झी२४तास 'वेबभरारी', पवारांनी उद्घाटन केले 'भारी' - Marathi News 24taas.com

झी२४तास 'वेबभरारी', पवारांनी उद्घाटन केले 'भारी'

www.24taas.com, मुंबई
 
मराठीतली पहिली वृत्तवाहिनी ठरलेल्या 'झी २४ तास'नं आता आणखी एक पाऊल पुढं टाकत नव्या क्षेत्रात पदार्पण केल आहे. 'झी २४ तास'ने आपली इंटरनेट वेबसाईट सुरु केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री  शरद पवार यांच्या हस्ते या वेबसाईटचं उद्धघाटन करण्यात आलं.
 
 
www.24taas.com या वेबसाईटवर आता तुम्ही अपडेट राहू शकाल. बातमीचा ध्यास, झी २४ तास. हे ध्येय ठेऊन झी २४ तासची इंटरनेट आवृत्ती कार्यरत झालेली आहे. वेबसाईट, फेसबुक तसचं ट्विटरवरही 'झी २४ तास'च्या बातम्या आता वाचकांना लगेचच पाहता येतील. या वेबसाईटमध्ये महाराष्ट्र तसेच देश-विदेशातल्या बातम्या तर पाहता येतीलच. याशिवाय स्पोर्ट्स, एन्टरटेन्मेंट यांचाही आस्वाद वाचकांना घेता येईल.
 
 
तसंच आरोग्य, सेक्स, भविष्य या विषयातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शनही या वेबसाईटवर उपलब्ध असेल. यासह सेलिब्रिटी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची विविध विषयांवरची मतं ब्लॉगर्स पार्कमधून तुम्हाला थेट वाचता येतील. तसचं महत्त्वाच्या बातम्यांचे व्हिडिओ आणि फोटो फिचरही या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकाल.
 

First Published: Thursday, January 26, 2012, 23:03


comments powered by Disqus