रेल्वेच्या नविन कोचमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 11:17

यापुढे जे नविन रेल्वेचे डब्बे (कोच) तयार करण्यात येतील त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहेत. तशी तयारी रेल्वे विभागाने केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ठाण्यात चोरी लपविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराच तोडला

Last Updated: Saturday, May 10, 2014, 23:20

ठाण्यात चोरीच्या घटना वाढतायत. त्यातच शुक्रवारी पहाटे ज्वेलर्सच्या दुकानातील चोरीच्या घटनेमुळं पोलिसांपुढे नवं आव्हान उभं ठाकलंय.एक हा रिपोर्ट.

भेटा जगातील सर्वात खराब ड्रायव्हरला

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 16:57

या महाशयांना भेटा हे जगातील सर्वात खराब ड्रायव्हर आहेत. फिलिपिन्सची राजधानी मनीला येथील एक व्यक्ती आपली स्कूटर घेऊन रस्त्यावर उतरला तेव्हा त्याने रस्त्यात गोंधळ माजवला.

इस्टरच्या हत्येचं गूढ उकललं, आरोपीला अटक

Last Updated: Monday, March 3, 2014, 13:44

दोन महिन्यांपूर्वी कुर्ला टर्मिनसवरून रहस्यमयरित्या गायब झालेल्या आणि नंतर मृत अवस्थेत सापडलेल्या इस्थर अनुह्या मृत्यू प्रकरणाचा छडा लागल्याचं मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी माहिती दिलीय.

दरोडेखोरीचा प्रयत्न फसला, सीसीटीव्हीत कैद

Last Updated: Thursday, February 20, 2014, 15:15

शिर्डीजवळ राहता शहरात शिवाजी संकुलात दरोडेखोरी करण्याचा प्रयत्न एका सतर्क सुरक्षामुळे फसला. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झालाय.

सीसीटीव्हीमध्ये अनुह्या सोबत `तो` कोण?

Last Updated: Saturday, February 1, 2014, 15:17

५ जानेवारीला कुर्ला टर्मिनसला उतरलेली अनुह्या इस्टर या तरुणीचा मृतदेह १४ जानेवारीला कांजुरमार्ग इथल्या झुडपात आढळला होता. या हत्येमागे कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा किंवा टॅक्सीचालकांचाच हात असावा या पोलिसांच्या अंदाजाला कलाटणी देणारी बाब पुढे आलीय.

मुंबईत दरोडे टाकणारी टोळी सीसीटीव्हीत कैद

Last Updated: Monday, January 13, 2014, 22:09

दरोडे टाकणा-या एका महिलांच्या टोळीला गजाआड करुन मुंबई पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतलाय. गेल्या वर्षभरापासून या महिलांच्या टोळीनं मुंबई पोलिसांची झोप उडवली होती. त्यांची दरोडे टाकण्याची चलाखीही तशीच अचाट होती... मात्र अखेर या टोळीतल्याकाही महिलांना पोलीसांनी बेड्या ठोकल्याच.

बँकेत घुसून ग्राहकांच्या पैशावर डल्ला; तीन बहिणींना अटक

Last Updated: Thursday, December 12, 2013, 19:06

बॅँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असलेल्या ग्राहकांच्या पैशांची चोरी करणा-या तीन बहिणींना मीरारोड पोलिसांनी अटक केलीय.गौरी श्रीकांत, मोना गुडा आणि जोगेश्वरी गुडा अशी या बहिणींची नावं आहेत. मीरा रोडच्या बॅँक ऑफ इंडियाच्या सीसीटीव्हीत त्यांच्या या चोरीचा प्रताप कैद झाला होता.

आता सगळ्याच `एटीएम`बाहेर दिसणार `सीसीटीव्ही`...

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 13:08

राज्यातल्या सर्व एटीएम सेन्टरमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश राज्य सरकारनं बँकांना दिले आहेत. ३१ डिंसेंबरपर्यंत एटीएमच्या आत आणि फेब्रुवारीपर्यंत एटीएमबाहेर सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश दिले आहेत.

संगमेश्वर विद्यालयाचा सुरक्षितेचा नवा पायंडा

Last Updated: Thursday, October 24, 2013, 11:37

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये शाळेत झालेल्या मारामारीतून हृषिकेश सरोदे या नववीतल्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पुण्यातल्याच पारगावच्या एका खेड्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चोख उपाययोजना केलीय. हा खास रिपोर्ट.

रशियातील लाईव्ह बॉम्बस्फोट कॅमेऱ्यात कैद

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 12:00

कॅमेऱ्यात कैद झालाय बॉम्बस्फोटा सारखा आत्मघाती हल्ला. हा हल्ला झालाय रशियात. रशियातील वोल्गोग्रँड शहरात एका बस मध्ये हा आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे.

फरार राष्ट्रवादीचा नगरसेवक पोलीस अधिकाऱ्यांच्या शेजारीच

Last Updated: Saturday, October 19, 2013, 10:50

जालन्याच्या टोल नाक्यावर तलवार घेऊन धिंगाणा घालणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक नूर खान सध्या पोलीस दप्तरी फरार आहे. मात्र, हा नगरसेवक पोलीस अधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे फोटोत कैद झालं आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ही पाहा... देसी ‘सोलार-सीसीटीव्ही’ कार!

Last Updated: Thursday, October 10, 2013, 13:28

सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त अशी जगातील पहिली सोलार सीसीटीव्ही कार पुण्याच्या आयुब खान पठाण यांनी बनवलीय.

असा तो वेस्टगेट मॉलमधला थरार!

Last Updated: Monday, October 7, 2013, 10:39

केनियाची राजधानी नैरोबीच्या वेस्टगेट मॉल दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्वाचं सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागलंय. ५ दहशतवाद्यांनी मॉलमध्ये घुसून हैदोस घातल्याचं तुम्ही फुटेजमध्ये दिसतंय.

बिबट्यानं उडवली ठाणेकरांची झोप!

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 09:48

ठाण्यातल्या हिरानंदानी परिसरात रात्री अचानक बिबट्या आला. हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ठाण्यातल्या सर्वात पॉश भागातल्या हिरानंदानी इस्टेट परिसरातल्या वेलेन्टीनो या इमारतीत हा बिबट्या दिसला.

... हा आहे दाभोलकरांच्या हत्येतील दुसरा आरोपी!

Last Updated: Monday, September 2, 2013, 17:55

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उद्या मंगळवारी दोन आठवडे पूर्ण होत आहेत. पण, अजूनही पुणे पोलिसांना ना या हत्येमागच्या कारणांचा उलगडा झालाय ना मारेकऱ्यांचा...

‘पोलिसांनी घेतला बारबालेचा जीव’

Last Updated: Monday, September 2, 2013, 12:33

पोलिसांनी नुकताच मुंबईतील ‘एलोरा’ या बारवर छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी बारमधील कर्मचाऱ्यांसह बारबालांनाही जबर मारहाण केली आणि याच मारहाणीमुळे एका बारबालेचा मृत्यू झालाय, असा आरोप बारमालकानं केलाय.

पिंपळगावात गावकऱ्यांच्या पुढाकाराने ५४ सीसीटीव्ही!

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 19:55

देशातील सर्वात मोठे कांदा खरेदी विक्रीचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पिपळगावात तब्बल ५४ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामपालिका असलेल्या या गावाने पुढाकार घेत कायदा व सुव्यवस्था चोख केली आहे.

बॉम्बस्फोटाला वर्ष उलटलं; बॉम्बसूट कधी मिळणार?

Last Updated: Thursday, August 1, 2013, 11:22

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण होतंय. स्फोटाच्या तपासाबाबत राज्याच्या सुरक्षा यंत्रणांची पाटी कोरीच आहे

सीसीटीव्हीत लाइव्ह मर्डर

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 21:04

धक्क्दायक बातमी पुण्याहून.... दारूच्या आहारी गेल्यानंतर काय होतं, याचं अतिशय धक्कादायक उदाहरण चाकणमध्ये समोर आलंय. दारूच्या नशेत अतिशय शांत डोक्यानं एका मित्रानंच मित्राचा खून केला. ही हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

बोधगया बॉम्बस्फोट : सीसीटीव्ही फुटेज जाहीर

Last Updated: Monday, July 8, 2013, 11:32

बुद्धगयामधील स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्यात आलंय. बिहार पोलीसांनी हे फुटेज प्रसिद्ध झालंय.

विधानभवनातील सीसीटीव्ही बिनकामाचे...

Last Updated: Saturday, March 30, 2013, 09:32

सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणात विधान भवनातील सीसीटीव्ही कॅमेरात या मारहाणीचं स्पष्ट रेकॉर्डिंग झालीच नसल्याची माहिती आता पुढे आल्यानंतर आता चर्चा सुरू झालीय विधानभवनातील सीसीटीव्हींची...

कदम-ठाकूर सहिसलामत सुटणार?

Last Updated: Friday, March 29, 2013, 12:58

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट रेकॉर्डिंग झालंच नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे पोलिसांला मारहाण करणाऱ्या या आमदारांना संशयाचा फायदा मिळू शकतो.

कपडे चोरणाऱ्या महिला सीसीटीव्हीत कैद!

Last Updated: Thursday, March 28, 2013, 19:41

मुंबई पोलिसांनी तीन अशा महिलांना अटक केली आहे ज्या महिला मुंबईतील महागड्या कपड्याच्या शोरूममध्ये जाऊन तेथील कपड्यांची चोरी करत.

राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही!

Last Updated: Thursday, February 28, 2013, 23:00

राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. अपघात रोखण्यासाठी आणि अपघातातील जखमींवर त्वरीत उपचार व्हावेत.

हैदराबाद स्फोट : `CCTV`मधला `तो` सायकलस्वार कोण?

Last Updated: Saturday, February 23, 2013, 13:12

हैदराबाद दिलसुखनगर बॉम्बस्फोटांना ४० तासांहून अधिक वेळ लोटलाय. तपासयंत्रणा या स्फोटांचा मागमूस काढण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, अजूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, हाती आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलेल्या एका सायकलस्वारावर पोलिसांचा संशय बळावलंय.

हैदराबाद स्फोट-आयईडीसह १ किलो स्फोटके वापरली

Last Updated: Saturday, February 23, 2013, 09:57

हैदराबाद येथील दिलसुखनगरमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिलसुखनगर भागातील घटनास्थळाजवळील एका खांबावर असलेल्या सीसीटीव्हीचे कनेक्शन चार दिवसांपूर्वीच कापले गेले होते.

'चोरी यशस्वी कर गं माते'; एक धार्मिक चोरी...

Last Updated: Thursday, January 24, 2013, 16:04

चोरट्यांनी चोरी करण्यासाठीची एकही जागा शिल्लक ठेवलेली नाही. अगदी देवाची मंदिरेही चोरट्यांनी सोडलेली नाही. पण, नाशिकमध्ये एक ‘धार्मिक’ चोर चोरी करण्याआधी देवीला नमन करायला मात्र विसरला नाही...

धावत्या रेल्वेत महिलांच्या मदतीसाठी... `एसओएस`

Last Updated: Thursday, January 3, 2013, 17:10

दिवसा किंवा रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये ‘एसओएस’प्रणाली सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा विचार सुरू आहे.

थर्टी फर्स्टसेलिब्रेशवर तिसऱ्या डोळ्याची नजर

Last Updated: Monday, December 31, 2012, 08:46

थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करताना ठाणेकरांनो जरा जपून. सेलिब्रेशन करताना तुम्ही थोडसं जरी काही वाकडंतिकडं केलं तरी तुम्ही पकडले जाल. कारण पोलिसांसोबतच तिस-या डोळ्याची करडी नजर तुमच्यावर असणार आहे.

सीसीटीव्हींचं जाळं... पुण्यात नव्हे, फक्त अजित दादांच्या परिसरात

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 17:57

दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असलेल्या पुण्यात सीसीटीव्ही बसवण्यास मुहूर्त मिळत नाही. मात्र, अजित पवार यांनी, ते राहत असलेल्या भोसले नगर परिसरात सीसीटीव्हीचं जाळं उभारला आहे. तेही महापालिकेच्या पैशातून...

नाशिकमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही?

Last Updated: Thursday, August 9, 2012, 08:35

पुण्यात साखळी बॉम्ब झाल्यानंतर राज्यभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. त्यातूनच नाशिक शहरात पोलिसांनी बैठकांचं सत्र सुरू केलंय. सुरक्षेच्या दृष्टीनं विविध संस्थांना सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना पोलीस करत आहेत.

मुंबईसह राज्यात 'कॅमेरा वॉच'

Last Updated: Thursday, August 9, 2012, 04:01

पुणे आणि मुंबईतील बॉम्ब स्फोटानंतर योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मुंबईसह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार आणि खासदार निधीतून सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुणे स्फोट: CCTV फुटेजमधून धागेदोरे हाती

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 03:34

पुणे साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात एटीएसच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागलेत. सीसीटीव्ही फूटेजच्या तपासातून दोन संशयित आरोपींच्या सहभागाची माहिती पुढे आलीय.

पुण्यात CCTV; गोळा करणार ३० कोटी रुपये

Last Updated: Sunday, August 5, 2012, 15:23

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

सीसीटीव्ही बंद, स्फोटाचे आरोपी सापडणार कसे?

Last Updated: Thursday, August 2, 2012, 14:22

पुण्यातल्या स्फोटांनंतर एक धक्कादायक बाब समोर आलीय. स्फोट झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं उघड झालंय. देना बँक आणि गरवारे परिसरातले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं पुढं आलंय.

अपहृत संगीता मुंबईत परतली

Last Updated: Thursday, July 12, 2012, 08:43

सीएसटी स्टेशनवरून पळवून नेऊन हरिद्वारमध्ये सापडलेल्या परभणीच्या संगीताला रात्री उशीरा मुंबईत आणण्यात आलं.

लॉजवर राहणार कॅमेऱ्याची नजर- आबा पाटील

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 12:33

राज्यात असणाऱ्या लॉजवर फार मोठ्या प्रमाणात अनेक अनैतिक गोष्टी घडत असतात. आणि यालाच पायबंद घालण्यासाठी आर. आर. पाटील यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.

सीएसटी: अपहरण केलेली मुलगी हरिद्वारमध्ये सापडली

Last Updated: Saturday, July 7, 2012, 14:11

सी एस टी स्थानकावरून १० जूनला संगीता या ३ वर्षीयं मुलीला मध्यरात्री एका इसमानं पळवून नेलं होतं. संगीताला पळवून हरिव्दारमध्ये नेण्यात आलं होतं. पण आनंदाची गोष्ट म्हणजे पोलिसांना अपहृत संगीता सापडली आहे.

असुरक्षित बालपण...

Last Updated: Saturday, July 7, 2012, 06:36

शुक्रवारचा संपूर्ण दिवसभर ज्याची चर्चा होत राहिली ती बातमी म्हणजे सीएसटीवरुन झालेली तीन वर्षाच्या मुलीची चोरी.. महिन्याभरापूर्वी घडलेली ही चोरी सीसीटीव्हीत कैद झालीय. सीसीटीव्हीत जरी चोर सापडला असला तरी प्रत्यक्षात हा चोर कधी सापडणार? हाच सवाल आता सारे करतायत. मुलांच्या चोरीच्या कारणांची आणि वास्तवाची चर्चा यावरच करुयात थोडीशी चर्चा...

‘मुलगी चोर’ सीसीटीव्हीत कैद

Last Updated: Friday, July 6, 2012, 15:49

ही बातमी आहे एका चोरीची... ही चोरी म्हणजे दागिने किंवा पैशांची नव्हे... तर ही चोरी आहे चक्क एका लहानग्या मुलीची... महत्त्वाचं म्हणजे हा मुलगी चोर सीसीटीव्हीत कैद झाल्यानं पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागलाय.

पुण्यात सुरक्षेचा आभाव, कसा लागणार निभाव

Last Updated: Saturday, May 5, 2012, 17:50

पुणेकरांची सुरक्षा राम भरोसे आहे असं म्हणण्याची वेळ आलीय. सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असलेली cctv यंत्रणा निधी अभावी बंद पडलीय. त्याच्या अंमलबजावणीसाठी पैसे द्यायचे कोणी या वादावरून सध्या ही यंत्रणाच बंद आहे.

पोलिसांची 'उचले'गिरी

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 15:28

पोलिसांच्या उचलेगिरीचा अजब प्रकार पुण्यात उघडकीला आलाय. कोथरुडमधल्या एका तरुणाची बाईक कुठलीही शहानिशा न करता पोलिसांनी उचलून नेली.

विरारच्या शनी मंदिरात चोरी

Last Updated: Thursday, February 23, 2012, 20:04

विरारमधील गासकोपरी भागातील शनिमंदीर अनेकांचं श्रध्दास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र चोरांनी या मंदिरालाही सोडलं नाही. त्यांनी चक्क देवाच्या घरीच चोरीच केली.त्यांचा हा चोरीचा कारनामा मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

स्फोट : सीसीटीव्हीत कैद, इस्रायल पथक दाखल

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 22:31

दिल्लीतील इस्त्रायली वकिलातीमधील अधिकाऱ्याच्या गाडीत झालेल्या स्फोटाचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेरात टिपले गेले आहे. या चित्रीकरणातून गुन्ह्याचे धागेदोरे सापडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, या स्फोटाची चौकशी करण्यासाठी इस्रायलच्या तपास पथकाचे पाच अधिकारी आज राजधानीत दाखल झाले आहेत.

अपराध घडे, 'सीसीटीव्ही' पाही भलतीकडे !

Last Updated: Friday, January 27, 2012, 19:13

महापालिकेनं ९ कोटी रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र त्यामध्येच आता खूप त्रुटी असल्याचं समोर आलं आहे.

मांढर देवी मंदिरात चोरी

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 05:20

साताऱ्यातील प्रसिद्ध मांढर देवी देवस्थानात चोरी झाली आहे. यात देवीचे ११ किलो दागिने चोरीला गेले आहेत. या दागिन्यांची किंमत जवळपास ८ लाख रुपये इतकी आहे.

प्रश्न बाईक्सच्या सुरक्षेचा !

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 03:14

काही चाकरमानी विश्वासाने आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेऊन ऑफिसला जातात. पार्किंगमध्ये बाईकच्या रखवालीसाठी मुलं असतात. तरीही बाईक चोरी होत असतील तर आपल्या गाड्या कुठे सुरक्षित राहतील असा प्रश्न सामान्यांना पडलाय.

सीसीटीव्हीने होणार प्रत्येक चौक चौकस !

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:52

नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या परिसरातल्या प्रत्येक प्रवेशद्वार आणि सार्वजनिक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.या सुरक्षा व्यवस्थेसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.