मोबाईल की बॉम्ब ? - Marathi News 24taas.com

मोबाईल की बॉम्ब ?

www.24taas.com, मुंबई
 
मोबाईल की बॉम्ब ?
चायना मोबाईलनं विद्रुप केला चिमुकल्याचा चेहरा
चायना मोबाईलचा वाढता धोका !
स्वस्ताईचा मोह ठरेल प्राणघातक !
 
मोबाईल कधी काळी चैनीची असणारी ही वस्तु आज प्रत्येक घराघरात नाही तर प्रत्येक हातात दिसू लागली.. नवं नवे मोबाईल आणि मोबाईलमधलं नव नव तंत्रज्ञान यामुळे प्रत्येकाला नव्या मोबाईलचा हव्यास वाढू लागलाय.. त्या मोबाईलच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक मर्यादा जाणीव होते आणि अशावेळी सर्वसामान्य ग्राहकांची नजर जाते ती चायना मोबाईलवर.. पण स्वस्ताईच्या नादात घेतले जाणारे हे चायना मोबाईल आज बॉम्ब ठरतात.. यावरच प्राईममध्ये घेतलेला वेध, मोबाईल की बॉम्ब?
 
बाजारात कितीही मंदिचे सावट असलं तरी, मोबाईलचा बाजार नेहमीच गरम असतो.. आणि त्यातही चायना मोबाईलला फार मागणी आहे. बाजारात हजार ते बाराशे रुपयांत मिळणा-या या चायना मोबाईलकडे ग्राहकांची मागणीही मोठी असते. पण असच स्वस्त मोबाईल म्हणतेल्या एक चायना मोबाईल नागपूरच्या मयूर राऊतचं आयुष्य उध्वस्त करुन टाकल आहे.
 
नागपूरचा हा मयूर राऊत.. काही दिवसापर्यंत गोंडस असणारा हा चेहरा एका दुर्घटनेमुळे पुर्णपणे विद्रुप झालाय़... तुमच्या मनात प्रश्न येईल कोण तो माणूस ज्यानं देवानं बनवलेला या सुंदर चेह-याला जखमी करण्याचे धाडस केलय.. पोलिसांनी त्याला शिक्षा केलीय का.. अगदी कुणालाही मनात प्रश्नांचे काहूर उठेल इतपत गंभीर परिस्थीती निर्माण करणारा हा मयूरचा चेहरा आणि मयुरच्या या दुर्देवी परिस्थीतीस कारणीभुत ठरलाय तो एक चायना मोबाईल...(इमेज टाकणे ) होय तुमचा विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट अगदी सत्य आहे.. याच चायना मोबाईलनं क्षणात मयुरचा चेहराचं नव्हे तर अवघ्या देहावर जखमांचं दान दिलं आहे.
 
अवघ्य़ा १२ वर्षाच्या या मयूर राऊतला आपल्या हातातला मोबाईल क्षणात आपल्या प्राणांचा वैरी होईल याची सुतरामही कल्पना नव्हती.. पण चार्जींगपासून मोबाईल काढून घेतो काय क्षणात एक मोठा स्फोट होतो काय, सारचं मयूरसाठी अकल्पित होतं... कारण या मयूरसाठी त्याचा मोबाईल म्हणजे जीव की प्राण होता.. तस पाहायला गेलं तर आज प्रत्येक घरात दिसणारं हे चित्र.. प्रत्येक लहान मुलांच्या हातात आज मोबाईल दिसतोय.. त्याच्या हट्टासाठी १२ वर्षाच्याच काय तर सात- आठ महिन्याच्या लहानग्या जिवाच्या हातातही मोबाईल बिनदिक्कत दिला जातो.. कुणी कसलाही विचार करत नाही.. पण आज मात्र या मयुरवर जी परिस्थीती ओढवलीय ती पाहून तुम्ही नक्की विचार कराल.. घरच्यांनी दिलेला पॉकेटमनी सांभाळून या मयुर राऊतने १२०० रुपयाचा एक चायना मोबाईल घेतला.. पण हाच मोबाईल बॉम्ब बनला आणि मयूरसाठी प्राणघातक ठरला.. आज मयूरने आपल्या छंदापायी घेतलेला हा मोबाईलने त्यांच्या संपुर्ण आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय.. त्याचा उजवा डोळा पूर्ण निकामा निकामी झालाय... चेह-याच्या उजव्या बाजूला अनेक जखमा झाल्यात... धातूचे लहान लहान तुकडे खोलवर रुतून बसलेत... इतकंच नाहीतर उजवा अंगठाही त्यानं गमावलाय. आणि हे सारं झाल्यावर भाबडा मयूर निर्वीकारपणे जेव्हा ती घटना सांगतो तेव्हा अंगावर काटा उभा राहतो..
 
 
पॉकेटमनीच्या १२०० रुपयांतून खरेदी केलेल्या स्वस्त अशा चायना मोबाईलवर गेम खेळणे आणि गाणी ऐकण्याचा छंद मयूरला होता...मात्र हीच हौस मयूरला महागात पडलीय.. हाच चायना मोबाईल एखाद्या बॉम्बप्रमाणे मयूरच्या हातातच फुटला. फक्त नागपूरातचं नाही तर मुंबई पुणे अगदी महाराष्ट्राच्या गावागावात चायना मोबाईलनं थैमान घातलय..मयूर बरोबर झालेल्या दुर्घटनेनंतर केंद्रानं बंदी घातलेल्या या चायना मोबाईलला आता हद्दपार करण्याची वेळ आलीय..
 
नागपुरातला १२ वर्षाचा चिमुकला मयूर... त्याचा उजवा डोळा पूर्ण निकामा निकामी झालाय... चेह-याच्या उजव्या बाजूला अनेक जखमा झाल्यात... धातूचे लहान लहान तुकडे खोलवर रुतून बसलेत... इतकंच नाहीतर उजवा अंगठाही त्यानं गमावलाय... त्याचा दोष होता तो फक्त चायना मोबाईलचा मोह.. आणि म्हणूनच या मोबाईल स्फोटानंतर यावर बंदीची मागणी वाढलीय.
 
नागपूरच्या मयुर राऊत सोबत झालेल्या मोबाईल दुर्घटनेवरुन आता सर्वानाच विचार करण्याची वेळ निर्माण केलीय.. अजाणतेपणी असणारा मोबाईलचा मोह मयूरला झाला आणि त्याने त्याच मोहात स्वस्ताईचा पर्याय म्हणून चायना मोबाईल विकत घेतला.. या मोबाईलची हौस एवढी होती कि मयुरनं चक्क आपल्या पॉकेटमनीतून त्याच्यासाठी जीवनावश्यक वस्तू बनलेला हा चायना मोबाईल त्याने खरेदी केला. मोबाईलवर गाणी एकण आणि गेम खेळणं हा त्याचा छंद, पण हाच छंद त्याच्या जिवावर उठलाय.. चाय़ना मोबईलचा हातातच स्फोट होऊन मयूर गंभीर जखमी झालाय.. मोबाईलच्या स्फोटानं जायबंदी झालेल्या मयुरमुळे संपुर्ण राऊत कुटूंबावर दुखाचे वातावरण पसरलय.. आपल्या मुलावर ओढवलेली ही परिस्थीती अन्य कुठल्याही चिमुरड्यावर ओढवू नये यासाठी मयुरच्या वडिलांनी जिवघेण्या चायना मोबाईलवर बंदीची मागणी केली आहे.
 
चायना मोबाईलचा अशाप्रकारे हातात बॉम्बप्रमाणे स्फोट होण्याची नागपुरातली ही काही पहिली घटना नाही... मात्र या मोबाईलच्या विक्रीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत असतानाच मोबाईल मार्केट आणि वैद्यकिय क्षेत्रातूनही चायना मोबाईलच्या धोकादायक बाबींवर आता बोट ठेवल जातय.  मयूरच्या हातात चायना मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे संपुर्ण हात जायबंदी झालाय आणि उजव्या हाताचा अंगठाही कापावा लागलाय.  मयूरच्या चेह-यावरील जखमा या स्फोटाची दाहकता स्पष्ट करतायत.. केवळ एवढच नाही तर मयूरच्या डोळ्यातील बुबुळामध्ये या स्फोटामुळे विषारी कण गेल्यामुळे त्याच्या नजरेलाही धोका निर्माण झालाय..
 
एका स्फोटानं मयूरचे अवघ आयुष्य बदलून गेलय.. पण य़ा चायना मोबाईल बॉम्बमुळे आता स्वस्त मोबाईलच्या मोहात न पडता ग्राहकांनीही डोळ्यात तेल घालून योग्य मोबाईल खरेदी करणं तितकंच गरजेचं झालंय. किमतीला अतिशय स्वस्त आणि ब्रॅण्डेड मोबाईलमधील सर्व सुविधा मिळत असल्यानं सर्वाना चायना मोबाईलचा मोह भुलवत असतो.. पण फिचर आणि डिस्प्लेच्या नादात बॅटरीकडे दुर्लक्ष होत.. आणि त्यातच आज चिमुरड्या मुलांच्या हातातही हा मोबाईल दिसत असल्यानं प्रत्येक चिमुरड्या हातात आज मोबाईल नव्हे तर बॉम्ब असल्याचच चित्र दिसतय.
 
चायना मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे आता स्वस्त दरात मस्त वाटणारे हे हॅण्डसेट किती घातक ठरु शकतात हे सिद्ध झालयं.. मुळात प्रत्येक मोबाईल हॅण्डसेटची बॅटरी ही लिथीयम पॉलीमर पासून बनवली जाते. आणि मोबाईल जास्त प्रमाणात चार्ज झाला तर ही बॅटरी एका बॉम्बचे रुप धारण करते पण हा धोका सर्वाधिक स्वरुपात चायना मोबाईलच्या हॅंडसेटमध्ये आहे. कारण त्या प्रकारच्या मोबाईल हॅंडसेट मध्ये अतिरीक्त चार्जींग सुरु झाल्यावर ते टाळण्यासाठी मोबाईलमध्ये स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वीत होण्याचं तंत्रज्ञान नसतं.. आणि म्हणूनच चायना मोबाईलमध्ये स्फोटाचं प्रमाण वाढत चाललय.. स्वस्त मोबाईलच्या नादात या सारख्या महत्वाच्या घडामोडीवर दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक ग्राहक आज हा जिवंत बॉम्ब आपल्या सोबत घेऊन फिरतायत..
 
चायना मोबाईलमध्ये सिक्स स्पिकर, फोर सिमकार्ड, ड्युअल मेमरी कार्ड, एट मेगा पिक्सल कॅमेरा यासारख्या अपेक्षेपेक्षा जास्त आणि त्या सर्व अतिशय माफक दरात मिळत असल्याने या मोबाईलकडे ग्राहकांची गर्दी वाढत चाललीय.. पण या सुखसोयींचा विचार करताना मोबाईलचा प्राण असलेल्या बॅटरीकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोबाईलचे स्फोट होतायत. चायना मोबाईलमध्ये नेहमीच बॅटरीमध्ये दर्जाहीन तंत्रज्ञान वापरलं असल्यानं या मोबाईलधारकांना नेहमीच धोका सतावत असतो.. चार्जीगच्या वेळी व्हॉल्टेज रेग्युलेटीगं यंत्रणेचा अभाव हा केवळ मोबाईलचाच नव्हे तर घरातल्या सा-या विद्युत यंत्रणेलाही आगीचे आणि स्फोटाचे आमंत्रण देणारा आहे..
 
आज देशभरात वाढत असलेल्या या मोबाईलच्या स्फोटानं ग्राहकांनीच सतर्क होऊन आता मोबाईलची खरेदी करणं भाग प़डलय.. नाही तर स्वस्ताईचा हा मोह घराघरात अग्निकांड निर्माण करेल हे मात्र नक्की. महागडा ब्रण्डेड मोबाईल वापऱणं हे जरी आर्थिक मर्यादा पडत असल्यानं सर्वसामान्य नाईलाजानं चायना मोबाईलच्या मोहात सापडतात.. स्वस्तात मोबाईल मिळतोय म्हणून कुठलाही विचार न करता त्या मोबाईलची खरेदी करतात.. सर्वसामान्य ग्राहकांची हीच मानसिकता ओळखता चायना मोबाईलच्या हॅण्डसेटनी आज अवघ्या सेल मार्केटवर आपला कब्जा केलाय.
 

अवघ्या भारतभर महागाईन थैमान मांडलय, किचनचं बजेट कोलमडलय तिथं इलेक्ट्रॉनिक बाजारची काय स्थिती असणार याची कल्पनाही करवत नाही.. मात्र घसरत चाललेल्या आणि थंड असलेल्या बाजारात मोबाईलची मात्र दर दिवशी लक्षणीय अशीच विक्रि होतेय.. तरुणाईत मोठ्या झपाट्यानं मोबाईलची क्रेझ वाढतेय.. टच स्क्रिन पासून फेसबुक-म्युझिक प्लेअर सारख्या अनेक सुविधा असल्यामुळे मोबाईलचे फॅड वाढतय.. पण मोबाईल बाझार तेजीत असल्यामुळे नामाकिंत कंपन्यानी आपल्या किमतीतही वाढ केलीय.. परदेशी ब्रॅण्डप्रमाणेच देशी ब्रॅड असणा-या मोबाईलच्या किमतीही तुलनेनं महाग आहेत.. किमतींचा आणि मोबाईलमधील सुविधेचा विचार करता दर्जाशी त़डजोड करणारा ग्राहक आज स्वस्त पर्याय म्हणून चायना मोबाईलकडे वळतो.. आणि म्हणूनच मोबाईलची विक्री करणारे दुकानदारही आता आपल्या दुकानात खप आहे म्हणून चायना मोबाईल विक्रीसाठीच ठेवतात यावरुन या मोबाईलच्या विक्रीचा आलेख लक्षात येईल.
 
 
दूरसंचार मंत्रालयाने खरतर चायना मोबाईलवर बंदी घातलीय.. मात्र अस असतानाही तुलनेनं स्वस्त आणि जास्त सुविधा असल्यानं सर्वसामान्य ग्राहकांचा ओढा हा नेहमीच चायना मोबाईलकडे राहीलाय.. खप आहे म्हणुन दुकानदारही चायना मोबाईल विक्रीसाठी ठेवतात.. पण या चायना मोबाईलकडे आता गांभिर्याने पाहण्याची वेळ आलीय.. नियमाप्रमाणं चायना मोबाईलमध्ये आयएमईआयचे नंबर नसल्यामुळे त्यांचे कॉल अडवण्याची गरज होती.. पण या कायद्याची अमंलबजावणी नसल्यानं या चायना मोबाईलना फुल्ल रेजं मिळतेय. खाजगी कंपन्याचे हितसंबध जपण्यासाठी सरकारनं डोळ्यावर ही पट्टी ओढून घेतलीय.. कारण चायना मोबाईलवर बंदी घातल्यास देशभरातून तीन ते साडेतीन कोटी ग्राहकांचे कनेक्शन एकाच वेळी कट होईल आणि त्याचा फार मोठा फटका हा मोबाईल नेटवर्क कंपन्याना बसेल.. याच भितीनं आज करोडो लोकांच्या आयुष्याशी आज हा गंभीर खेळ खेळला जातोय.. चायना मोबाईलमुळे वापरण्यात येणा-या दर्जाहिन स्पेअऱपार्टमुळे चायना मोबाईल धारकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो..
 
 
संपूर्ण देशभरात आज तीस ते चाळीस हजार कोंटीचा मोबाईलचा व्यवसाय होतो. त्यात १२ टक्के वाटा चायना मोबाईलच्या विक्रीचा आहे. बाजारात उच्च दर्जाचे ब्रॅण्डेड मोबाईल हे सात ते ३५ हजारापर्यंत मिळतात त्या तुलनेनं त्या सर्व सुविधा असणा-या मोबाईलचा पर्याय हा दोन हजारापासून देण्यात चायना मोबाईलने दिल्यामुळेच स्वस्ताईचा हा मोह अनेकाना टाळता येत नाही..पण या मोहामागे दडलेला धोका चायना मोबाईलच्या स्फोटाने अनेकवेळा समोर आलाय.. आणि म्हणूनच अशाप्रकारचे मोबाईल वापरताना प्रचंड काळजी घेण्याचा सल्ला मोबाईलतज्ज्ञ देतात. चैनीची वस्तु आपल्याकडेही असावी हा प्रत्येक व्यक्तीचा स्वभावधर्म आहे.. पण त्याला आर्थीक मर्यादा पडतात.. पण अशा वेळी शॉर्टकट म्हणून निवडलेले चायना मोबाईलसारखे पर्याय सुखी आयुष्यात बॉम्बसारखे उभे ठाकतायत याचही भान आता प्रत्येकानं ठेवण गरजेच बनलय.
 
व्हिडिओ पाहा..
 

 

 

 

First Published: Tuesday, July 10, 2012, 22:29


comments powered by Disqus