संगमेश्वर विद्यालयाचा सुरक्षितेचा नवा पायंडा, Sangameshwar school security on CCTV

संगमेश्वर विद्यालयाचा सुरक्षितेचा नवा पायंडा

संगमेश्वर विद्यालयाचा सुरक्षितेचा नवा पायंडा
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये शाळेत झालेल्या मारामारीतून हृषिकेश सरोदे या नववीतल्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पुण्यातल्याच पारगावच्या एका खेड्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चोख उपाययोजना केलीय. हा खास रिपोर्ट.

पुणे जिल्ह्यातल्या पारगावमधलं संगमेश्वर विद्यालय. सध्या या शाळेच्या एका उपक्रमाचं कौतुक होतंय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या शाळेनं प्रत्येक वर्गामध्ये आणि शाळेच्या आवारात सीसीटीव्ही लावलेत. या सीसीटीव्हींचं फुटेज मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये दिसणार आहे. संगमेश्वर शाळेत एकूण सोळा सीसीटीव्ही बसवण्यात आलेत. या सीसीटीव्हींसाठी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आर्थिक मदत केली.

पिंपरीच्या शाळेत मारामारीमुळे विद्यार्थ्याचा जीव गेल्याची घटना नुकतीच घडलीय. त्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर विद्यालयाचा सीसीटीव्ही बसवण्याचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं जाणार आहे आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉपीसारखे प्रकारही टाळता येणं शक्य आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ


First Published: Thursday, October 24, 2013, 11:32


comments powered by Disqus