एटीएमचा 'पोरखेळ' - Marathi News 24taas.com

एटीएमचा 'पोरखेळ'

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईच्या मानखुर्द भागात एटीएम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या  दोन अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. रात्रीच्या वेळी मजबूत एटीएम मशीन त्या अल्पवयीन मुलांनी तोडलं. यासाठी त्यांना फक्त दहा मिनीटं लागली. पोलिसांच्या सतर्कतेमुळं तब्बल २१ लाख रुपये चोरण्याचा त्यांचा डाव उधळला गेला.
 
मानखुर्द परिसरातल्या एक्सीस बॅंकेच्या एटीएम सेंटरमध्ये रात्री दोन वाजून ४८ मिनीटांच्या सुमारास दोन १४ वर्षाची मुलं चेहरा लपवून, हातात दगड घेऊन दाखल झाली.  त्यांचं वय १४ असलं तरी त्यांनी चक्क एटीएम मशीनच फोडलंय. चोरीचा हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
 
दगडाने एटीएमवर हल्ला करून त्यानंतर फक्त काही सेकंदातच चोरांनी वरचा भाग उघडला होता. एटीएमच्या वरच्या भागात पैसे नव्हते. परिणामी त्यांनी खालचा भागात तोडायला सुरु केलं. यावेळी दुसरा चोर दर दोन मिनीटांनी एटीएमच्या बाहेर जाऊन नजर ठेवत होता. एटीएम तोडण्यासाठी त्यांनी धारधार हत्यार बरोबर ठेवलं होतं. पुढील दहा मिनीटात त्यांनी एटीएम तोडलं खरं. मात्र गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोचल्यानं चोरीचा डाव उधळला गेला.
 

First Published: Wednesday, December 21, 2011, 16:03


comments powered by Disqus