Last Updated: Saturday, January 11, 2014, 23:52
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादएरवी पोलीस म्हटलं की, खाकी वर्दीतला जनतेचा मित्र ही छबी डोळ्यांसमोर येते. मात्र या खाकी वर्दीतल्या माणसातही एखादा कलाकार असतोच. औरंगाबादमधले एक पोलीस काका सिनेमांसाठी लावण्या लिहीतात आणि पोलीस बँडच्या माध्यमातून कलेची जोपासनाही करतात.
सर्वसामान्यांच्या ओठांवर असलेली ही लावणी लिहीली आहे औरंगाबादच्या पोलीस आयुक्तालयातले सहाय्यक पोलीस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी. एरवी सतत कामात व्यस्त असणा-या पोलीस अधिका-यांना कलेची जोपासना करण्याची संधी मिळत नाही हे वास्तव आहे. तरी पंढरीनाथ भालेराव यांनी या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपली कला जोपासली आहे.
आत्तापर्यंत त्यांनी तब्बल १०० पेक्षा जास्त गाणी लिहीली आहेत. त्यांनी लिहीलेली बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची ही लावणी लोच्या झाला रे या मराठी चित्रपटात वापरलीय. यु ट्यूबवर या गाण्याला दीड लाखांपेक्षा जास्त हीट्स आहेत.
गाणीच नाहीत तर त्यांनी एका चित्रपटाची पटकथाही लिहीलीय. एका हिंदी सिनेमासाठी त्यांनी कव्वालीही लिहीलीय़. त्यांच्या या कलेचा त्यांच्या सहका-यांना अभिमान वाटतोय. पोलीस दलात राहूनही कला जोपासता येते, त्यावर काम करता येतं हे पंढरीनाथकाकांनी दाखवून दिलंय. दलातून निवृत्त झाल्यावर त्यांना स्वतःचा बँड सुरू करायचा आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, January 11, 2014, 20:03