मस्तीचा तडका, Student of the year, `SOTY` review: Gear up for a tepid movie-wala-film

मस्तीचा तडका, Student of the year

मस्तीचा तडका, Student of the year
www.24taas.com, मुंबई
फायनली करन जोहरचा ‘स्ड्यूडन्ट ऑफ द इअर’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर आज झलकला. निर्मात्याने तरूण मंडळींना समोर ठेवून या चित्रपटाची निर्मिती केलीय. तरूणाईला धरून तसे बरेसचे चित्रपट तयार करण्यात आलेत, पण आजपर्यत थ्री-इडियट सारखं दमदार कामगिरी कोणीच करू शकलं नाही. करन जोहरच्या टिपिकल प्रेमकहाणीचा त्रिकोणाचा यातही बॉलिवूड धिंगाणा आहे. आत्तापर्यत तरूणाईवर तयार करण्यात आलेल्या सिनेमांचा हा चित्रपटांचा मिक्स पॅक आहे, असं चित्रपट पाहताना सतत भासत असतं.

‘स्ड्यूडन्ट ऑफ द इअर’ चित्रपट पाहताना कुठेतरी ‘जाने तू या जाने ना’ ‘या चित्रपटाची आठवण होते, त्यात सर्व जुने मित्र-मैत्रिणी कॉलेजच्या आठवणी ताज्या करताना दाखवलं गेलयं आहे. तसाचं काहीसा विषय या चित्रपटातही चित्रित करण्यात आलयं.

‘स्ड्यूडन्ट ऑफ द इअर’ चित्रपटातील कलाकार दहा वर्षे मागे जाऊन शाळेतील आठवणींचा फ्लॅशबॅक डोळ्यासमोर आणतात. चित्रपटात वरून धवन (दिग्दर्शक डेविड धवनचा मुलगा) आलिया भट(महेश भटची मुलगी) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (मॉडेल) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटात कॉलेजमधील मस्ती, त्यांचा त्यावेळेचा नवा उत्साह, प्रेमप्रकरणं या विषयांवर चित्रण करण्यात आलयं. यात तरूणांमध्ये संघर्ष, मैत्री, ईर्षा, आव्हान, व इतर स्वभावांचं प्रदर्शन करण्यात आलायं. हॅरी पॉटर एन्ड गोब्लेट ऑफ फायर’ आणि थ्री इडियट मधील सिन्सची थोडीफार मिसळ प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. एका श्रीमंत वडिलांचा श्रीमंत मुलगा (वरून धवन), सुंदर तरूण आकर्षक मुलगी (आलीया भट) आणि उत्तर भारतीय हॅन्डसम मुलगा (सिद्धार्थ मल्होत्रा) यांच्या भोवतीचं सिनेमाची कहाणी फिरताना दिसते. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच सर्व विद्यार्थी ‘स्ड्यूडन्ट ऑफ द इअर’ चा किताब पटकवण्यासाठी झटत असतात. यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची चढाओढ चालू असते. चित्रपटात विजेत्याला अमेरिकन युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळणार असते. `रट्टा मार` या गाण्यात`स्टुडंट ऑफ द इयर`चा किताब मिळवण्यासाठी स्टुडंट्स कशाप्रकारे तयारी करत असतात याचं चित्रण पाहायला मिळतं.


सिनेमाचं चित्रिकरण तसं चांगल्या लोकेशन्समध्ये करण्यात आलयं. सिनेमाची गाणीही इतर बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच आहेत. ज्या सिनेचाहत्यांना करनच्या प्रेमाचा त्रिकोण असणाऱ्या कहाण्या आवडतात,त्यांच्याकडून या चित्रपटला चांगला प्रतिसाद जरूर मिळू शकतो. पण एकंदरीत तरूणांसाठी तयार करण्यात आलेल्या हा चित्रपट तरूणांना किती आकर्षित करेल हे सिनेमागृहातच चित्रपट पाहायला गेल्यानंतरच समजेल.

First Published: Friday, October 19, 2012, 21:57


comments powered by Disqus