Last Updated: Tuesday, August 7, 2012, 18:41
www.24taas.com दोन वर्षापूर्वी प्रसिद्धी झोतात असलेल्या फिजाचा मृत्यू झालाय... तिच्याशी लग्न करण्यासाठी एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांने चक्क धर्मांतर केलं होतं...त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली होती...पण फिजाच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत..
फिजा मोहम्मद उर्फ अनुराधा बाली...एक असा चेहरा जिच्या सौंदर्याची आणि प्रेमप्रकरणाच्या किश्शांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा झालीय..तसेच प्रसार माध्यमांनीही तिला भरपूर प्रसिद्धी दिली होती...आता पुन्हा एकदा फिजा चर्चेत आलीय..पण यावेळचं कारण मोठ धक्कादायक आहे...फिजाचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यू विषयी गूढ निर्माण झालंय..
चंदीगडजवळ असलेल्या मोहालीत सेक्टर ४८ - सीमध्ये असलेलं घर क्रमांक २१६...याच घरामध्ये फिजाचा मृतदेह आढळून आलाय...तिचं शव ज्या अवस्थेत आढळून आलं होतं ते पाहून तिच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसलाय...फिजाचा मृत्यू का आणि कसा झाला? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत....
पण या घटनेची खबर सर्वात आधी फिजाच्या काकांना मिळाली होती... फिजाच्या काकांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडून त्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी तिथ फिजाचा मृतदेह आढळून आला...पोलिसांनी फिजाच्या बेडरूममध्ये प्रवेशकेला तेव्हा सकाळचे साडे नऊ वाजले होते..
फिजाचा मत्यू खून की षडयंत्र ?
या घटनेमुळे फिजाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून तिच्या मृत्यू विषयी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत..फिजाचे काका पोलिसांसमवेत जेव्हा फिजाच्या घरात गेले तेव्हा घराच्या दरवाजाला आतून कडी लावली नव्हती..
मर्डर मिस्ट्री घरात आणखीही कोणी होतं का ?फिजाने मृत्यूपूर्वी दरवाजा उघडा ठेवला होता का?फिजा कोणाची वाट पाहत होती ?फिजाच्या घराबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती...तसेच तिच्या मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यामुळे नाकाला रुमाल लावण्यावाचून पोलिसांसमोर दुसरा पर्याय उरला नव्हता...घरातून येत असलेली दुर्गंधी आणि मृतदेहाची अवस्था पहाता फिजाचा मृत्यू ३ - ४ दिवस आधी झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय..
मृतदेहची दुर्गंधी येत होतीमृतदेह अवस्था वाईट३ - ४ दिवसांपूर्वी झाला असावा मृत्यू 
फिजाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे..माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन यांच्या पासून विभक्त झाल्यानंतर ती एकटीच रहात होती..त्या एकटेपणातून तिने ते टोकाचं पाऊल उचललं असावं असाही संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.....पण कही गुपितं लपविण्यासाठी फिजाची हत्या तर करण्यात आली नाही ना ? असा सवाल उपस्थित केला जातोय..
जगाच्या विरोधात जाऊन फिजा आणि चाँद यांनी लग्न केलं खरं पण काही काळातच त्यांच्या प्रेमाला ग्रहण लागलं आणि त्यातूनच चंद्रमोहन फिजाला सोडून गेले..त्यानंतर ती एकटीच रहात होती...पण तिचा मृत्यू कसा ? तिने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला हे अद्यापही कोडंच आहे..
फिजाचा मृत्यू झालाय... जवळपास दोन वर्षापूर्वी सतत प्रसिद्धीत राहिलेली फिजाचं हे शेवटचं छायाचित्र आहे...फिजाच्या या शेवटच्या छायाचित्रामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत..
हे छायाचित्र जरा निरखून पहा... निळ्या रंगाचा सूट फिजाने घातला असून तिचा चेहरा काळा ठिक्कर पडला आहे....तिचा चेहरा अत्यंत खराब झाला असून तो ओळखणं कठीण होऊन बसलंय....ज्या फिजाचा चेहरा कॅमे-यात टिपण्यासाठी कॅमेरामन धडपडत असत तोच हा चेहरा आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही..ज्या ठिकाणी फिजाचा मृतदेह पडला आहे त्याच्या आसपासचा सगळा भाग काळा झालाय..तसेच तिच्या डोक्या जवळचा भागही जरा जास्तच काळा झाला होता..ज्या घरात फिजाचा मृतदेह आढळून आलाय त्या घरी फिजा चंद्रमोहन यांच्याशी लग्न केल्यानंतर रहायला आली होती...लग्नानंतर दोघीही इथंच राहात होतो...मात्र पुढ त्यांच्यातले संबंध बिघडले आणि चंद्रमोहन आपल्या घरी निघून गेले..
चंद्रमोहन सोडून गेल्यानंतर फिजा या घरात एकटीच राहात होती..त्यानंतर हळूहळू संबंध आणखीच बिघडले आणि त्यामुळेच फिजाने प्रमाणापेक्षा जास्त औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.. आलीकडच्या काळात फिजाचं आपल्या शेजा-यांशी अनेकवेळा भांडण झालं होतं..ते प्रकरण पोलिसांत जाऊन पोहोचलं होतं..फिजाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रमोहन तिला सोडून गेल्यानंतर तिच्या स्वभावात बराच बदल झाला होता....मृत्यूपूर्वी सहा दिवस आधी फिजाने आपल्या काकांना फोन केला होता..
फिजा मानसिकरित्या कोलमडून गेली होती....पण प्रश्न हा आहे की फिजाला मृत्यूची चाहूल लागली होती? गेली १५ वर्ष पंजाबच्या राजकारणात चंगलं बस्तान बसवलेल्या फिजाला काही गुपीत माहिती होतं? एखादं गुपीत लपविण्यासाठीच तर तिचा खून करण्यात आला नाही ना ?फिजा कुणासाठी अडचण ठरु लागली होती? अशा अनेक प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत असून तिच्या मोबाईल फोनच्या डिटेल्सवरून चौकशी केली जात आहे...पोलीस चौकशीनंतरच फिजाच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार आहे..
फिजाच्या मृत्यूविषयी शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहे...आणि पोलीस तपासानंतर सगळं काही स्पष्टही होईल....पण काही वर्षापूर्वी प्रसिध्दी झोतात आलेली फिजा आता दिसणार नाही...पण फिजा आणि चांदची कहानी एखाद्या हिंदी सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी आहे...
काही वर्षांपूर्वीची ही घटना आहे...तेव्हा चांद हे चंद्रमोहन होते...आणि आमदारही होते...

एका शहरात ते एकटेच फिरत असतांना एका ज्यूस सेंटरवर एक सुंदर चेहरा त्यांच्या नजरेस पडला..त्या दिवशी तारीख होती २४ जुलै....आणि मग काय ? चंद्रमोहनचा प्रत्येक दिवस त्या सुंदर चेह-याचा शोध घेण्यात जाऊ लागला..कारण पहिल्याच नजरेत चंद्रमोहनवर त्या सुंदर चेह-याने अशी काही जादू केली होती कि त्यामुळे जणू त्यांना तिचं वेड लागलं होतं...तो सुंदर चेहरा म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून ती होती अनुराधा बाली ...चंद्रमोहनशी निकाह लावल्यानंतर तिनं फिजा नाव धारण केलं होतं....पण ती सुंदरी कोण होती हे सुरुवातीला चंद्रमोहन यांना माहित नव्हतं...त्या सुंदरीच्या प्रेमात पडल्यानंतर चंद्रमोहनने आपल्या मनाची अवस्था आपल्या मित्रांकड बोलून दाखवली...त्यानंतर त्यांच्या मित्रांनी अनुराधी बालीचा शोध घेतला आणि तिची माहिती चंद्रमोहनला दिली..तसेच फोननंबरही दिला...अनुराधाचा फोननंबर मिळाल्यानंतर चंद्रमोहनने तात्काळ तिचा फोन डायल केला..कारण तिच्या प्रेमात तो वेडा झाला होता..फोनवरून त्यांनी आपली ओळख सांगितली...ज्या दिवशी चंद्रमोहनने फिजाला फोन केला होता त्या दिवशी नेमका तिचा वाढदिवस होता...एका खास दिवशी खास व्यक्तीशी झालेली ओळख एकदम खास बनली..आणि त्यानंतर भेटी-गाठींचा सिलसिलाच सुरु झाला..काही दिवसांनी चंद्रमोहनने आपल्या ह्रदयाची व्यथा तिला सांगितली..तसेच आपल्या प्रेमाची कबुली दिली..त्यानंतर त्यांच्या प्रेमप्रकरण सुरु झालं...पण म्हणतात ना प्रेमाच्या फुलाला काटेही असतात...तोच अनुभव या प्रेमी युगुलालाही आला.. चंद्रमोहन समोर अनेक अडचणी होत्या...ते हरियाणाचे उपमुख्यमंत्री होते..एका मोठ्या राजकीय व्यक्तीचे पुत्र तसेच विवाहीत होते..पण अनेक अडचणी असतांनाही प्रेमात अकंठ बुडलेलं प्रेमी युगुल एक महिन्यासाठी भुमीगत झालं....त्यावेळी त्यांनी एक निर्णय घेतला होता..जगाच्या सगळ्या रितिरिवाजांना मोडीत काढण्याचा....विरोधाची भिंत तोडण्याचा... इतके दिवस आपल्या मनात जे दाबून ठेवलंय ते सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता...आपलं एकमेकांवर प्रेम असल्याचं त्यांना सांगायचं होतं...त्यामुळचं चंद्रमोहन हे चांद मोहम्मद बनून तर अनुराधा फिजा बनून जगासमोर आली
चांद आणि फिजा यांची लव्हस्टोरी जगासमोर आली असली तरी फिजाचं पूर्व आयुष्यही काही वेगळचं होतं...फिजा चंदीगडमध्ये वकीली करत होती...सौंदर्यामुळेच तिची कॅप्टन अमरिंदर सिंगांशी ओळख झाली.. आणि त्यानंतर ती थेट राज्याची असिस्टन सॉलिसिटर जनरल बनली...पण निवडणूकीनंतर कॅप्टनचं सरकार जाताचं अनुराधा बाली पुन्हा वकीली करु लागली..त्याच काळात तिची चंद्रमोहनशी ओळख झाली..चंद्रमोहन विवाहीत होते त्याच प्रमाणे अनुराधाचही लग्न झालं होतं....पण असं असतांनाही दोघांनी प्रेमाचा मार्ग निवडला होता..हरियाणाच्या राजकारणात त्या घटनेला मोठं महत्व प्राप्त झालं होतं..चंद्रमोहनच्या सांगण्यावरून अनुराधाला पद मिळालं होतं..पण त्याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही...चंद्रमोहन आणि अनुराधा या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरु असल्याचं माहित असतांनाही कुणी अक्षेप घेतला नाही...अनुराधाच्या प्रेमात बुडालेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी हरियानाचे नेते भजनलाल यांनीही कधी प्रयत्न केला नाही...त्यामुळे त्याचे परिणाही सर्वांसमक्ष होते.. हरियाणाचं राजकारण दोन प्रमुख जातींवर आधारीत आहे....चांद आणि फिजाचं प्रेमप्रकरण त्यामध्ये अडकलं होतं..सुरुवातील त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या फायद्या तोट्याचा हिशोब केला गेला आणि त्यानंतर त्याला राजकीय मुलामा देण्य़ात आला...
गितीका एका खासगी विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून कामाला होती..पण गेल्या काहि दिवसांपासून ती अस्वस्थ होती...आणि त्यातूनचं तिनं गळफास लावून आत्महत्या केली...
गीतिकाच्या मृत्यूलाही एक मंत्रीच जबाबदार असल्याचं उघड झालंय..
हरियाणातील सहकार मंत्री गोपाल कांडा यांनी तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचं आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय...

23 वर्षाच्या या सुंदर तरुणीचं नाव आहे गितीका शर्मा... एका खासगी विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून ती कार्यरत होती.. रविवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी पोलिसांना एक खबर मिळाली.. दिल्लीतील अशोक विहारच्या फेज ३ परिसरात एका तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती..पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरात एका पंख्याला गीतिकाचं मृतदेह लटलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला..या घटनेनंतर गितिकाच्या नातेवाईकांनी हरीयाणाचे सहकारमंत्री गोपाल कांडा यांच्यावर थेट आरोप केलाय..मंत्री कांडा यांनी गितिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गितिकाच्या नातेवाईकांचा आऱोप आहे..
गितीकाच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.. गितीकावर कोणाचा दबाव होता? गितिकाला कोणती चिंता सतावत होती?आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय गितीकाने का घेतला? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे....पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये गितिकाने सगळी हकीगत नमुद केली आहे..गितिकाने त्या चिठ्ठी दोन नावांचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे..त्यापैकी एक नाव हे हरियाण सरकारमधील हायप्रोफाईल मंत्री गोपाळ कांडा यांचं आहे....त्या चिठ्ठीतील मजकूरावरून पोलिसांनी गोपाळ कांडा यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे..
आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जीवन जगणा-या गितीकाला आपलं जीवन संपवण्याचा अघोरी निर्णय घ्यावा लागलाय..पण आपल्या जीवनाचा अंत करण्यापूर्वी तिने काही पुरावे मागे ठेवले आहेत....गितीकाच्या आत्महत्येमुळे आणि तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे....पोलिसांनी गितीकाच्या घरातून तिची डायरी, लॅपटॉप आणि मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे..पोलीस तपासात पोलिसांना त्याची बरीच मदत होणार आहे..पण या प्रकरणात हायप्रोफाईल लोकांच्या नावाचा समावेश असल्यामुळे तपास करतांना पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे..
भवरी देवीचंही असचं काहीसं झालंय... राजस्थानातील माजी मंत्री महिपाल मदेरणाशी तिची जवळीक झाली...आणि पुढे त्यांच प्रेमप्रकरण सुरु झालं....पण अचानकपणे भवरीदेवी बेपत्ता झाली...आणि तिचा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं.. भवरी देवीच्या खून प्रकरणी मंत्री महिपाल मदेरणाला गजाआज व्हावं लागलं होतं..

राजस्थानातल्या लोकगीतांच्या व्हीडीओ अल्बममध्ये भवरी देवी या अभिनेत्रीनं अभिनय केला होता..देवी देवता आणि पारंपरीक लोकगीतांमध्ये अभिनय करण्यासोबतच तिचं एक आणखीही रुप होतं..भवरी देवी जोधपूरच्या जाडीवाडामधल्या आरोग्य केंद्रात एएनएम म्हणून कार्यरत होती....एक नर्स म्हणून कार्यरत असतांनाही ती बक्कळ संपत्तीची मालकीन होती..भवरीदेवीकडं जोधपूरमध्ये एक अलिशान घरं तसेच बोरुंदा परिसरात दोन मजली बंगलाही होता...या व्यतिरिक्त भावरी देवीकडं लक्झरियस कारही होती....
त्या कारसाठी एक ड्रायव्हरही नियुक्त केला होता..पारंपरीक गीतांसाठीचा अभिनय आणि नर्सच्या नोकरीतून तिला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी प्रसिद्धी तिला राजकीय वर्तुळातल्या तिच्या संबंधांमुळेही मिळाली होती....भवरीदेवी खूप महत्वाकांक्षी होती तसेच तिला राजकीय महत्वाकांक्षाही होती..त्यामुळे ती हळूहळू राजकारणातल्या दिग्गजांच्या संपर्कात आली होती..आणि त्यातूनच तिची राजस्थानच्या माजी मंत्र्याचा मुलगा मलखांबसिंहशी मैत्री झाली..मलखांबसिंहची मैत्री कॅबिनेट मंत्री महिपाल मदेरणाशी होती..त्यामुळे भवरीदेवीची ओळख महिपालशी झाली....
निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळविण्यासाठी तिने जवळीक वाढविल्याचं बोललं जातं होतं...पण मंत्र्यांशी असलेली ओळख तिच्या कामी आली नाही...त्यामुळे तिने भाजपकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला....भाजप आमदार अर्जून नेहवालच्या म्हणण्यानुसार सरकार विरोधात आपल्याकडं पुरावे असल्याचं भवरी देवीनं म्हटलं होतं..पण त्या बदल्यात तिने निवडणुकीत तिकीटाची मागणी केली होती....
भवरी देवीला राजकारणात यश मिळालं नाही पण महिपाल मदेरणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याची राजकीय वर्तुळ चर्चा होती...पण त्यानंतर अचानकपणे ती बेपत्ता झाली..तिच्या अपहरणामागे मंत्री मदेरणाचा हात असल्याचा आरोप भवरीच्या पतीने केला..आणि त्यानंतर भवरीची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं..या प्रकरणाची देशभर बरीच चर्चा झाली...त्यामुळे याप्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवण्यात आला...सीबीआयने दोघा आरोपींना अटक केली तसेच महिपाल मदेरणा यांनाही गजाआड व्हावं लागलं.
First Published: Tuesday, August 7, 2012, 18:41