Last Updated: Thursday, May 23, 2013, 15:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईदाऊद इब्राहीमच्या डी कंपनीने बुधवारी सायंकाळी फिक्सिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. डी कंपनीकडून छोटा शकीलने फोनवर बोलताना एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचा किंवा डी कंपनीचा संबंध नाही.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अनीस इब्राहीम, दाऊद इब्राहीम आणि माझा काही संबंध नसल्याचे छोटा शकीलने सांगितले आहे. बुकी डी कंपनीला ओळखतो थोड्या दिवसातच खरं जे आहे ते समोर येईल. या फिक्सिंग प्रकरणात छोटा राजन याचा हात असल्याचा धक्कादायक खुलासा छोटा शकीलने केला आहे.
छोटा राजन हा सर्वात मोठा बुकी आहे. विनोद चेंबर आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये त्याचा हात असल्याचे सांगितले. दाऊद हरामाचा माल नको आहे. त्यामुळे २००२ पासून फिक्सिंग करणे आम्ही सोडले आहे. असेही त्याने यावेळी सांगितले.
शारजामध्ये मॅच पाहताना त्याचे आणि दाऊदचे फोटो आहे. या बद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, शारजामधील स्टेडिअममधील बॉक्स आम्ही खरेदी केला होता. त्यामुळे त्यावेळी सामना पाहायला गेलो होतो. दाऊद, शरत शेट्टी आणि मी त्या बॉक्समध्ये बसून मॅच पाहत होतो. शारजामध्ये टीम इंडियाला डी कंपनीने काही भेट वस्तू दिल्या होत्या. तसेच इतर संघांना देखील भेट वस्तू दिल्या होत्या.
भेट वस्तू देणे काही चुकीची गोष्ट नाही, आम्ही रोख रक्कम तर दिली नव्हती. शकीलने सांगितले की, विंदू दारा सिंग आणि आमचे संबंध आहे. पण स्पॉट फिक्सिंग प्रकरणी विंदूची चौकशी झाल्यावर वास्तव समोर येईल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 23, 2013, 15:15