Last Updated: Thursday, August 2, 2012, 15:05
----
‘अण्णा! सशक्त राजकीय पर्याय द्या’टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी आता होऊ लागलीये. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे.
----
टीम अण्णांना दिल्ली पोलिसांची तंबीजनलोकपाल बिल मंजूर करावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या टीम अण्णांना पोलिसांनी दमबाजी करण्यास सुरूवात केली आहे. तु्म्ही भाषण करताना वातावरण बिघडवू नका, असे सांगत तंबीची भाषा केली आहे.
----
आत्महत्या नाही तर बलिदान – केजरीवालगेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अशक्तपणा जाणवू लागलाय.
----

अण्णांनी मागितली माफी, ‘आंदोलन इथेच थांबवेन’टीम अण्णांच्या वतीने अण्णा हजारे यांनी माफी मागितली आहे. अण्णा हजारे यांनी पत्रकारांची माफी मागितली, आणि दु:खही व्यक्त केलं. अण्णांच्या समर्थकांनी मीडियाशी हुल्लडबाजी केल्याने अण्णांनी स्वत: माफी मागितली आहे.
----

टीम अण्णांची पत्रकारांशी गैरवर्तणूक, माफी मागाभ्रष्टाचार विरोधात जंतरमंतर वर उपोषणासाठी बसलेल्या टीम अण्णांनी मीडियालाच टार्गेट केले आहे. ब्रॉडकास्ट एडिटर असोसिएशन (BEA) ने टीम अण्णाने पत्रकारांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीसाठी माफी मागण्यास सांगितले आहे.
----

शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनेकेंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करण्यात आलीत. अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी ही निदर्शनं केली आहे.१५ भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आणि लोकपालच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे आणि टीम अण्णा जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे.
----

सोनिया-राहुल यांना आव्हान म्हणजे हत्तीशी टक्कर!आज अण्णा हजारे जंतर मंतरवर उपोषणाला बसल्यापासून गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गेले चार दिवस टीम अण्णांच्या उपोषणाच्या आंदोलनाची हेटाळणी करणाऱ्य़ा काँग्रेसलाही आता त्याची दखल घेणं भाग पडलं आहे
----

अण्णा आले, गर्दीही आली!जनलोकपालच्या आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून सकाळपासूनच उपोषणाला सुरूवात केलीय. अण्णांनी सरकारला दिलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय त्यामुळे अण्णाही टीम अण्णासोबत उपोषणात सहभागी झालेत.
----

अण्णा आजपासून बसणार उपोषणाला…अण्णांकडून सरकारला दिला गेलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय. त्यामुळे दिल्लीत जंतरमंतरवर आजपासून अण्णा हजारे उपोषण सुरू करणार आहेत.
----
पंतप्रधानांच्या घरासमोर अण्णा समर्थकांचं आंदोलनदिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर अण्णा समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिस आणि काही आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. जंतरमंतरवर टीम अण्णांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस असूनही सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.
----

गर्दी नको तर दर्दी हवेत – अण्णा हजारेअण्णा हजारेंनी आपल्या भाषणात ‘गर्दी नको दर्दी लोक पाहिजेत’ असं म्हणत लोकपाल बिलाविषयी सरकारच्या उदासिनतेवर टिका केलीय. सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचं अण्णांनी यावेळी सांगितलंय.
----

----
जनतेच्या हितासाठी राजकारणात – अण्णा हजारेजनता म्हणत असेल तर राजकारणाचा विचार केला जाईल. याबाबत माझी काही हरकत नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
----

‘जंतर-मंतर’वरून गर्दी ‘छू मंतर’!अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय.
----

टीम अण्णांच्या आंदोलनाचा पहिला दिवसप्रभावी लोकपाल विधेयक आणि १४ मंत्र्यांविरोधात कारवाई या मागणीसाठी टीम अण्णानं जंतर-मंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलंय. सरकारनं दरवेळी फसवणूक केल्याचा आरोप करत, यावेळी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषणावरून हटणार नसल्याचा इरादा टीम अण्णानं व्यक्त केलाय.
---- 
‘जंतरमंतर’वर सरकारविरोधात एल्गारनुकतंच पद ग्रहण करणारे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा सदस्य आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे. स्वत: उपोषण करित नसले तरी अण्णाही यावेळी जंतरमंतरवर सदस्यांसोबत उपस्थित राहिले आहेत.
----
एका बाजुला टीम अण्णांच्या जंतर मंतरवर होत असलेल्या आंदोलनामुळं देशातलं वातावरण ढवळून निघण्याची चिन्ह असतानाच दुसऱ्या बाजुला ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकानं केलेल्या एका स्टींग ऑपरेशनमुळं खळबळ उडालीय. अण्णांच्या आंदोलनाला येणारा पैसा हा नेमका कुठल्या मार्गाने येतो, याची माहिती अण्णांच्या सहकाऱ्यांनी स्टींग ऑपरेशनमध्ये केल्याचा दावा ‘द वीक’ने केलाय.
अण्णांचं सरकारला ४ दिवसांचा अल्टिमेटम15 भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा उद्यापासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहे. यानिमित्तानं अण्णा हाजरेही दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी सरकाराला चार दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. तोपर्यंत मागणी पूर्ण झाली नाहीत, तर अण्णाही उपोषणाला बसणार आहेत.
----
अण्णा दिल्लीकडे रवानाभ्रष्टाचाराच्या मुद्यावर टीम अण्णा पुन्हा आक्रमक झालीय. उद्यापासून टीम अण्णांचं जंतरमंतरवरच्या नियोजित आंदोलनाला सुरूवात होणार आहे. यासाठी आज सकाळीच अण्णा दिल्लीकडे रवाना झालेत.
अण्णा आणि खुर्शिद यांची गुप्त भेटअण्णा हजारेंनी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्याबरोबर गुप्त भेट झाल्याचं मान्य केलंय. त्यामुळं आता नवा वाद निर्माण झालाय. पारदर्शकतेचा आग्रह धरणा-या अण्णांच्या गुप्त भेटी कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.
राष्ट्रपती प्रणवदा भ्रष्टाचारी – टीम अण्णादेशाचे नवनियुक्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप टीम अण्णांनी केला आहे. मुखर्जी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असून २५ जुलैला ते सर्वासमक्ष जाहीर करणार असल्याचं टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
---- 
टीम अण्णांचा उपोषणाचा मार्ग मोकळाअखेर टीम अण्णांच्या उपोषणाला परवानगी देण्यात आलीय. अण्णांना दिल्लीत जंतरमंतरवर २५ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान उपोषण करण्याची परवानगी दिली गेलीय. यापूर्वी पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
----

अण्णा-बाबा करणार ‘निर्णायक’ आंदोलनलोकपाल, काळापैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी पुन्हा एकत्रित निर्णायक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. ९ ऑगस्टपासून रामदेवबाबा आंदोलन करणार आहेत.
---- 
टीम अण्णा सदस्यावर जीवघेणा हल्लाआरटीआय कार्यकर्ता आणि टीम अण्णामधील सदस्य अखिल गोगोई वर काही काँग्रेस कार्यकार्त्यांनी आसाममधल्या नलबाडीमध्ये शुक्रवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला.
----
टीम अण्णाची मुस्कटदाबी, उपोषण नाकारलेटीम अण्णांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारलीये. 25 जुलैपासून टीम अण्णांचे सदस्य जंतरमंतरवर उपोषणाला बसणार होते. मात्र दिल्ली पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारलीये
----

देशाचा राष्ट्रपती निष्कलंक हवा- अण्णा हजारेदेशाचा राष्ट्रपती निष्कलंक असावा असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी व्यक्त केलं आहे. देशाचा राष्ट्रपती हा देशाचा आदर्श असतो. अण्णा हजारे यांनी राष्ट्रपती निवडणूकिबाबत त्याचं मत वक्त केलं.
---- 
अण्णांकडून पुन्हा पीएम टार्गेटकेंद्र सरकार विरोधात टीम अण्णा आणि बाबा रामदेव असा संघर्ष पहायला मिळणार आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी सरकारवर केलेले आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळलेत. त्यानंतर आज अण्णांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
---- 
‘भ्रष्टाचाराविरोधात सचिन फटकेबाजी कर’सचिन तेंडुलकरनं खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्याचं अभिनंदन केलंय. भ्रष्टाचाराविरोधात सचिननं संसदेत फटकेबाजी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, आम्ही संसदेबाहेरुन पाठिंबा देऊ, अशी ग्वाही अण्णांनी यावेळी दिली आहे.
--- 
टीम अण्णांना पंतप्रधानांचं प्रत्युत्तरपंतप्रधानांवर टीम इंडियाने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना पाच पानांचं सविस्तर पत्र पाठवण्यात आलं आहे.
---- 
‘पंतप्रधानांवर विश्वास नाही’, अण्णांचा उद्वेगभ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्यामुळे दुःखी झालेल्या अण्णा हजारेंनी आपला आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. सध्या अण्णांचा दौरा रत्नागिरी येथे चालू आहे.
----

आरोप सिद्ध झाले तर राजीनामा – पीएमटीम अण्णांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तर दिले आहे. टीम अण्णांनी केलेले आरोप बेजबाबदारपणे केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेऊ, असेही ते म्हणाले.
---- 

‘अण्णा! सशक्त राजकीय पर्याय द्या’
टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी आता होऊ लागलीये. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे.
First Published: Thursday, August 2, 2012, 15:05