सरणाची लाकडं होळीला, प्रेत जाळ्याची लाकडं विकली जातायेत...., Mumbai zee 24 taas exclusive holi fire wood

प्रेत जाळण्याची लाकडं होळीसाठी

प्रेत जाळण्याची लाकडं होळीसाठी
www.24taas.com, मुंबई

`झी २४ तास`ने होळीच्या पार्श्वभूमीवर एक पर्दाफाश केला आहे. प्रेत जाळण्यासाठी असणाऱ्या सरणावरच्या लाकडावरही डल्ला मारला जातोय. भ्रष्टाचाराची कीड चक्क स्मशानभूमीपर्यंत पोहचलीय.

मुंबई महापालिका प्रेत जाळण्यासाठीची लाकडं मोफत स्मशानभूमीमध्ये ठेवत असते. परंतु ही लाकडं तिथला ठेकेदार आणि कर्मचारी होळीसाठी विकत असल्याच्या धक्कादायक `झी २४ तास`नं उघडकीस आणला आहे. चंदनवाडी आणि दादर स्मशानभूमीत हा प्रकार सुरु आहे आणि दरवर्षी अशा प्रकारे लाकडं विकली जातात. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखाच हा सगळा प्रकार होत आहे.

मुंबई महापालिका प्रशासन याकडं कानाडोळा करत असल्याचं समोर आलंय. मुंबई शहरात अनेक मंडळं, चाळीवाले होळीला लाकडे पेटवतात. मात्र ही लाकडं चक्क स्मशानभूमीतून आणली जातात. म्हणजे प्रेत जाळण्यासाठीची लाकडं तिथलं कर्मचारी खुलेआम होळी पेटवण्यासाठी विकतायत.

First Published: Tuesday, March 26, 2013, 16:44


comments powered by Disqus