Last Updated: Thursday, May 9, 2013, 23:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई२१ वर्षांपूर्वी वर्ल्डकप जिंकून जो पाकिस्तान क्रिकेटचा तारणहार बनला तो जेव्हा मंचावरुन खाली कोसळून जखमी झाला तेव्हा पाकिस्तनात एकच खळबळ उडाली..पण तो जखमी झाल्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणाला खरंच कलाटणी मिळणार आहे का ?एकेकाळचा प्लेबॉय पाकिस्तानी जनतेचं नेतृत्व करणार का त्यावर एक नजर...
त्याने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा पाकिस्तान आनंदून गेला होता...आणि आता जेव्हा तो व्यासपीठावरुन खाली कोसळला तेव्हा अवघा पाकिस्तान हळहळला.. आज प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाच्या तोंडी एकच नाव आहे आणि ते म्हणजे इमरान खान याचं...
होय.. पाकिस्तानातील निवडणुकी आधी इमरान खान व्यासपिठावरुन खाली पडून जखमी झाला..टीव्हीवरुन सगळ्या जगाने ते दृश्य बघीतलं..आणि हीच घटना आता पाकिस्तानच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. निवडणुक प्रचारादरम्यान इमरान खान जखमी झाल्याचा त्याला निवडणुकीत फायदा होणार असल्याचं भाकीत राजकीय जानकारांनी केलंय....आज पाकिस्तानमध्ये इमरान खानसाठी सहानूभुतीची लाट निर्माण झालीय..
इमरान खानच्या प्रकृतीविषयी प्रत्येकाला चिंता आहे...पण जखमी अवस्थेतही इमरान खान चित्रफितीच्यामाध्यमातून मतदारांच्या संपर्कात आहे. पाकिस्तानात मतदान होणार आहे..पण दहशतवाद.भ्रष्टाचार...आणि दारिद्राचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे..अशात पाकिस्तानच्या नागरिकांच लक्ष्य या तीन चेह-यांकडं लागलं आहे. नवाज शरीफ, इम्रान खान, आसिफअली जरदारी. हे तिन्ही राजकारणी या निवडणुकीत आपलं नशिब आजमावीत आहेत...निवडणुक प्रचार शिगेला पोहचला असतांनाच इमरान खान जखमी झाला..त्यामुळे ११ मे रोजी लागणा-या निवडणुकीच्या निकालात इमरान खानचा दावा आणखी मजबूत झाल्याचं बोललं जातंय...
राजकारणाच्या खेळपट्टीवर या अपघातामुळे इमरान खानच्या राजकीय कारकिर्दीला नवी दिशा मिळेल का ? हाच खरा प्रश्न आहे..केवळ या एका घटनेमुळे पाकिस्तांनी नागरिकांना इमरान खानच्या पूर्वीच्या इमेज विसर पडले काय ? एकेकाळी प्लेबॉय म्हणून त्याची लोकांमध्ये इमेज होती..ऐकेकाळी त्याची प्रेमप्रकरणं चांगलीच गाजली होती ..त्याचे एका पंतप्रधानाशी अफेअर असल्याची कधी काळी चर्चा होती..एका बॉलीवूड अभिनेत्रीशी त्याचे घनिष्ठ संबंध होते...कधी काळी लंडनमधील तरुणी त्याच्यावर फिदा होत्या....ऐकेकाळचा प्ले बॉय आणि पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन आता पाकिस्तानचा कॅप्टन होईल का ? हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल..
पाकिस्तानच्या राजकारणात १५ वर्ष घालवल्यानंतरही इम्रानखानच्या पाकिस्तान तहरीक - ए - इन्साफ या पक्षाला यश पहायला मिळालं नाही..पण गेल्या दोन वर्षात इम्रानच्या सभांना जी गर्दी होतेय ती पाहून पाकिस्तानातील सर्व राजकीय पक्षांची झोप उडालीय..१९९६मध्ये एकाचवेळी तब्बल सहा मतदारसंघातून त्याने निवडणुक लढवली आणि सर्व ठिकाणी त्याचं डिपॉझिट जप्त झालं...पण असं असतानाही ते आज सत्तेचा दावेदार कसा बनला हे आता आपण पहाणार आहोत...
इमारान खान जेव्हा मंचावरुन खाली कोसळा तेव्हा त्याचं भाषण ऐकण्यासाठी हजारो पाकिस्तानी नागरिक तिथ उपस्थित होते..गेल्या दोन महिन्यांपासून इमरान खानने जवळपास ५० सभा घेतल्या आहेत..यावेळीही त्याचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक तिथं जमा झाले होते. इमरान खानच्या सभांसाठी लोक मोठी गर्दी करतायत...यापूर्वी बेनझीर भुट्टोच्या सभांना लोक अशी गर्दी करत...
पाकिस्तान आज परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असून त्यांच्या समोर तीन पर्याय आहेत..त्यामध्ये इमरान खान हा एक आहे..पाकिस्तानी नगरिकांना आता परिवर्तन हवं आहे..
हा तोच इमरान खान आहे ज्याला १५ वर्षापूर्वी पाकिस्तानातील लोक प्लेबॉय म्हणून ओळखत होते..राजकारणाच्या खेळपट्टीवर बॅटिंग करणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं..एकाचवेळी सहा मतदार संघातून निवडणुक लढवण्याचा प्रयोग त्याने केला होता मात्र सर्व ठिकाणी त्याला अपयश आलं..या पार्श्वभूमीवर राजकारणातला कॅप्टन होणार का असा सवाल केला जात आहे..
पण हे सगळं काही अचानक घडलं नाही..प्ले बॉयची इमेज असलेल्या इमरानने जेव्हा राजकारणाच्या पिचवर पाउल टाकलं तेव्हा त्याला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला..पाश्चमात्य पेहराव आपल्या राजकीय वाटचालीत अडथळा ठरु शकतो याची त्याला सुरुवातीलाच जाणीव झाली..आणि त्यामुळेच त्याने पेहराव बदलला...
बेकारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षांची चांगलीच कोंडी झालीय..जनतेत अमेरिकेविषयी प्रचंड रोष आहे..कट्टरवादी विचारांचा जनतेवर प्रभाव आहे..त्यामुळेच त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न इमरान खान कडून केला जातोय..
पाकिस्तानातील ५५ % तरुणांची मतं मिळवण्यासाठी बेकारीचा संबंध भ्रष्टाचाराशी जोडला.२००२मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कट्टरवादी नेता फजलुरेहमानला पाठिंबा दिला.२००५मध्ये कुराणच्या कथित विटंबनेच्या मुद्दावरुन जाहिर सभा घेऊन बुश सरकारला आव्हान दिल.ड्रोन हल्ल्यांचा विरोध केला तसेच स्वात खो-यात तालिबानी न्यायालयाचं समर्थन केलं.
पाकिस्तानी जनता राजकारणातील नवीन चेह-याच्या शोधात आहे..तसेच पाकिस्तानला गरीबीतून वर काढण्याची क्षमता असलेल्या राजकारण्याला जनतेचा पाठिंबा मिळेलही..त्यामुळे जर जनतेचं समर्थन मिळालं तर १९९२मध्ये विश्वकप जिंकलेला हा कॅप्टन राजकारणातही चमत्कार घडवू शकतो..
आज ज्याला पाकिस्तानच्या राजकारणातील सर्वात मोठा दावेदार मानलं जातंय तो एकेकाळचा प्लेबॉय होता..इम्रान खानचं खासगी आयुष्य बॉलीवूडच्या कथेला शोभावं असचं आहे..त्यामध्ये इमोशन आहे ड्रामा आहे सस्पेंस आहे..
काळाचं भान असलेला नेता, क्रिकेटचा दिग्गज खेळाडू, की १५ प्लॅ बॉयची इमेज असलेली व्यक्ती..क्रिकेटच्या पिचपासून ते राजकीय व्यासपीठापर्यंत पाकिस्तानच्या या सुपरहिट खानची विविध रुप पाकिस्तानी जनतेनं बघीतलं आहे..त्यामुळे इमरान खानची नेमकी ओळख कोणती हे सांगण कठीण आहे..
लाहोरच्या एका गर्भश्रीमंत कुटुंबात जन्माला आलेला इमरान खान जेव्हा लंडनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन पाकिस्तानात परतला तेव्हा त्याच्या शौकीन स्वभावाचे किस्से जनतेपर्यंत पोहोचले होते...असं म्हटलं जातं की... आपल्याला किती मैत्रिणी आहे याची कल्पना खुद्द इमरानलाच नव्हती. एव्हडचं नव्हे तर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेजनझीर भुट्टो आणि अभिनेत्री झिनत अमान यांच्याशी इमरान खानचं नाव जोडलं गेलं होतं. त्याकाळी अनेक सेलिब्रिशी महिलांशी इमरान खानचे संबंध असल्यचं बोललं जातंय..सीटा व्हाईटशी त्याने लग्न केल्याची चर्चा चांगलीच रंगली होती..सीटाला इमरान खानपासून एक मुलगा झाला असल्याचा आरोप त्याच्या विरोधकांनी केलाय..
सत्तरच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री झिनत अमानशी इमरानचे प्रेमसंबंध असल्याचं बोललं गेलं..त्यांच्यातल्या संबंधाविषयी त्या दोघांनी कधीच खुलासा केला नाही..झिनतच्या आईने विरोध केल्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं असही बोललं जातं..पण काही वर्षांपुर्वी त्याच्या विषयी ब्रिटिश लेखक क्रिस्टोफर सेनफोर्डने खळबळजनक गोप्यस्फोट केला होता..
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि इमरान खान यांच्यात चांगली मैत्री होती.१९७०मध्ये इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड युनिव्हरसिटीमध्ये शिक्षण घेत असतांना त्यांची जवळीक वाढली होती.इमरानच्या आईची त्यांच्या नात्यांना संमती होती मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.
क्रिकेटरबरोबरच प्लेबॉयची इमेज असलेल्या इमरानने ९०च्या दशकात जेमिमा स्मिथ गोल्डशी लग्न केलं...पण पूर्वाश्रमीच्या नात्यांमुळे त्यांचं वैवाहिक आयुष्य जास्त काळ टिकलं नाही..
गेल्या ३५ वर्षात पाकिस्तानच्या जनतेनं इम्रान खानची अनेक रुप बघीतली आहे..वाद आणि इम्रान खान हे जणू समिकरणचं बनलं होतं..त्यामुळेच त्याला वादग्रस्त कॅप्टन म्हटलं गेलं...
पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील हे सोनेरीक्षण आहे..आणि हाच तो चेह-या ज्याने पाकिस्तान टीमला अपयशातच्या अंध:कारातून बाहेर काढलं तसेच क्रिकेटमधला सर्वोच्च मान मिळवून दिला..ज्यानं पाकिस्तान टीमला विश्वविजेत्याचा मान मिळवून दिला त्याचं नाव इम्रान खान..पाकिस्तान टीमचा चेहरा बनला होता इमरान खान..पण या दिग्गज खेळाडूवर अनेक आरोप झाले..
क्रिकेट जगतात आपला दबदबा निर्माण करणा-या इमरानने आपल्याच टीमचं महत्व कमी केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता..विशेष म्हणजे हा आरोप त्याने वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याच्यावर लावण्यात आला होता..वर्ल्डकप जिंकल्यानंतर क्रिकेट ग्राऊंडवर इमरानने टीमची प्रशंसा करण्याऐवजी हे उदगार काढले होते..माझं स्वप्नपूर्ण झालं, मला जे पैसे मिळतील त्यातून मी माझ्या आईच्या स्मृतीत कॅन्सर हॉस्पिटल बांधणार आहे
आपल्या मेहूण्याला सट्टेबाजीसाठी मदत केल्याचं इमरानने एका मुलाखतीत सांगितलं होतं..तसेच त्या सट्ट्यातून मिळालेल्या पैशांचा वापर पार्टीचं कर्ज फेडण्यासाठी केल्याचं इमरानने सांगितलं होतं...मात्र कोणत्या मॅच दरम्यान आणि कशा पद्धतीने सट्ट्यातून पैसे कमावले याचा खुलासा मात्र त्याने केला नव्हता..
मॅच दरम्यान जेव्हा कोल्ड्रिंक्स ग्राऊंडवर येत असे तेव्हा मी कोल्ड्रिंक्सच्या बाटलीचं झाकण चोरुन खिशात ठेवत असे आणि नंतर त्या झाकणाच्या मदतीने बॉल टेम्परिंग करत असे. जेव्हा शाहिद आफरीदीवर बॉल टेम्परिंगचा आरोप झाल तेव्हा इमरान खानने त्याची पाठराखण केली होती..आज इमरान खान क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे मात्र वादाशी त्याचं नातं तसं जुनंच आहे.
एक क्रिकेटर ते राजकारणी असा प्रवास इम्रान खानने केलाय..पण त्याचा हा प्रवास कसा झाला ? तो क्रिकेटर कसा बनला ? सुरुवातीच्या काळात त्याला यश मिळालं होतं का ? राजकारणात त्याने कसा प्रवेश केला?
इमरान खान...क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव...आज राजकारणी म्हणून त्याची पाकिस्तानात चर्चा होत असली तरी क्रिकेटमध्ये त्याचं मोठं योगदान आहे..पाकिस्तान क्रिकेट टीमला वर्ल्डकप जिंकून देण्यात इमरान खानने महत्वाची भुमिका बजावली आहे...इमरान खानचं कुटुंब हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातलं..लाहोरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यांनंतरऑक्सफर्डमधून त्याने राजकारण आणि अर्थशास्त्राची पदवी घेतली..वयाच्या सोळाव्यावर्षी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं..मात्र सुरुवातीला त्याला फारसं यश मिळालं नाही..७०च्या दशकात त्याने स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली..याच काळात तो काऊंटी क्रिकेट खेळला.. सुरुवातीला एक मध्यमगती गोलंदाज म्हणून त्याच्याकडं बघीतलं जात होतं..१९७८मध्ये ऑस्ट्रेलियातील दौ-या दरम्यानं त्याला जलदगती गोलंदाज म्हणून ओळख मिळाली..वयाच्या तीसाव्या वर्षी तो पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन झाला..सुरुवातीला तो अत्यंत लाजाळू खेळडू म्हणून ओळखला जात होता..पुढे मात्र त्याने संघावर हुकुमत गाजवली..१९७१ ते १९९२ या काळात त्याने क्रिकेटचं मैदान गाजवलं...१९८७च्या वर्ल्डकप सामन्यानंतर त्याने क्रिकेटमधून संन्यास घेतला..मात्र १९८८मध्ये त्याला पुन्हा संघात सहभागी करुन घेण्यात आलं...आणि त्याने १९९२ंमध्ये पाकिस्तानला वर्ल्डकप जिंकून दिला...त्यानंतर त्याने क्रिकेटमधून सन्यास घेतला..क्रिकेटला रामराम केल्यानंतर इमरानने समाजिक कार्याला सुरुवात केली..आपल्या आईच्या नावाने त्याने संस्था सुरु केली..तसेच कॅन्सर रुग्णालय बांधलं..त्यासाठी त्याने जगभरातून पैसा जमा केला..पुढे त्याने पाकिस्तान तहरीक ए इंसाफ नावाचा पक्ष काढला आणि राजकारणात उडी घेतली..आज त्याचा पक्ष पाकिस्तानातील निवडणुकीत आपलं नशिब आजमावीत आहेत..क्रिकेटर म्हणून पाकिस्तानी जनतेन त्याला डोक्यावर घेतलं पण एक राजकारणी म्हणून लोक त्याला स्विकारणार का हे लवकरच स्पष्ट होईल...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, May 9, 2013, 23:44