Last Updated: Friday, November 30, 2012, 15:30
फिल्म: तलाश
कलाकार: आमिर खान, करीना कपूर, राणी मुखर्जी
दिग्दर्शक: रीमा काग्तीबॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘तलाश’ या आठवड्यात सिनेमागृहात झळकला आहे. आमिर खानचा हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री आहे. या चित्रपटात एका गुंतागुतीच्या केसचा सुगावा लागलेला वाटत असतानाच पुन्हा सर्व विस्कटते. रीमा काग्ती हिच्या या चित्रपटाचा स्क्रिनप्ले मजबूत आहे आणि मुख्य कलाकारांनी खूपच सशक्त अभिनय केला आहे. परंतु, चित्रपटाची गती काही प्रमाणात संथ आहे. सुरूवातीच्या पहिल्या अर्धा तासात ज्या प्रमाणात चित्रपटाने वेग घेतला आहे, तसाच तो संपूर्ण चित्रपटात ठेवला असता तर हा चित्रपट मिस्टर पर्फेक्शनिस्ट सारखा पर्फेक्ट झाला असता.
कशाची आहे तलाश? मुंबईत एका रात्री समुद्रात एक कार पडते. सुरूवातीच्या काही रिपोर्टवरून असे सिद्ध होते की हा अपघात आहे. आमिर खान या चित्रपटात सुरजन सिंह शेखावत या इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. सुरजन सिंहकडे ही केस येते, ही ब्लॅकमेलिंगची केस असल्याचे समोर येते. या केसचा तपास करताना आमिरची तेहनूर (नवाजुद्दीन सिद्दीकी) आणि कॉलर्गल करिना कपूर यांच्याशी संबंध येतो. अत्यंत हुशार आणि इमानदार असलेल्या सुरजन सिंहला या हायप्रोफाइल अपघाताचा छडा लावायचा असतो. या प्रकरणाचा छडा लावताना आमिरला सदैव डेड एंडशी सामना करावा लागतो. शेवटी त्याला या केसमध्ये मदत करते कॉलगर्ल करिना कपूर. खुनीचा सुगावा लावेपर्यंत चित्रपटाची कहाणी अशाप्रकारे पुढे नेली आहे की प्रत्येकावर संशयाची सूई जाते.
कसा झाला अभिनयआमिरने आपल्या मागील चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही आपली भूमिका फारच चांगली वढवली आहे. त्याने एक इन्स्पेक्टर आणि दुःखी बाप यांचे भाव खूप बारीकरित्या सादर केले आहे. चित्रपट पाहून असे वाटते की अभिनयाच्या बाबतीत आमिर खरंच दोन्ही खानांपेक्षा सरस आहे. करीना कपूर एक खूप सुंदर कॉलगर्लच्या भूमिकेत दिसून आली आहे. चित्रपटात ती आल्याने सस्पेन्स आणखी वाढतो. तर राणी मुखर्जीने आमिरची पत्नी रोशनी शेखावतची भूमिका साकारली आहे. अभिनयाच्या बाबतीत बोलायचे तर राणीही आमिरपेक्षा काही कमी नाही. राणीने आपल्या डोळ्यात आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख आणि त्यातून निर्माण झालेल्या अपुऱ्या जीवनाचे सुंदर रूप सादर केले आहे.
इंटरवेलपूर्वीच चित्रपटात एक वेगळा टर्न
सुरूवातीला तलाश चित्रपटाची गती चांगली राहते. सुरूवातीच्या पहिल्या अर्ध्यातास चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवतो. नंतर जरा धिम्या गतीने चित्रपट जातो. इंटरवेलच्या पूर्वी कहाणीत असा काही टर्न येतो की प्रक्षेकांना अचंबित करून टाकतो. हेरगिरी आणि सस्पेन्स पुस्तकं वाचणार किंवा सिरिअल पाहणारे या चित्रपटाच्या शेवट काय होऊ शकतो याचा अंदाज लावू शकतात. पण इतर सामान्य प्रेक्षक या चित्रपटाचा शेवट पाहून आश्चर्यचकीत होतील.
First Published: Friday, November 30, 2012, 15:30