पाकिस्तानची 'लैला' इगतपुरीत ! - Marathi News 24taas.com

पाकिस्तानची 'लैला' इगतपुरीत !

www.24taas.com, इगतपुरी
 
पाकिस्तानची बेपत्ता अभिनेत्री लैला खान आता एटीएस आणि आयबीच्या रडावर आली आहे. लैला राहत असलेल्या इगतपुरीचे फार्म हाऊस आता एटीएसच्या चौकशीचं केंद्र बनलं आहे.
वर्षभरापूर्वी इगतपुरीत वास्तव्याला होती.  सह्याद्रीतल्या निर्जनस्थळी संशयितरीत्या बांधलेल्या फार्म हाऊसमध्ये लैला वास्तव्याला असल्यानं तिच्यावरील संशय बळावला आहे. विशेष म्हणजे लैला सॅटेलाईट फोनचा वापर करत असल्याचंही उघड झालं आहे.
 
निर्जनस्थळी बांधण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे हे फार्महाऊस जाळून टाकण्यात आलं आहे. त्यामुळं हे फार्म हाऊस आता चौकशीचं केंद्र बनलं असून लैला खान एटीएस आणि आयबीच्या रडारवर आहे.
 

First Published: Thursday, January 26, 2012, 21:00


comments powered by Disqus