'डिट्टो टीव्ही : 'झी'चे एक पाऊल आणखी पुढे - Marathi News 24taas.com

'डिट्टो टीव्ही : 'झी'चे एक पाऊल आणखी पुढे

www.24taas.com, मुंबई
 
एक खूशखबर! तुम्ही आता तुमच्या मोबाईल फोनवर तसंच लॅपटॉपवरसुद्धा लाईव्ह टीव्हीची मजा लुटू शकता. झी एन्टरटेनमेन्टच्या ‘झी डिजीटल मीडिया कंपनी’नं देशातला पहिला OTT म्हणजेच ओव्हर दि टॉप टीव्ही लॉन्च केलाय. याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं सर्वात स्वस्त म्हणजेच २९ रुपये महिना एवढं स्वस्त पॅकेज असणार आहे.
 
एखादी रंगतदार मॅच असो, की टीव्हीवरचा तुमचा आवडता प्रोग्रॅम. तुम्हाला हा कार्यक्रम आता मिस करावे लागणार नाहीत. अगदी चालता-चालताही तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रोग्रॅमची मजा लुटू शकणार आहात. ‘झी एन्टरटेन्मेंट’च्या ‘झी डिजीटल मीडिया कंपनी’ने ‘डीट्टो टीव्ही’ नावाची ही आकर्षक सेवा नुकतीच लॉन्च केली आहे. देशात पहिल्यांदा अशा प्रकारचा हटके प्रयोग होतोय. की ज्यामुळे तुम्ही कुठेही-कधीही मोबाईलवर, लॅपटॉपवर, डेस्कटॉप तसंच टॅब्लेटवरही लाईव्ह प्रोग्रॅमचा आनंद मनसोक्त लुटू शकता. याबरोबरच आणखीही काही स्पेशल सुविधा याद्वारे मिळणार आहेत. लाईव्ह प्रोग्रॅमबरोबरच ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ सेवेद्वारे तुम्ही तुमच्या फेव्हरेट फिल्म्स, प्रोग्रॅम तसंच एखाद्या रंगतदार मॅचचाही आनंद पुन्हा लुटू शकता.
 
डिजिटल क्वालिटीच्या या डिट्टो टीव्हीवर  सुरवातीला २१ चॅनल्स उपलब्ध असणार आहेत. तुमच्या पसंतीचा कुठलाही एक चॅनल निवडण्यासाठी तुम्हाला प्रति महिना २९ रुपये चार्ज असणार आहे. तर स्पोर्ट्स चॅनल्स वगळता इतर कोणत्याही तीन चॅनेलचं पॅकेज प्रतिमहिना ४९ रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. स्पोर्ट्स चॅनेलसह ७ चॅनेल्सचा एकत्रित पॅक ९९ रुपयांत मिळणार आहे. तुम्ही तुमच्या पसंतीचे ‘टॉप टेन एन्टरटेनमेन्ट चॅनेल्स’ही ९९ रुपयांत मिळवू शकता. मात्र, यात स्पोर्ट्स चॅनेलचा समावेश नसेल. या सर्व चॅनेल्सची प्रेक्षक एचडी क्वालिटीमध्ये मजा लुटू शकतात.
 

कंपनीने या आकर्षक डिट्टो टीव्हीसाठी वर्षभरात १० लाख ग्राहकांचं लक्ष समोर ठेवलंय. प्रत्येक वर्षी यामध्ये १० टक्क्यांनी वाढ होईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे. आगामी काळात डिट्टो टीव्ही ‘पे करा आणि आवडते व्हिडिओ मिळवा’, अशी अफलातून योजनाही आणण्याच्या विचारात आहे.

 


First Published: Thursday, March 1, 2012, 17:42


comments powered by Disqus