लवकरच परळ लोकल सुरू होणार, Parel Local will soon launch, Parel terminus & Parel Local will soon laun

लवकरच परळ लोकल सुरू होणार

लवकरच परळ लोकल सुरू होणार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दादर स्टेशनवरील भार हलका करण्यासाठी लवकरच परळ लोकल सुरू होण्याचा मार्ग निघण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने आपला प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव परळ टर्मिनसचा आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला की परळ येथून लोकस सुटेल. शिवाय दादरचा भार हलका होणार आहे.

नेहमीच दादर रेल्वे स्थानकात ओसंडून गर्दी असते. पाय ठेवायला प्लॅटफॉर्मवर जागा नसते. त्यात गाडीत चढणे म्हणजे एक दिव्यच असते. गर्दीतून प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर पुलावर चढण्यासाठीची चेंगराचेंगरी हे चित्र दादर स्थानकात नेहमीच दिसते. मात्र येत्या दीड ते दोन वर्षांत दादर स्थानकावरील बहुतांश भार हलका होण्याची शक्यता आहे.

दादरपुढच्या परळला टर्मिनस बांधण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. या टर्मिनसचा आराखडा बोर्डाकडून मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परळला महत्व प्राप्त होणार आहे. मध्य रेल्वेवर ३० उपनगरीय गाडय़ा दादरवरून सुटतात. त्यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा दादर येथून जादा गाडय़ा सोडणे कठीण आहे.

मध्य रेल्वेनी प्रवाशांच्या सोयीसाठी आणि दादरचा भार कमी करण्यासाठी नवे परळ टर्मिनस बांधण्याचा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवण्यात आलाय. या नवीन टर्मिनससाठी सध्याचा अप धीम्या मार्गाचा प्लॅटफॉर्म मुंबईच्या दिशेने वाढवून एल्फिन्स्टन पुलाला जोडणार जाणार आहे. सध्याचा डाऊन धीमा मार्ग परळ येथे थांबवण्यात येणार आहे.

याच मार्गावरून परळहून डाऊन मार्गावर गाडय़ा रवाना होतील. मात्र हा प्लॅटफॉर्म मुंबईच्या दिशेने वाढवून एल्फिन्स्टन पुलाला जोडणाला जाईल. या गाडय़ांसाठी एक रुंद प्लॅटफॉर्म बांधला जाणार आहे. सध्या मुंबईच्या दिशेला असलेल्या फूटओव्हर ब्रिजला दोन्ही बाजूंनी चढण्या-उतरण्यासाठी जिना असेल. तर परळ स्थानकात मधोमध एक पादचारी पूल बांधून पूर्वेला उतरण्यासाठी मार्ग केला जाईल. हे टर्मिनस एलफिस्टन आणि परळमध्ये असेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 20, 2013, 12:42


comments powered by Disqus