Last Updated: Thursday, July 26, 2012, 17:45
www.24taas.com, मुंबई इगतपुरीचं फार्म हाऊस आणि लैला खानचे कसे झाले हत्याकांड. लैलाच्या हत्याकांडाचे केवळ सर्च ऑपरेशन आणि परवेझनं हत्याकांड केलं या पेक्षाही या सा-या कहाणीमध्ये आणखीनं एक साक्षीदार आहे, स्वताहा अबोल राहूनही खूप काही बोलणारं अर्थातच इगतपुरीचं फार्म हाऊस.. ज्या फार्म हाऊसमध्ये हे सारं हत्याकाडं घडल.. त्य़ा फार्म हाऊसच्या नजरेतून पाहिलं की दिसतात ती आणखीन काही रहस्य.. यावरच थेट घेतलेला वेध, फार्म हाऊसचं रहस्य.
सिने अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्येचा उलगडा करण्यात अखेर क्राईम ब्रांचला यश मिळालय. या प्रकरणी काश्मीरमधून ताब्यात घेतलेला परवेझ टाक यानंच साथीदाराच्या मदतीनं इगतपुरीत हे हत्याकांड घडवल्याची कबुली दिलीय. इगतपुरीत सहा मानवी सांगाडेही पोलिसांनी जप्त केले असून, यात पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची हत्या झाल्याचं आता स्पष्ट झालय. लैलाची आई सलिना पटेल हिचा तिसरा नवरा परवेझ टाक यानचं हे हत्याकांड घडवून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालय
आवारातच गाडून टाकले, कसं घडलं हत्याकांड ?2 फेब्रुवारी 2011 रोजी लैला कुटुंबीयांसह इगतपुरीच्या फार्म हाऊसवर गेली होती.. यावेळी आरोपी परवेझही त्यांच्यासोबत होता.. सलिनाचा दुसरा नवरा असीफ शेख याच्याशी असलेल्या संबंधांवरुन यावेळी परवेझ आणि सलिना यांच्यात भांडण झालं.. त्यानंतर लोखंडी रॉडने परवेझनं सलिनाला मारलं.. त्यात तिचा मृत्यू झाला.. ही मारहाण लैला आणि कुटुंबीयांनी पाहिली.. त्यानंतर परवेझनं लोखंडी रॉडने सगळ्यांचीच हत्या केली..यानंतर फार्म हाऊसवर असलेला काश्मिरी नोकर शाकीर हुसैन याच्या मदतीनं त्यानं हे मृतदेह फार्म हाऊसच्या आवारात गाडले..
त्यानंतर परवेझ ओशिव-याच्या लैलाच्या फ्लॅटमध्ये आला.. त्या ठिकाणाहून त्यानं मौल्यवान वस्तू ताब्यात घेतल्या..त्यानंतर तो पुन्हा इगतपुरीला गेला.. या ठिकाणी डिझेल जनरेटरमधील डिझेलचा वापर करुन त्यानं बंगला जाळून टाकला.. त्यानंतर त्यानं घोटी परिसरातून काश्मीरला जाण्यासाठी दोन ड्रायव्हरची व्यवस्था केली.. आणि तो लैलाची गाडी घेऊन त्याने काश्मीरला पळ काढला..
लैलाच्या याच गाडीनं परवेझ काश्मीरमध्ये अडचणीत आला.. परवेझकडे एवढी चांगली गाडी आली कुठून असा प्रश्न उपस्थित झाला.. आणि अखेर त्याला किश्तवाडमधून पोलिसांनी अटक केली...आणि या हत्याकांडाचा उलगडा झाला..लैलाचं लग्न झालेलं होतं आणि तिचा नवरा तिला घेऊन दुबईला स्थायीक होण्याच्या विचारात होता, अशी माहितीही पोलिसांनी यावेळी दिलीय..

परवेझ टाकच्या कबुली जबाबानंतर बॉलीवुड अभिनेत्री लैला खानच्या खुनाच रहस्य उलगडत गेल.. जम्मू कश्मीर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या परवेझनं मुंबई क्राईम ब्रांचसमोर इगतपुरीतल्या हत्याकांडाची माहीती दिली.. आणि त्यानंतर सुरु झाला लैला खानसह सहा जणांच्या हत्याकांडाचा शोधतपास.. मुंबई क्राईम ब्रांचच्या सर्च ऑपरेशनच्या प्रत्येक टप्प्यावर झी २४ तासची टिम त्या ठिकाणी हजर होती.. तीही अर्थात एक पाऊल पुढे..
गेल्या काही दिवसापासून एक रहस्य बनलेल्या बॉलीवुड अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटूंबियाचे मृत्युचे रहस्य आता उलगडत चाललय.. पण अनेक शोध तपास करुनही याचा थांगपत्ता लागत नव्हता. पण याप्रकरणी अटकेत असलेल्या परवेझने जम्मू काश्मीर पोलिसांना लैला खान संदर्भात माहिती द्यायला सुरुवात केली आणि लैलाचा शोध जावून संपला इगतपुरीच्या या फार्म हाऊसजवळ.. मंगळवारी १० जूनला परवेझला घेऊन मुंबई क्राईम ब्रॉंच या प्रकरणाचा अखेरच्या तपासाला सुरुवात करणार हे नक्की झाल.. आणि म्हणूनच इगतपुरीचं हे फार्म हाऊस पुन्हा एकदा चर्चेत आल.
झी २४तासच्या टिमनं सोमवारी 9जूनला या फार्महाऊसच्या पोलिस तपासाचा आढावा घेतला होता. दिनांक ९ जून आणि यानंतर सुरु झाली ती पोलिस तपासाची खरी शोधमोहीम मंगळवारी १० जूनला सकाळच्या धुक्यातून वाट काढत मुंबई क्राईम ब्रांच, नाशिक पोलीस आणि आरोपी परवेझ टाक इगतपुरीत लैला खानच्या बंगल्यावर पोहोचले. एरवी थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेलं इगतपुरी एव्हाना चांगलंच तापलं होतं. लैला खानच्या बंगल्यावर पोहोचताच सुरू झालं सर्च ऑपरेशन.
कुठे सापडले मानवी सांगाडे? लैलाच्या या बंगल्याशी अतिरेक्यांचे संबंध असल्यानं विशेष काळजी घेण्यात येत होती. संपूर्ण बंगल्याला पोलिसांचा वेढा पडला होता. दोन किलोमीटरवरचा परिसर सील करण्यात आला होता. याच बंगल्यात लैला आणि तिच्या कुटुंबीयांचे मृतदेह पुरल्याचं परवेझ टाकनं सांगताच पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन सुरु केलं. इगतपुरीच्या द-याखो-या, झाडंझुडपं अक्षरशः पिंजून काढली जात होती. परवेझ टाक क्षणाक्षणाला वेगवेगळी माहिती देत पोलिसांना गोंधळात टाकत होता. त्यातच पावसाला उसंत नव्हती.... खोदकाम सुरु असतानाच पावसानंही हजेरी लावल्यानं अनेक अडचणी येत होत्या. पण कुठल्याही परिस्थितीत दिवस बुडण्याआधी या प्रकरणाचा छडा लावायचाच, असा चंगच पोलिसांनी बांधला होता.... लैला खानच्या बंगल्याला काही महिन्यांपूर्वी आग लावल्यानं बरंच काही नष्ट झालं होतं. त्यामुळे एखाद्या वस्तूचा बारीकसारीक तपास केला जात होता. अखेर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमाराला पोलिसांना मोठा पुरावा हाती लागला.
इगतपुरीतील लैला खानच्या बंगल्याजवळ टॉयलेट सेफ्टी टॅक आणि जवळच्या परिसरात सहा सांगाडे सापडले.याच ठिकाणी कपड्यांनी भरलेली पुरून ठेवलेली बँगही सापडली. सलग काही तासांच्या मेहनतीनंतर पोलिसांना मोठं यश मिळालं.... आता हेच पुरावे दहशतवादाशी जोडलेले आणखी काही खुलासे समोर आणणार आहेत. लालाच्या फार्महाऊसवर सहा सांगाडे सापडले असले तरी हे सारे हत्याकांड का घडवलं गेल याची कहाणीही रहस्यमय आहे.. संतापाच्या भरात परवेझने हे कृत्य केल असलं तरी यामागचं खर कारण अजुनही गुलदस्त्यातच आहे अस म्हणायला प्रचंड जागा निर्माण होतेय. अशाच काही कारणावर नजर बॉलीवुड अभिनेत्री लैला खान, तिची आई सेलिना, तिची बहिण आणि भाऊ अशा सहाजणाचं हत्याकांड झाल्याचं आता सिद्ध झालय.. लैला खान गेल्या १५ महिन्यापासून गायब होती.. लैलाच्या सावत्र वडिलांनी परवेझनेच लैलाचं हत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली होती. आणि या सा-याचं मृतदेह इगतपुरीच्या जंगलात पुरले असल्याची शंकाही व्यक्त केली होती.. पोलिसांनी सा-याचा तपास सुरु करत अखेर इगतपुरीच्या लैला खानच्या फार्म हाऊसमधून सहा मानवी सांगाडे ताब्यात घेतले. आणि पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले ते परवेझ खानच्या कबुलीजबाबाला.. पण पोलिसांसमोर लैला संबधित अन्य काही प्रश्नांची उत्तर शोधायचीय.. परवेझने खुनाची कबुली देत, इगतपुरीत दाखवलेल्या सांगाडेमुळे लैलाच्या हत्याकांडातील सारे रहस्य आता समोर येतय.

सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार परवेझने संतापाच्या भरात हे सार हत्याकांड घडवून आणलय.. परवेझने लैलाची आई सेलिना हिची हत्या केली आणि त्या सुडातच लैला खानची तिच्या भाऊ बहिणांसह हत्या करण्यात आली होती. परवेझने आपल्या मित्रासोबत हे हत्याकांड घडवून आणल.
पण हा सारा कबुलीजबाब परवेझ देत असला तरी या परवेझच्या बोलण्यावर संपुर्णत विश्वास ठेवणही संशयास्पद ठरु शकतं.. कारण या कहाणीतही एक विसंगती दिसतेय. परवेझच्या म्हणण्यानुसार लैलाची आई सेलिना हिची हत्या संतापाच्या भरात झालीय.. जर हा प्रकार खरा असेल तर मग बाकिच्या सदस्याना याचा प्रतिकार का केला नाही या विषयाचाही पोलिस तपास घेतायत.. आईच्या मृत्युनंतर त्याचा प्रतिकार करणा-या लैलाच्या मृत्युतलं नेमकं कारण शोधणही महत्वाचे आहे.. संपुर्ण कुटूंबाला आपण रागाच्या भरात मारलेय यामधली विसंगती, लैलाची संपत्तीचा स्पष्टपणे दर्शवतेय.
परवेझ लैला प्रकरणात सुरुवातीपासुन आपली विधान बदलत राहीलाय हे विशेष.. आणि याला आधार म्हणजे लैला खानच्या गाडीचे किश्तवाडमध्ये सापडणं असो..अशा अनेक गोष्टीमधून लैलाचा खूनाची कारणाच रहस्य वाढल होतं. याच रहस्याच्या शोधात पोलिसानी इगतपुरीहून जॉनी गिल्डर आणि मेहबूब शेख या दोन वाहनचालकांना अटक केली होती. या दोंघावर लैलाच्या हत्येचा आणि लैलाची गाडी इगतपूरीहून बाहेर काढण्याचा आरोप ठेवण्यात आलाय.. गाडी नेण्या-या एका ड्रायव्हरचा जबाब हा संशय आणखीनच वाढवत होता.
मुंबई पोलिसांच्या लैला खान संदर्भातल्या पत्रकार परिषदेत लैलाच्या खुनाच रहस्य उलगडलं गेलं असल तरी या हत्याकांडतील आणखीनही काही कारणांचा शोध सुरुच राहणार आहे.. कारण लैलाची इगतपुरीसह मुंबईत असलेल्या करोडोच्या संपत्तीवर मालकी कोण सांगणार हेही अजून गुलदस्त्यातच आहे..

लैला खान.. आणि तिच्या मृत्युचं गुढ उकललय.. पण या सा-या सांगाड्याना आपल्या जागेत पुरुन घेणारं इगतपुरीचं फार्म हाऊस पोलिस तपासात आता पुराव्यानी बोलायला सुरुवात झालीय.. या प्रकरणात अनेक धक्कादायक माहीती ही इगतपुरीच्या फार्म हाऊसमधून समोर आलीय.. पण अस जरी असलं तरी या फार्म हाऊसचे रहस्य हे आता आणखीनच गुढ होत चाललंय.
सुमारे अडीजशे पोलीस, एक डझनभर पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि डॉग स्क्वॉड मिळून इगतपुरीच्या फार्म हाऊसशी जुळलेले दहशतवादाचे धागेदोरे सोडवण्याचा प्रयत्न करत होते. हे तेच फार्म हाऊस आहे ज्यात सहा सांगाडे सापडले असले तरी अनेक रहस्य गाडली गेली आहेत.. ज्या स्फोटानं मागच्या वर्षी सप्टेबंर महिन्यात दिल्ली हादरुन गेली होती. त्या स्फोटाचा कट लैला खानच्या याच फार्म हाऊसमध्ये शिजला गेल्याचं सागण्यात येतय.. याच बंगल्यात डॉ. वसीम आणि लष्करच्या अतिरेक्यांनी दिल्ली स्फोटांचा कट आखला होता. त्यावेळी लैलाही तिथे उपस्थित होती. या बैठकीनंतर या बंगल्याला रहस्यमय रित्या आग लागली. दहशतवादी कारवायांचे पुरावे मिचवण्यासाठीच ही आग लावल्याचा संशय आता अधिकच बळावू लागलाय.. या सा-या घटनांदरम्यान लैला बॉलीवुडमधील आपल्या स्थानासाठी धडपड करत होती. लैला खानला बॉलीवुडमध्ये ब्रेक देणारे दिग्दर्शक राकेश सावंत या काळात बंगल्यावर पोहोचले होते. त्यावेळी या फार्म हाऊसवर काही संशयास्पद काश्मिरी तरुणही सावंत यांना दिसले होते. त्याचबरोबर युएईमधल्या काही लोकांशीही लैलानं राकेश सावंत यांची ओळख करुन दिली होती. त्या लोकांबरोबर शस्त्रधारी बॉडीगार्डसही होते. या लोकांनी सावंत यांना काळा पैसा देऊन सिनेमा तयार करण्याची ऑफरही दिली होती.

परवेझ टाकच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी इगतपुरीमध्ये सर्च ऑपरेशन केलं.. या शोधमोहिमेत सहा मानवी सांगाडे सापडले.. मुंबई क्राईम ब्रांचच्या सर्च ऑपरेशननंतर हत्याकांडचे रहस्य उलगडलं असल तरी या इगतपुरीच्या फार्म हाऊसमध्ये दिल्ली बॉम्बस्फोटासह अनेक दहशतवादी कारवायांचे कनेक्शनाचं गुढ कधी उकलणार हाच खरा प्रश्न आहे
बॉलीवुड अभिनेत्री लैला खान हत्याकाडांची उकल जरी मुंबई क्राईम ब्रॉचने केली असल्याचा दावा केला असला तरी लैलानं एवढी संपत्ती कशी मिळवली याच्याबद्दलही तपासमोहीम सुरु आहे.. लैलाची बॉ़लीवुडमधली नौका ही गंटागळ्या खात असली तरी लैलाचं अंडरवर्ल्डमधलं स्थान मात्र पक्क होत.. आणि या सा-यामागे लैलाचा हवालाच्या व्यवहारात थेट सहभाग होता का याचीच आता चाचपणी सुरु झालीय.
नाशिक मधील इगतपुरीच्या या फार्म हाऊसमधील एकावर एक रचलेल्या आणि इतरत्र पुरलेल्या सांगाड्यामुळे बॉलीवुड अभिनेत्री लैला खानच्या मृत्युचे रहस्य आता उलगडलय.. परवेझचा चेहरा जरी समोर आला असला तरी या प्रकरणातील सहका-याची आणि अन्य मास्टरमाईंडची माहिती समोर येण्याबद्दलचा तपास वेगानं सुरु आहे. आणि हे सारं रहस्य़ लैला खानच्या ओशिवरामधील फ्लॅटमध्ये सापडलेल्या १००० फोटोंमुळे जास्तचं वाढलय. लैलाच्या या फोटोंमध्ये अनेक आयएस ऑफिसर, बॉ़लीवुड सेलिब्रिटी आणि अनेक बिल्डरांचाही समावेश आहे.. लैला ही एक बॉ़लीवुडमधली स्ट्रगलींग अभिनेत्री असल्यांनं तिचे अनेक पार्ट्यांना येणं जाणं असायची.. त्या पार्ट्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या गाठीभेटी होत.. आणि त्यावेळी या सा-यांबरोबर लैला फोटोही काढायची.. पण या फोटोंमागचे रहस्य काय हे अजूनही गुलदस्त्यातच आहे..

कारण लैला खानचं नाव पोलिसांच्या तपासात हवाला कांडावर जावून पोहोचत असल्यामुळे या सेलिब्रिटीचा आणि लैलाचा संबध केवळ पार्ट्यांमधल्या फोटोपुरताच होता का याचा तपास घेतला जातोय.. आणि म्हणूनच लैला ही हवाला काडांतील एक सुत्रधार होती की शिकार बनली होती या प्रश्नांचे उत्तर सर्वप्रथम शोधण महत्वाचे आहे.. लैला खानच्या आईचे हवाला कांडातील हस्तकांशी संबध असल्याचा यापुर्वीही उघड झाल होतं... लैला खानचे बॉलीवुडमधलं स्थान हे जरी डळमळीत असल तरी अंडरवर्ल्डमधील आपलं स्थान हळूहळू घट्ट करण्यात लैला यशस्वी झाली होती.. लैलाचे बॉलीवुडमधील करीयर ही छोटीच राहीली होती.. २००८ साली प्रदर्शित झालेल्या वफा या सिनेमात लैलानं सुपरस्टार राजेश खन्नासोबत काम केलं होतं.. काही म्युझिकल अल्बममध्येही तीनं काम केल होतं.. पण एवढ असतानाही लैलाची संपत्ती मात्र वादग्रस्त होती म्हणूनच ही संपत्तीही लैलाच्या मृत्युचे कारण असू शकते याबद्दल पुष्टीही मिळतेय..
लैलाची एकूण संपत्ती ही सुमारे तीन कोटींच्या घरात असल्याचं बोललं जातय.. लैलाचा मुंबईत ओशिवरा येथे दीड कोटीचा फ्लॅट आहे.. अंधेरी लोखंडवाला परिसरात ४० लाखांचा फ्लॅट आहे. मिरा रोडमध्येही ४० लाखाचा फ्लॅट आहे.. त्याचप्रमाणे वादग्रस्त बनलेला इगतरपुरीचं फार्म हाऊस हे ही ७० लाखाचे आहे. लैलाच्या या संपुर्ण सांपत्तिक स्थितीवर नजर टाकल्यास लैलाकडे एवढी संपत्ती कशी आली हा प्रश्न उपस्थित होतोय.. आणि म्हणूनच लैला खानचे आणि हवाला कनेक्शनची चर्चा आता जास्त व्हायला सुरुवात झालीय.
First Published: Thursday, July 26, 2012, 17:45