आता मुंबईचा डबेवाला राजकारणी - Marathi News 24taas.com

आता मुंबईचा डबेवाला राजकारणी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईच्या डबेवाल्यांना आता राजकारणाचे वेध लागलेत. मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं, तर डबेवाल्यांना प्रतिनिधीत्व देण्याचा शब्द शिवसेनेनं डबेवाल्यांना दिलाय.
 
मुंबईतल्या नोकरदार मंडळींना जेवणाचे डबे पोहचवणा-या डबेवाल्यांची मॅनेजमेंट गुरु ही ओळख निर्माण झालीये. शिवाय जगभरातील सामाजिक संघटना आणि माध्यमांनीही डबेवाल्याची दखल घेतलीये. या संघटनेलाही आता राजकारणाचे वेध लागलेत.
 
त्यांनी शहारात असलेल्या श्रमीक वस्तीतून पाच जागांची मागणी केलीय. जो राजकीय पक्ष त्यांना प्रतिनिधीत्व देईल त्याला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्याला शिवसेनेनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. डबेवाल्यांना प्रतिनिधीत्व देण्यावर शिवसेना विचार करतेय. शहराची ओळख असलेल्या डबेवाल्यांना प्रतिनिधीत्व देण्याची भूमिका शिवसेनेनं घेतलीय.
 
महायुतीमुळं शिवसेनेला आरपीआयसाठी काही जागा सोडाव्या लागल्या आहेत. त्यात पुन्हा डबेवाल्यांसाठी जागा सोडल्या तर संभाव्य बंडखोरीचा धोका वाढणार आहे. परिणामी तिकीट वाटपात शिवसेनेची कसोटी लागणार आहे.
 

 
 

First Published: Friday, December 9, 2011, 11:23


comments powered by Disqus