निगडीमधील आधुनिक वटसावित्री..., Nigadi in modern vatasavitri

निगडीमधील आधुनिक वटसावित्री...

निगडीमधील आधुनिक वटसावित्री...
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पिंपरी चिंचवडमधील निगडीमध्ये राहणा-या जनाबाई गोरे. जनाबाई या भागात ओळखल्या जातात त्या एक बांधकाम व्यवसायिक म्हणून. कधीही शाळेत न गेलेल्या आणि अंत्यक प्रतिकूल परिस्थिती मधून आलेल्या जनाबाईंचा सामान्य कामगार ते एक बांधकाम व्यावसायिक हा प्रवास कोणालाही थक्क करणारा असाच.

30 वर्षांपूर्वी कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या गोरे दाम्पत्यापुढे आपल्या चरितार्थासाठी मजुरी हाच एक पर्याय होता... मात्र यातून मार्ग काढत बाबासाहेब गोरे यांनी बांधकामाची लहान सहान कामं घ्यायला सुरवात केली. जनाबाईंनाही लहानपणापासून या कामाची आवड आणि अनुभव होता. त्यामुळे जनाबाईंची अगदी पुरेपुर साथ बाबासाहेबांना लाभली. त्यांच्या या मदतीमुळेच अतिशय छोट्या स्वरुपात सुरु केलेल्या या कामाचं मोठ्या व्यवसायात रुपांतर झाल्याच बाबासाहॆब गोरे सांगतात.

सिव्हिल इंजिनिरिंगचे धडे तर सोडाच पण आयुष्यात कधीही शाळेचं तोंडही न पाहिलेल्या जनाबाईंचं या व्यवसायातील ज्ञान आणि कामाचा उत्साह कुणाही तरुणाला लाजवेलं. या व्यवसायाचं कोणतंही शिक्षण घेतलेलं नसताना आपण केलेलं काम तंत्रशुध्द कसं असेल याची काळजी त्या घेतात...आपल्या पतीच्या बांधकाम व्यवसायाला हातभार लावत असतानाच गृहिणी म्हणूनही त्या कधी कमी पडल्या नाहीत. पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणा-या या व्यवसायात स्वत:चं वेगळं असं स्थान त्यांनी निर्माण केलंय.

मात्र हे करत असताना आपण अशिक्षित असल्याची खंत कुठेतरी अजूनही त्यांच्या मनात आहे...त्यामुळे या वयातही शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केलाय. केवळ धैर्य आणि जिद्दीच्या जोरावर गरिबी, निरक्षरता आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिलं जाऊ शकतं हा मंत्रच जणू जनाबाई गोरे यांनी आपल्या संघर्षातून दिलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 12, 2014, 08:06


comments powered by Disqus