जहरी सापांच्या विषाची दिवसाढवळ्या विक्री, Snake venom Sales in Patna

जहरी सापांच्या विषाची दिवसाढवळ्या विक्री

जहरी सापांच्या विषाची दिवसाढवळ्या विक्री
www.24taas.com, झी मीडिया, पाटणा

सापाचं विष किती धोकादायक असतं, हे वेगळं सांगायला नको... या विषाचा एक थेंब आणि जीवनाचा खेळ खल्लास... परंतु पाटण्यामध्ये या जहरी सापांचं विष अगदी दिवसाढवळ्या विकलंय जातंय... नशेसाठी या विषाचा सर्रास वापर होतोय... पण पोलिसांना त्याची साधी खबरही नाही... झी मिडियानं छुप्या कॅमेरातून केलेलं हे स्टिंग ऑपरेशन...

साप म्हटला की अंगावर काटाच उभा राहतो... आणि तो विषारी कोब्रा असेल तर अगदी प्राणाशीच गाठ. नागाच्या विषाचा एक थेंब तुमच्या आयुष्याला फुलस्टॉप लावू शकतो. परंतु याच सापाच्या विषाच्या सध्या राजरोस धंदा सुरू आहे. बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये.. अगदी दिवसाढवळ्या, खुलेआम रस्त्यावर.. या धंद्याची खबर मिळताच झी पुर्वय्यानं त्याची चौकशी सुरू केली. आम्हाला मिळाला एक नंबर.. त्या नंबरवर आम्ही संपर्क केला... बराच काळ सुरू असलेल्या फोनाफोनीनंतर सौदा ठरला.

फोनवर झालेल्या सौद्यानुसार आम्ही त्याला गाठलं.. मग सुरू झाल प्रत्यक्ष डिल. आम्ही विषाबाबत चौकशी करत असतानाचं त्यानं आम्हाला विषारी साप विकण्याचीच ऑफर दिली. त्यामुळं आम्हाला धक्काच बसला. कारण केवळ विष नव्हे, तर हे लोक विषारी सापही विकण्याचा धंदा करत होते. परंतु आणखी मोठा शॉक बसला, जेव्हा त्यानं सांगितलं की, या विषाचा उपयोग नशा म्हणून केला जातो. या विषामुळं कशी धुंदी चढते...

आता डिल जवळपास नक्की झालं होतं. तो आम्हाला विषारी साप दाखवायला तयार झाला. या विक्रेत्यासोबत असलेल्या एका बुजुर्ग व्यक्तीनं आम्हाला तो विषारी साप दाखवला. त्यासाठी तो आम्हाला एका सुरक्षित आणि निर्जन ठिकाणी घेऊन गेला. सापाला पाहून आम्ही भीतीनं गारठूनच गेलो.. त्यानं सापाचं विष काढलं आणि आम्हाला ऑफर केलं...

नशेसाठी सापाचं विष आम्हाला मिळालं होतं. अवघ्या नऊ हजार रूपयांमध्ये... या सापाच्या विषामुळं खरंच नशा चढते का, किती जालीम असतं हे विष, याबाबतची माहिती घेण्यासाठी आम्ही डॉक्टरांना भेटलो.

याबाबत आम्ही जेव्हा पोलिसांकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. सापाच्या विषाचा गोरखधंदा कसा सुरू आहे, ही माहिती आम्ही पोलिसांना दिली. आता पोलीस त्यावर किती चपळाईने कारवाई करतात?... की हा धंदा असाच सुरू राहणार? हा प्रश्न आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 21, 2014, 22:39


comments powered by Disqus