Last Updated: Saturday, June 23, 2012, 08:46
......................................

सीबीआयला सुगावा लागणार?मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीचा तपास करायला क्राईम ब्रान्चनं सुरूवात केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्चनं हा तपास चार भागांत विभागलेला आहे.
......................................

‘मंत्रालयाचा फायर ऑफिसर होता कुठे?’मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर आता निष्काळजीपणाच्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दुर्घटनेच्या वेळी मंत्रालयाच्या फायर ऑफीसरची मदत झाली नाही, अशी माहिती खुद्द मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांनी दिली आहे.
......................................
पवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणकामंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.
......................................

सुरक्षेचे धिंडवडेमंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीतनंतर राज्यातल्या इतर सरकारी इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणांची काय अवस्था आहे? याचं एक विशेष फायर ऑडिट झी 24 तासनं केलं.
......................................

मंत्रालय कर्मचाऱ्यांनो, शनि-रविवारी काम करामंत्रालयाच्या मेकओव्हरबाबत शरद पवारांनी केलेल्या सूचनेचा विचार करु, असं सांगत मंत्रालयाच्या नव्या इमारतीबाबत सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आ
......................................

शेवटची दुर्दैवी हाक, अजितदादा वाचवा आम्हांला……मुलाच्या इंजिनिअरिंगच्या अॅडमिशनसाठी बारामतीमधले महेश गुगळे त्यांचा मित्र उमेश पोतेकरांबरोबर अजित पवारांना भेटायला गेले. आणि तिथेच काळानं त्यांना गाठलं. 'अजितदादांना आम्हांला वाचवा' असा टाहो त्यांनी फोडला...
......................................

आगीचं सत्य आता सगळं बाहेर येणार…मंत्रालयात लागलेल्या आगीची क्राईम ब्रांचनी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी क्राईम ब्रांचची टीम चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर तपास करत आहेत. मात्र सहाव्या आणि सातव्या मजल्यावर उष्णता जास्त असल्यामुळे फायर ब्रिगेड कुलिंग ऑपरेशन करत आहेत.
......................................

मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवारमंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.
......................................

मंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाहीराज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे
......................................

मंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवारमुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
.......................................
मुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहनज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.
.......................................
अग्नितांडवाचे पाच बळीमंत्रालयातल्या अग्नितांडवातल्या बळींची संख्या पाच झालीय. काल तिघांचे मृतदेह सापडले होते. तर आज आणखी दोन मृतदेह हाती लागले. आज मंत्रालयातील चोपदार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे या दोघांचे मृतदेह लागले हाती.
.......................................
मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीरमंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
.......................................

अजित पवारांचं बोट मुख्यमंत्र्यांकडे!मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतरही सहाव्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्याचं केबिन सुरक्षित असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलयं. मुख्यमंत्र्यांच्या केबिन या आगीची काहीच झळ पोहचली नसल्यानं असं वक्तव्य करून एक प्रकारे दादांनी बाबांकडेच बोट दाखवलंय.
........................................

मंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यूमंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून अजून त्यांची ओळख पटलेली नाही. तर तिसरा व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
---------------------------------

अजित पवारांची ‘ती दोन माणसं गेली कुठे?’मंत्रालयात आग लागली. आणि हा हा म्हणता ती संबंध मंत्रालयभर पसरली... त्यामुळेच एकच हल्लकल्लोळ माजला. आपला जीव मुठीत घेऊन प्रत्येकजण हा धावत होता. मात्र या धावपळीत काही जण कुठेतरी बेपत्ता झाले आहेत.
---------------------------------

…अन् अजित पवारांचे दालनही जळालेमंत्रालयाला लागलेली भीषण आग अजूनही अटोक्यात आलेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईतील अग्निशमन दल प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या आगीमुळे इमारतीचा चौथा, पाचवा आणि सहावा मजला जळून खाक आहे.
.---------------------------------

सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं…मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.
---------------------------------

मंत्रालयात आगीचं तांडव, अनेक कर्मचारी अडकलेमुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.
---------------------------------

धुराचाही येतोय वास…मंत्रालय म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्र सराकारचं मुख्यालय आगीच्या आज एका भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. त्यामुळे कशी लागली हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न...
---------------------------------

LIVE : मंत्रालयाच्या आगीत १४ जण गंभीर जखमीमुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.
.
--------------------------------
फोटो फीचर
.
.
---------------------------------
.
.
….अन् मंत्रालयातील आगीचा वणवा झाला
---------------------------------
---------------------------------
.
.
First Published: Saturday, June 23, 2012, 08:46