Last Updated: Friday, July 20, 2012, 21:46
====================================================================================.पश्चिम रेल्वेचे १०० हून अधिक मोटरमन आज अचानक रजेवर गेलेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेचे वाहतूक कोलमडलीय. काल रात्री विदर्भ एक्सप्रेसनं एका लोकलला धडक दिल्यामुळे मध्य रेल्वेही विस्कळीत झाली होती. तसंच वडाळ्यामध्येही मोनोरेलच्या कामाचा काही भाग कोसळला. या वेगवेगळ्या घटनांचा परिणाम मात्र आज सकाळपासून वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. शुक्रवारचा दिवस असल्यामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना मात्र याचा चांगलाच फटका बसलेला दिसून आला. आता रेल्वेच्या खोळंब्यामुळे यात आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. याच खोळंब्यात तुमचाही खोळंबा झाला असेल तर आम्हाला कळवा. रोडवर, रेल्वे स्टेशनवर सध्या जी दृश्यं दिसत आहेत, ‘झी २४ तास’च्या माध्यमातून इतरांशीही शेअर करा... तुम्ही आम्हाला फोटोंच्या साहाय्यानं माहिती पाठवू शकता... ठिकाणाचं नाव, वेळ, वाहतुकीची माहिती आणि फोटो आम्हाला पाठवा... =====================

=====================

‘चर्चगेट’वर उसळला संतापाचा ‘लाव्हा’मोटरमेननं अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकरांचे ‘मेगाहाल’ झाले... पश्चिम रेल्वे प्रवाशांचा उद्रेक चर्चगेट स्टेशनवर पाहायला मिळाला. कित्येक तास खोळंबलेल्या प्रवाशांनी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर तोडफोड केली.
=====================

रिक्षा-टॅक्सी चालकांची मनमानी सुरूपश्चिम रेल्वेच्या मोटरमन सामूहिक रजेवर गेल्यामुळे प्रवाशांचा एकप्रकारे मानसिक आणि शारीरिक
छळच सुरू झालाय. प्रवाशांच्या खोळंब्याचा फायदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी उठवण्यास सुरूवात
केलीय. त्यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच गोची झालीय.
=====================

पावसाचा तडाखा, कोकण रेल्वे ठप्पकोकणात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने याचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. विलवडे ते वैभवाडी दरम्यान सायंकाळी ४.३० वाजता कोकण रेल्वे रूळावर दरड कोसळ्याने कोकण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. वैभवाडीत जनशताब्दी थांबून ठेवण्यात आली आहे. रूळावरील माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
=====================

ट्रेनी मारून नेताहेत वेळ, प्रवाशांच्या जीवाशी खेळमुंबईत पश्चिम रेल्वेच्या २०० मोटरमनने अचानक संप पुकारल्यानंतर प्रशासनाने शिकाऊ
मोटरमनच्या हातात लोकल देऊन मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे.
दर अर्धा तासाने एक लोकल सोडण्यात येत असून याचा संपूर्ण ताबा शिकाऊ म्हणजे ट्रेनी
मोटरमनच्या हातात आहे.
=====================

फक्त अकरा जणांसाठी, लाखोंना धरलं वेठीला…पश्चिम रेल्वेचा अनागोंदी कारभार सुरूच आहे. प्रवाशांना वेठीस धरून मोटरमेन आपल्या मागण्या पूर्ण करू पाहत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मात्र फार हाल होत आहेत. प. रेल्वचे अधिकारी मनविंदर सिंग यांची मनमानी सुरू असल्याचे मोटरमेनचे म्हणणे आहे.
=====================

गेल्या वर्षीही ६० मोटरमनने केला होता संप!गेल्या वर्षी सहकाऱ्याला बडतर्फ केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील पश्चिम रेल्वेचे ६० मोटारमन अचानक संपावर गेले होते. त्यामुळे चर्चगेटहून एकही गाडी सुटू शकली नव्हती. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते.
=====================

रेल्वे वाहतूक खोळंबली, २०० मोटरमन अचानक रजेवरमुंबई पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक कोलमडली आहे. अचानक १०० मोटरमन हे रजेवर गेले आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मनमानीविरोधात मोटरमन हे रजेवर गेले आहेत.
=====================
फोटो पाठविण्याची पद्धत
ऑनलाईन फॉर्मवर तुमच्या बातमीची संपूर्ण माहिती द्या. . खालील Choose file/ browse बटनवर क्लिक करून
आपल्या डेस्कटॉपवरील फोटो निवडा. फोटो अटॅच करा आणि ओपनवर क्लिक करा. फॉर्मवर संपूर्ण माहिती
भरल्यावर सब्मिटवर क्लिक करा. बातमीची संपूर्ण माहिती देणे अत्यावश्यक आहे. तुमची बातमी आमच्यापर्यंत
पोहचताच त्याबाबत लवकरात लवकर पावलं उचलण्याचा आम्ही प्रयत्न करू. फॉर्म भरताना मराठी,
हिंदी किंवा इंग्रजी भाषेचाच वापर करावा.
First Published: Friday, July 20, 2012, 21:46