वीणा, राखी आणि लैला खान!

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 16:53

लैला खान या अभिनेत्रीच्या खूनाचं गूढ पूर्णतः उकललंही नसलं, तरी बॉलिवूडमध्ये या घटनेवर सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. लैला खान आणि दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना घेऊन काढलेल्या ‘वफा’ या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सावंतच या मर्डर मिस्ट्रीवर सिनेमा बनवणार आहेत.

लैलाच्या फार्म हाउसवर आरोपीसह पोलीस

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 17:06

लैला खानच्या प्रकरणात सखोल तपासाच्या दृष्टीकोनातून मुंबई क्राइम ब्रांचची टीम इगतपुरीत दाखल झालीय. लैला खानच्या फार्म हाउसवर मुख्य आरोपी परवेझ टाकसह सर्व साक्षीदार आणण्यात आलेत.

इगतपुरीतील फार्म हाऊसचं रहस्य...

Last Updated: Thursday, July 26, 2012, 17:45

इगतपुरीचं फार्म हाऊस आणि लैला खानचे कसे झाले हत्याकांड. लैलाच्या हत्याकांडाचे केवळ सर्च ऑपरेशन आणि परवेझनं हत्याकांड केलं या पेक्षाही या सा-या कहाणीमध्ये आणखीनं एक साक्षीदार आहे, स्वताहा अबोल राहूनही खूप काही बोलणारं अर्थातच इगतपुरीचं फार्म हाऊस.. ज्या फार्म हाऊसमध्ये हे सारं हत्याकाडं घडल.. त्य़ा फार्म हाऊसच्या नजरेतून पाहिलं की दिसतात ती आणखीन काही रहस्य.. यावरच थेट घेतलेला वेध, फार्म हाऊसचं रहस्य.

अनैतिक संबंधातून लैलासह कुटुंबियांची हत्या

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 17:54

लैला खान आणि तिच्या कुटुंबियांबद्दल सगळ्यांनाच एक उत्सुकता लागून राहिली होती. आज मुंबई क्राईम ब्रान्चचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी या सगळ्या प्रकरणावरचा पडदा बाजुला सारलाय. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची हत्या केल्याची कबुली परवेझ टाकनं दिलीय. ही हत्या कशी आणि का करण्यात आली, हे आज उजेडात आलंय.

अखेर बंगल्यानं उलगडलं रहस्य...

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:23

अभिनेत्री लैला खानच्या हत्येचं गूढ आता उकललं आहे. काल तिच्या इगतपुरीच्या बंगल्याच्या परिसरात सहा सांगाडे सापडल्यानंतर आता तिच्या बंगल्यात चाकू आणि लोखंडी रॉड सापडलेत. याच हत्यारांनी लैला आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या या हत्यारांनी निर्घृणपणे करण्यात आल्याचं समोर येतंय.

परवेझ टाकने जबाब फिरवला

Last Updated: Monday, July 9, 2012, 12:34

लैला खान हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या सध्या ताब्यात असलेल्या परवेझ टाकनं जबाब बदलत खळबळजनक खुलासा केलाय. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची इगतपुरीतल्या बंगल्यात हत्या केल्याचा दावा परवेझ टाकनं केलाय.

परवेझ टाक आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Last Updated: Monday, July 9, 2012, 10:52

अभिनेत्री लैला खान हत्याप्रकरणाताला प्रमुख आरोपी परवेझ टाकला काल रात्री मुंबईत आणण्यात आलं. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्येचा परवेझवर आरोप आहे. हत्येचा कबुलीजबाबही परवेझ टाकनं काश्मिर पोलिसांना दिला होता.

लैलाचा अंडरवर्ल्ड प्रवेश...

Last Updated: Thursday, July 5, 2012, 23:43

लैलाचे आणि दाऊदच्या डी कंपनीचे संबध होते याची कुणकुण पोलिसांना लागली होती आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी लैला भारताबाहेर जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, त्यातच तिला अवैध मार्गानं मिळवलेली संपत्ती हीच तिचा काळ बनून आल्याची चर्चा आता सुरु झालीय.

लैला आणि दाऊदचे संबंध...

Last Updated: Thursday, July 5, 2012, 23:31

बॉलीवूड अभिनेत्री म्हणून स्ट्रगल करत पाय रोवणा-या लैलानं अंडरवर्ल्डमधलं आपलं स्थान मात्र भक्कम केलं होत. गेल्या दीड वर्षापासून लैला आणि तिचे कुटूबं कुठे गायब झाले याचा पोलिस शोध घेत होता. मात्र अचानक परवेझच्या झालेल्या खुलाशांन लैला खान या नावामागचे रहस्य आता आणखीनच गडद झालंय.

आतंकवादी 'लैला'चं स्वप्न...

Last Updated: Thursday, July 5, 2012, 23:28

दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या चर्चेनं वादग्रस्त ठरलेली लैला. ती भारतीय होती की पाकिस्तानी याबाबतही बरीच चर्चा झडली. तिच्या रहस्यमयरित्या गायब होण्यानंही खळबळ उडाली. ही लैला खान होती तरी कोण?

दीड वर्षानंतर उलगडलं 'लैला'चं रहस्य

Last Updated: Thursday, July 5, 2012, 23:21

इगतपुरीहून बेपत्ता झालेली अभिनेत्री लैलाखान हिची आई आणि बहिणीसह हत्या करण्यात आलीय. लैला खान हे नाव बॉलीवुडमध्ये गाजलं होतं ते तिच्या अंडरवर्ल्ड कनेक्शसाठी.

रहस्य 'लैला'चं...

Last Updated: Thursday, July 5, 2012, 23:12

वादग्रस्त अभिनेत्री लैला खान हिची कुटुंबीयांसह हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती पुढे आलीय. लैलाच्या सावत्र वडिलांना जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानं ही धक्कादायक माहिती दिली. विशेष म्हणजे संपत्तीसाठी लैलाचा बॉयफ्रेंड आणि सावत्र वडिलांनी ही हत्या केल्याची शक्यता आहे.

लैला मै लैला

Last Updated: Friday, July 6, 2012, 21:43

लैला खान पाकिस्तानी नव्हे, भारतीयच!

Last Updated: Thursday, July 5, 2012, 14:48

लैलाचा जन्म मुंबईच्या गोळीबार भागात झाला. लैलाचे पहिले वडील नादिर पटेल त्यांची पहिली पत्नी सरिनासह गोळीबार भागात राहत होते. झी 24 तासच्या हाती जी रेशन कार्डची प्रत लागलीय तिच्यात लैलाचं खरं नाव रेश्मा असं नमूद केलंय.

लैला खान आतंकवादी होती?

Last Updated: Thursday, July 5, 2012, 16:03

फेब्रुवारी २०११ पासून आपल्या कुटुंबासकट बेपत्ता झालेली बॉलिवूड स्टार लैला खान हिची जम्मू-काश्मिरमध्ये हत्या करण्यात आली असावी असं सांगण्यात येत आहे.

अभिनेत्री लैला खानचा झाला खून?

Last Updated: Thursday, July 5, 2012, 11:15

गेल्या एक वर्षांपासून गूढरित्या गायब झालेल्या पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं लैलाच्या एक नातेवाईकासह दोघांना अटक केली आहे.

पाकिस्तानची 'लैला' इगतपुरीत !

Last Updated: Thursday, January 26, 2012, 21:00

पाकिस्तानची बेपत्ता अभिनेत्री लैला खान आता एटीएस आणि आयबीच्या रडावर आली आहे. लैला राहत असलेल्या इगतपुरीचे फार्म हाऊस आता एटीएसच्या चौकशीचं केंद्र बनलं आहे.