही दृश्य चेन्नई सुपर किंग्जचे मालक गुरुनाथ मयप्पन यांना भोवण्याची शक्यता निर्माण झालीय..फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विंदूने गुरुनाथ मयप्पनशी आपली मैत्री असल्याचं पोलिसांना सांगितलं...त्यामुळे गुरुनाथ मयप्पन चर्चेत आलेत.. चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एव्हडीच गुरुनाथ मयप्पनची ओळख आहे असं नाही तर ते भारतीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन याचे जावई आहेत..मयप्पन यांची दक्षिणेत एव्हीएम ही मनोरंजन क्षेत्रातील जूनी तसेच मोठी कंपनी आहे...गुरुनाथ हे एव्हीएम कंपनीचे संचालक आहेत..गुरुनाथ यांना गोल्फ आणि मोटर शर्यतीचा छंद आहे...त्यांनी हौशी गोल्फ स्पर्धा जिंकली होती..तसेच फॉर्म्यूला एशिया स्पर्धा पूर्ण करणा-यांमध्ये गुरुनाथ यांचा समावेश आहे.. पण आता विंदूशी असलेले त्यांची मैत्री त्यांना भोवणार तर नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात आहे...कारण दोन अडिच वर्षांपासून गुरुनाथ यांची विंदूशी मैत्री असून फिक्सिंगप्रकरणात विंदू अडकल्यामुळे गुरुनाथ यांनाही चौकशीला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण झालीय...

विंदूशी असलेल्या मैत्रीमुळे चेन्नई सुपर किंगचे मालक गुरुनाथ मयप्पन हे फिक्सिंगप्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय..मॅच पाहण्यासाठी विंदूला गुरुनाथ यांनी बोलावलं होतं....तसेच विंदूने दोन सट्टेबाजांना फरार होण्याता मदत केल्याचं पोलीस चौकशीत उघड झालंय..

बॉलीवूडचं फिक्सिंग कनेक्शन !

अभिनेता विंदूचे सट्टेबाजांशी संबंध !


आयपीएल फिक्सिंग प्रकरणी अटक कऱण्यात आलेला अभिनेता विंदू याच्या चौकशीत एकएक धक्कादायक माहिती उघड होवू लागलीय...मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्या दरम्यान विंदू हा धोनीची पत्नी साक्षी हिच्या शेजारी बसला होता..चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मयप्पन याच्याशी विंदूची मैत्री असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय...

गुरुनाथ मयप्पनशी विंदूची मैत्री !

अडची वर्षांपासून दोघांमध्ये मैत्री !

गुरुनाथमुळे विंदूची साक्षीशी ओळख !

गेल्या दोन अडीच वर्षांपासून त्यांच्यात मैत्री असून गुरुनाथनेच विंदूला मॅचसाठी बोलावलं होतं...गुरुनाथमुळेच विंदूची साक्षी धोनीशी ओळख झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय..फिक्सिंगप्रकरणी विंदूला अटक झाल्यामुळे आता गुरुनाथ मयप्पनचीही पोलीस या प्रकरणी चौकशी करणार आहेत..

मुंबई पोलिसांच्या चौकशीत विंदूने जी माहिती दिलीय ती अत्यंत धक्कादायक आहे... स्पॉट फिक्सिंग प्रकरणी संजय जयपूर आणि पवन जयपूर हे दोन सट्टेबाज फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत ..या दोघा सट्टेबाजांशी विंदूची मैत्री होती...स्पॉट फिक्सिंगप्रकरण उघड झाल्यानंतर संजय आणि पवन हे दोघे १७ मेला दिल्लीहून मुंबईला आले...मुंबईत त्यांच्यासाठी विंदूने हॉटेलचं बुकिंग केलं होतं...

सट्टेबाजांना विंदूचा आश्रय !

सट्टेबाजांसाठी विंदूनं केलं हॉटेलचं बुकिंग !

संजय आणि पवन यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यांना परदेशी धाडण्यासाठी विंदूने मदत केल्याच उघड झालंय..विंदू त्या दोघांना विमानतळावर सोडवण्यासाठी गेला होता...

सट्टेबाजांना फरार होण्यात विंदूची मदत !

सट्टेबाज संजय जयपूर, पवन जयपूर फरार!

विंदूने यंदाच्या आयपीएल मॅचेवर ४५ लाख रुपयांचा सट्टा लावला होता आणि त्यातून त्याला १७ लाख रुपय़ांचा फायदा झाल्याच पोलीस तपासात उघड झालंय...विंदूने जवळपास सर्वच मॅचवर सट्टा लावला होता..विंदूने केवळ आय़पीएलवर सट्टा लावलाय असं नाही तर २०११मध्ये झालेल्या वर्ल्डकप क्रिकेट सामान्यावर तो सट्टा खेळला होता..विशेष म्हणजे त्यावेळीही त्याने रमेश व्यास या सट्टेबाजा मार्फत सट्टा लावला होता...पोलीस विंदूकडं चौकशी करीत असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013, 00:09


comments powered by Disqus