मुंबईत पुन्हा एकदा... समुद्री तस्करी - Marathi News 24taas.com

मुंबईत पुन्हा एकदा... समुद्री तस्करी

www.24taas.com, मुंबई
 
परदेशातुन समुद्रमार्गे येणारा करोडो रुपयांचा माल लंपास केला जातो,हे उघडकीस आल आहे. मुंबई बंदरापासुन काहीच अंतरावर छोट्या छोट्या बोटींवरुन या मालाची चोरी केली जाते आहे. ही चोरी कस्टम,पोलीस आणि जहाजाचं कॅप्टनचं संगनमत असल्याशिवाय होऊ शकत नाही.
 
या जहाजावर असलेल्या पिवळ्या मटरच्या गोणी  छोट्या छोट्या बोटींवर टाकण्यात येतात. मुंबई बंदरापासून जवळच अशी समुद्र तस्करांची चोरी सुरु आहे. फ्रान्स आणि कॅनडाहून  डाळीचा माल एमव्ही अलबरेली आणि एमव्ही फ्रेंडली सी नावाच्या मालवाहू जहाजांवरुन इंडिया पल्सेस एंड ग्रेन असोसिएशनसाठी आयात केला जात होता. हा माल मुंबई बंदरावर यायच्याआधी समुद्र तस्करांनी त्यातला ५ कोटींचा माल चोरला होता.
 
खरं तर जहाजावरचा काही माल समुद्र तस्करांनी चोरणं हे रोजचच झालं आहे पण जहाजावरची २००० टन पिवळी मटर चोरुन नेणं धक्कादायक आहे. या चोरीची तक्रार यलो गेट पोलिसांकडे नोंदवली. तसंच गृहमंत्री आर आऱ पाटील यांचीही भेट घेण्यात आली त्यांनी याचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवला आहे. समुद्र तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि असे चोरीचे प्रकार रोखण्यासाठी आता खरच कडक पावलं उचलण्याची वेळ आली आहे.
 

First Published: Sunday, January 8, 2012, 18:13


comments powered by Disqus