झी २४ तासचा दणका, बोगस खत विकणारा गजाआड - Marathi News 24taas.com

झी २४ तासचा दणका, बोगस खत विकणारा गजाआड

www.24taas.com, उस्मानाबाद
 
बनावट आणि विना परवाना खत विक्री करणाऱ्या एका आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचं उस्मानाबादमध्ये उघड झालं आहे. उस्मानाबादमधल्या अंबेजवळगा परिसरातल्या शेतकऱ्यांनी बनावट खत विक्रेत्याला पकडून दिले मात्र उस्मानाबाद पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यानं त्याला सोडून देण्याचा प्रयत्न केला.
 
झी २४ तासनं पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी सांगली जिल्ह्यातून एका आरोपीला पकडलं आहे. गोरख पाटील हा युवक मायक्रोजेन या कंपनीची खतं या शेतकऱ्यांपर्यंत घरपोच पोहोचवायचा. कमी किंमतीतली ही खतं बनावट असल्याचं लवकरच शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सापळा रचून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
 
पोलिसांनीही पंचनाम्यावर शेतकर्यांच्या सह्या घेतल्या. मात्र दुसऱ्याच दिवशी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी त्याला सोडून दिल्याचं कळलं. पोलिसांनी तयार केलेल्या पंचनाम्याची प्रत झी २४ तासच्या हाती लागली आहे. झी २४ तासचा पाठपुरावा आणि संतप्त शेतकऱ्यांमुळे पोलिसांनी पुन्हा त्या आरोपीला अटक केली.
 

First Published: Tuesday, January 3, 2012, 19:43


comments powered by Disqus