चार महिन्यांपासून १३ वर्षीय मुलीवर सतत बलात्कार

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 11:41

मुंबईतील परळ भागात एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मागील चार महिन्यांपासून बलात्कार होत असल्याची घटना उघडकीस आलीय. भीतीपोटी या मुलीनं आपल्यावरील अत्याचाराबाबत मौन बाळगलं होतं. मात्र काल ज्यावेळी घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

लवकरच परळ लोकल सुरू होणार

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 12:42

दादर स्टेशनवरील भार हलका करण्यासाठी लवकरच परळ लोकल सुरू होण्याचा मार्ग निघण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने आपला प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव परळ टर्मिनसचा आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला की परळ येथून लोकस सुटेल. शिवाय दादरचा भार हलका होणार आहे.

मुंबईत महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हल्ला

Last Updated: Thursday, October 17, 2013, 15:51

रूपारेल कॉलेजच्या बाहेर एका विद्यार्थिनीवर ब्लेडने हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात त्या मुलीच्या डाव्या हाताला दुखापत झालीय. तिला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नरे पार्क मैदान बचाव : शिवसेना-मनसे आमने सामने

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 13:17

मुंबईतल्या परळमधलं नरे पार्क मैदान बचावासाठी शिवसेना सरसावली आहे. त्यासाठी सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मैदानावर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्याबरोबरच स्विमिंग पूल, जॉगिंग पार्क, क्लबचं बांधकाम करण्याची योजना मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी आणली आहे.

मुंबई सामूहिक बलात्कार, आणखी एकास अटक

Last Updated: Saturday, August 24, 2013, 13:31

मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरणी रात्री उशिरा आणखी एका आरोपीला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत या प्रकणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या दोन झाली आहे. याप्रकरणातील तीन आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

उद्धवस्त करणारा सूर्यास्त

Last Updated: Friday, August 23, 2013, 23:09

स्वप्नांचं शहर मुंबई.... रोज लाखो तरुण तरुणी डोळ्यांत मोठमोठी स्वप्नं घेऊन या शहरात येतात....मीही त्यांच्यापैकीच एक.... करीअर करीन तर मुंबईतच असा निर्धार करत मुंबई गाठली...

आर. आर. आबांना बांगड्या पाठवा – राज ठाकरे

Last Updated: Friday, August 23, 2013, 17:54

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील असून राज्यातील महिला भगिनींनी एका बॉक्समध्ये बांगड्या भरून त्यांना पाठवाव्यात.

मुंबई गँगरेप : एकाला अटक, चार फरार - पोलीस आयुक्त

Last Updated: Friday, August 23, 2013, 15:00

मुंबईतील सामूहिक बलात्काराची घटना अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. तर यातील चार जण फरार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिली.

मुंबई बलात्कार - काय म्हणाले राज ठाकरे

Last Updated: Friday, August 23, 2013, 14:25

आर. आर. पाटील यांच्या घरी महाराष्ट्रातील महिलांनी बांगड्या पाठवा - राज ठाकरे

कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, गृहमंत्र्यांचे मौन!

Last Updated: Friday, August 23, 2013, 11:46

राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चालंलयं. पुण्यात भररस्त्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकारंची हत्या करणारे आरोपी अद्याप मोकाटच आहेत. त्यात काल संध्याकाली साडेसहाच्या सुमारास मुंबईत तरुणीवर झालेल्या सामूहीक बलात्काराच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत.

मुंबईत न्यूज फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार

Last Updated: Friday, August 23, 2013, 06:50

मुंबईमधील लोअर परळ भागात २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लोअर परळ येथील शक्तिमील कम्पाऊंड येथे या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

'द वीक' च्या कार्यालयावर हल्ला

Last Updated: Friday, April 20, 2012, 14:50

लोअर परळ येथील 'द वीक' मासिकाच्या काही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून वाद झाल्याने राजकीय हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन जण जखमी झालेत.

उंच टॉवरमुळे मुंबईत पाणी समस्या

Last Updated: Saturday, December 3, 2011, 15:13

दक्षिण मुंबईचा महत्वाचा भाग असणारा करी रोड, लोअर परेल, चिंचपोकळी चा परिसर. या भागात अशाच बैठ्या चाळी पाहायला मिळतात. चहुबाजुंनी ह्या परिसराला मोठमोठ्या टॉवरनी वेढलय. मात्र हेच मोठाले टॉवर या स्थानिकांसाठी पाणी टंचाईचं कारण ठरतायत.