`मोनो`ला होळीची सुट्टी, आज बंद!

Last Updated: Monday, March 17, 2014, 11:32

मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली मोनो रेललाही होळी आणि रंगपंचमीनिमित्तानं सोमवारी (दि. १७ मार्च) रोजी सुट्टी मिळणार आहे.

मुंबईकर सण्डेनंतर `मोनो डार्लिंग`ला विसरले

Last Updated: Monday, February 3, 2014, 15:38

मुंबईकरांनी संडे पाहून मोनोडार्लिंगची भेट घेतली, वेळआधी जाऊन मोनोडार्लिंगसाठी महाप्रतिक्षा केली. मोनोडार्लिंगला भेटताच फोटोही काढले, अख्खा रविवार मोनोच्या प्रेमात घालवला.

मोनोरेलचा फर्स्ट डे, फर्स्ट शो... तोही हाऊसफुल्ल

Last Updated: Sunday, February 2, 2014, 22:45

मुंबईकरांच्या सेवेत नव्याने रूजू झालेली मोनो रेल पाहण्यासाठी आज पहिल्याच दिवशी तोबा गर्दी उसळली... भारतातील पहिल्याच मोनो रेल सफरीचा आनंद लुटण्यासाठी पहाटेपासूनच मुंबईकर रांग लावून उभे होते. परिणामी मोनो रेलचे व्यवस्थापन पुरते कोलमडले आणि त्याचा फटका उत्साही प्रवाशांना बसला. मात्र, मोनोरेलचा फर्स्ट डे, फर्स्ट शो... हाऊसफुल्ल झाला.

जगातील पहिली मोनोरेल कधी धावली?

Last Updated: Sunday, February 2, 2014, 18:00

मुंबईत देशातील पहिली आणि जगातील दुसरी लांब अंतराची मोनोरेल १ फेब्रुवारी २०१४ धावली. मात्र, याआधी पहिली मोनोरेल कधी आणि कुठे धावली हे तुम्हाला माहित आहे का? दोन शतकांपूर्वी रशियात जगातील पहिली मोनोरेल धावली.

पहिल्याच दिवशी मोनोरेल उशीरा उठली

Last Updated: Sunday, February 2, 2014, 13:11

मुंबईत आजपासून मोनोरेल सुरू झाली आहे, मात्र पहिल्याच दिवशी सकाळी सात वाजता सुटणारी पहिली मोनोरेल उशीराने निघाली आहे. यामुळे रविवार पाहून मोनोरेल्वेची झोप उशीरा उघडली की काय?, अशी खमंग चर्चा आहे.

मुंबईत पहिली मोनो रेल धावली...खास मोनोचा रिपोर्ट

Last Updated: Saturday, February 1, 2014, 21:04

देशातील पहिल्या मोनो रेलला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज हिरवा कंदील दाखवला. चेंबूत ते वडाळा अशी मोनो आज अखेर धावली. त्यामुळे अनेक महिन्यांपासूनची प्रतिक्षा संपली. आता कमी पैशात एसीचा प्रवास मुंबईकरांना घडणार आहे.

उद्यापासून करा `मोनोरेल`नं प्रवास!

Last Updated: Friday, January 31, 2014, 09:16

देशातली पहिली आणि बहुप्रतिक्षित मोनो रेल अखेर एक फेब्रुवारीपासून मुंबईत धावणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  हे एक फेब्रुवारीला मोनो रेलला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

मोनोरेलचे सारथ्य करणार मराठी तरूण

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 08:54

भारतातील पहिली मोनो रेल ही वडाळा -चेंबूर मार्गावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. या मोनोरेलचे सारथ्य करण्यासाठी ४३ जणांची टीम सज्ज झाली आहे. यात बहुतांश मराठी तरूण आहेत.

मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 09:45

मुंबई कधी धावणार मोनो, असा प्रश्न आता विचारला जाणार नाही. कारण ही मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मोनरेलचे आवश्यक असणारे एमएमआरडीला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे मोनोरेल धावण्यासाठी सज्ज झाली आहे. मोनोचा पहिला प्रवास हा चेंबूर-वडाळा असणार आहे.

दिवाळीनंतर सुरू होणार मुंबईकरांची `मोनो`वारी!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 08:12

अखेर अनेक डेडलाईन पार करणारी मोनो रेल्वे आता नोव्हेंबरमध्ये सुरु होणार असल्याचा छातीठोक दावा ‘एमएमआरडीए’नं केलाय.

पुढील महिन्यात मुंबईकरांना मोनोरेल यात्रा

Last Updated: Monday, October 7, 2013, 23:34

अखेर मुंबईकरांना मोनो रेल्वेमधून प्रवास करण्याची संधी नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे. मोनो रेल्वेची सर्व कामे पूर्ण झाली असल्याचा छातीठोक दावा एमएमआरडीएने केला आहे.

मोनोसाठी मुंबईकरांची प्रतीक्षा आणखी लांबणीवर!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 14:20

मुंबईकरांचे डोळे लागलेल्या ‘मोनोरेल’च्या उद्घाटन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलंय. आता मोनोरेलच्या उद्घाटनासाठी १५ सप्टेंबरचा मुहूर्त मिळालाय

मोनोरेलचं `वेट अॅन्ड वॉच...`

Last Updated: Friday, March 1, 2013, 08:23

‘मोनोरेल’च्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल एमएमआरडीएने ‘थांबा आणि वाट पहा’ अशी भूमिका घेतली आहे.

मोनोरेल... पावसाळ्यात येणार धावून

Last Updated: Friday, February 15, 2013, 09:37

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात मुंबईकरांचे मोनो रेल्वेतून प्रवास करण्याचं स्वप्न साकार होणार आहे.

वाहतुकीचा खेळखंडोबा

Last Updated: Friday, July 20, 2012, 21:46

मोनोरेलच्या कामाचा काही भाग कोसळला

Last Updated: Thursday, July 19, 2012, 23:57

मुंबईत वडाळ्यात मोनोरेलच्या कामाचा काही भाग कोसळलाय. वडाळ्याच्या शांतीनगर भागात ही घटना घडलीय. ढिगा-याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

मोनोरेल डिसेंबरमध्ये मुंबईत धावणार

Last Updated: Saturday, May 19, 2012, 13:49

मुंबईच्या गर्दीवर मात करण्यासाठी मोनोरेलचे स्वप्न दाखविण्यात आले आहे. मात्र, निर्धारीत वेळेत मोनोरेल धावू लागलेली नाही. केवळ चाचपणीच सुरू आहे. आता पुन्हा डिसेंबरचे स्वप्न मोनोचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत वाट पाहण्याशिवाय हाती काही नाही.

मुंबईत मोनोरेल चाचणी यशस्वी !

Last Updated: Saturday, February 18, 2012, 13:13

मुंबईकरांना प्रतिक्षा असलेल्या मोनोरेलची चाचणी यशस्वी झाली आहे. वडाळा डेपो ते वडाळा आयमॅक्स मार्गावर चाचणी घेण्यात आली. सुमारे दोन किलोमीटरपेक्षा जास्त मार्गावर मोनोरेलची चाचणी घेण्यात आली.यावेळी रेल्वेचे वरीष्ठ तंत्रज्ञ उपस्थित होते.

मुंबई मोनोरेलला भाजपचा 'रेड सिग्नल'

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 10:13

मुंबईतल्या मोनोरेलची होणारी चाचणी पुन्हा रद्द करण्यात आली आहे. ही चाचणी बुधवारी होणार होती, परंतु भाजपनं निवडणूक आयोगाकडं चाचणीविरोधात तक्रार केल्यानंतर मोनोरेलची होणारी चाचणी रद्द कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.