Last Updated: Wednesday, April 4, 2012, 23:21
www.24taas.com, मुंबई दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई ही आता अर्थतज्ञांचीच नाहीतर सर्वसामान्यांच बजेट कोलमडवणारी ठरलीय. खाद्यतेल असो कि पेट्रोलचे दर, बेस्टचा प्रवास असो वा हॉटेलींग... सगळ्याच गोष्टींचे दर महागलेयत.. सर्वसामान्याना आता दररोजचा खर्च करताना महिन्याचे नियोजन करणंही अवघड होऊन बसलय.. यावर आता सर्वसामान्य विचारतोय केवळ एकच सवाल.. सांगा कसं जगायचं?
देशाच्या नामवंत अर्थशास्त्रज्ञापासून ते एखाद्या मध्यमवर्गीय माणसापर्यंत सर्वानाच हा प्रश्न सतावतोय.. सांगा कसं जगायच.. दैनदिन जिवनातल्या असो वा खाण्याचे पदार्थ असो.. सर्वानांच सर्वच क्षेत्रातल्या महागाईचा सामना करावा लागतोय. केंद्राच्या आणि राज्याच्या बजेटमधल्या वाढीव करांच्या अमंलबजावणीन आता महागाईचा भडका जास्तच पेटणार आहे.
कशी आवरायची महागाई ? हतबल सरकार, जनता बेजार ! 
महागाईच दूखण आज प्रत्येक सर्वसामान्याला सतावतेय. देशाच्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ही दूसरी टर्म आहे. अर्थशास्त्रज्ञ अशी ओळख असणारे मनमोहन सिंग यानी देशाचा आर्थिक डोलारा सांभाळलाय का या प्रश्नांचे उत्तर शोधताना कदाचित आकडेमोड करावी लागेल पण देशात वाढलेला महागाईचा आलेख गेल्या काही दिवसात तक्ता मोडून नियंत्रणरेषेबाहेर चाललाय हि वस्तुस्थिती आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल असो वा नियोजन आयोगाचा अहवाल असो या सा-यातून केवळ कागदावरचे आकडे छान मांडले गेलेयत.. पण प्रत्यक्षात मात्र खिसा आणि घरच किचनचं बजेट मात्र केव्हाच कोलमडून प़डल आहे.
प्रणवदांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि सर्वसामान्यांना दिलासा तर नाहीच मिळाला, मिळाला तो केवळ महागाईचा धक्का.. राज्याच्या अर्थसंकल्पातही अजित पवारानी सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लावण्याचंच काम केलय. गेल्या काही दिवसापासून वाढलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्यालाचा सहन करावा लागतोय.. बेस्ट आणि ट्रेनच्या तिकीटापासून ते थेट 12 टक्के वाढलेल्या सर्व्हीस टॅक्सचे छुपे पडसाद आता दिसू लागले आहेत.
दूध 48 रुपयेगॅस सिलींडर 412रॉकेल 15पेट्रोल 74.56डिझेल 45.28 ही केवळ थेट किचनवर परिणाम करणा-या वस्तूची उदाहरण आहेत.. पण सर्वच क्षेत्रात आज महागाई वाढत चाललीय. किचनचं बजेटचं नाही तर आज नेमक स्वस्तात राहीलय काय अस विचारण्याची वेळ सर्वसामान्यांवर आलीय. पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दरामुळे वाहतूकीवर परिणाम आणि त्याचा परिणाम थेट मंडईत अस चित्र पहायला मिळतय.. भाजीपाल्याच्या किमतीवर परिणाम झाल्यामुळे सर्वसामान्यांना आता भाजी घेतानाही विचार करावा लागत आहे.
वस्तू दर(प्रती किलो)कोथिंबीर जुडी 25 ते 30भेंडी 72 ते 80फरसबी 60 ते 80गवार 80 ते 100घेव़डा 40 ते 60कारली 48 ते 60कोबी 25 ते 30ढोबळी मिरची 40 ते 50टॉमेटो 40 ते 80 
अर्थसंकल्पात अगोदरच हॉटेलिंगवर कर लावण्यात आलाय त्यामुळे बाहेरच्या खाणं म्हणजे खरोखरच श्रीमतांघरचं खाण बनलय. यात उरतो तो केवळ घरच्या खाण्याचा पर्याय.. पण गॅस सिलेंडर, भाज्या, दूध, तेल सर्व काही महागलय... राज्याच्या वित्तधोरणावर आम्ही लवकरच नियत्रण आणू असे दावे करणारे अनेकजण असतील पण या महागाईमुळे मेटोकूटीस आलेला सर्वसामान्य मात्र आज एकटा पडलाय हे वास्तव आहे....
देशभरात महागाईचा वणवा हळूहळू पेट घेत असताना त्यात आता खाद्यतेलाच्या किमतीही वाढत चालल्यायत. खाद्यतेलाच्या भडकत जाणा-या किमती हे नवं सकंट मानल जातय. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची वाढलेली मागणी, अपुरा पुरवठा आणि त्यातच रुपयाचं घसरतं जाणारं स्थान यामुळे खाद्यतेलाच्या किमती आणखीन भडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. देशाचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यानी मांडलेल्या बजेटमध्ये देशाच्या महागाईला जणू फोडणीच मिळाली होती. सर्वच भडकलेल्या वस्तूत आता खाद्यतेलांच्या किमंतीचीही भर पडलीय. अवघ्या महिन्याभरात वाढलेल्या खाद्यतेलाच्या किमतीचे पडसाद आता किचनपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारपर्यंत दिसतेय. महिन्याभरापूर्वी एक टन रिफाईण्ड सोयाबिन तेलाची किमत अडसष्ट हजार होती ती आता वाढून 72 हजारावर गेलीय. तर रिफाईण्ड मोहरीच्या तेलाच्या एक टनासाठी महिन्य़ाभरापूर्वी 74, 500 रुपये लागायचे ते वाढून 81,000 वर गेलय. सूर्यफूलासाठी हाच भाव 69,500 वरुन वाढून 72 हजारावर गेलाय. तर पामतेलासाठी महिन्याभरापूर्वी 57,000 लागायचे , त्याच पामतेलासाठी आता मात्र तब्बल 68 हजार मोजावे लागतायतं. खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतीचा विचार करता आता त्य़ाच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात झालीय.

अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्य़े दुष्काळाचं सावट असल्यानं सोयाबीनचे भाव वाढतायत. मलेशियात पाम तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं अन्य देशामध्येही किमती वाढू लागल्यायत.. मोहरीचं उत्पादन घटलयं आणि त्याच वेळी रुपयाच्या तुलनेत डॉलरला बळकटी आल्यानं भाव वाढत चाललेयत. त्यातच सट्टेबाजांनीही खाद्यतेलासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु केलेल्या प्रयत्नानं भाव वधारलेयत.. महागाईशी झगडत असलेल्या सर्वसामान्यांना आता खाद्यतेलाच्या वाढलेल्या भावांमुळे महागाईचा सामना कसा करायचा हा प्रश्न आणखीनच गंभीर बनलाय. सर्वच तेलांच्या किमतीत झालेल्या दरवाढीनं फोडणी आता महाग झालीय. भाज्या दुधापाठोपाठ तेलाच्या वाढलेल्या किमती य सर्वसामान्याना अडचणीत आणणा-या ठरल्यायत. गेल्या महिन्याभरात सर्वच तेलांच्या किमतीत 10 टक्यांची वाढ झालीय. आणि त्याचा फटका किचनला बसलाय. एकूणच वाढलेली मागणी, कमी झालेला पुरवठा, आकाशाला भिडलेली महागाई आणि सर्वसामान्याची गरज या सा-या चक्रात अडकला गेलाय तो केवळ सर्वसामान्य.
ज्या महागाईनं सर्वसामान्याना गेले अनेक दिवस घाम फोडलाय तीच महागाई पुन्हा सर्वसामान्यांना घाबरावयाला जणू उताविळ झालीय. बाजारात सगळ्याच गोष्टीच्या वाढलेल्या महागाईच्या आकड्यामुळे पुर्वीच्या स्वस्ताईच्या गोष्टी आता रंगू लागल्यायत.. कारण वाढलेल्या महागाईत नुसत दालफ्रायचा विचार केला तरी समोर येतात ते वाढलेल्या डाळीचे आकडे. देशाचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यानी देशाचा अर्थसंकल्प मांडला आणि सर्वसामान्याची महागाई कमी होण्याची आशा आता पुरती मावळलीय. या बजेटमध्ये मांडलेल्या नव्या तरतुदीचा प्रभाव मार्केटमध्ये पहायाला मिळतोय. मुळातच च्रकवाढ व्याजासारख्या वाढच चाललेली महागाई बजेटमधल्या तरतुदीने आणखिनच अक्राळविक्राळ बनत चाललीय. महागाईवर नियंत्रण आणण्याच्या सरकारच्या सर्वच कल्पना आता केवळ कागदावरच राहिल्याचं स्पष्ट होतयं. डाळीच्या वाढलेल्या किमती देखिल त्याचच उदाहरण मानल जातायत. गेल्या काही दिवसात डाळीच्या भावानं घेतलेली उसळी ही विरोधकांना आणि विरोधी राजखारणाना मिळालेली फोडणी मानली जातेय.. आणि म्हणूनच आता डाळींच्या किमतीवर निय़ंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवले जातायत. कारण सर्वच डाळीमध्ये गेल्या महिन्याभरात वाढ झालीय.
महिन्याभरातली महागाईउडिद डाळीत पाच ते सात रुपये किलो रुपयांची वाढ झाली. मसूर डाळीत किलोमध्ये चार ते सहा रुपयाची वाढ झाली. तूर डाळीत किलोमध्ये पाच ते सात रुपयांची तर चणा डाळीत किलोमध्ये दोन ते चार रुपयांची वाढ झाली आहे. मूग डाळीत किलोमध्ये पाच रुपयांची वाढ झाली.
डाळींच्या किमतीत वाढ
डाळ 1 मार्च 2 एप्रिल
उडीद 67 74
मसूर 71 76
तूर 85-90 90-95
चणा 72 74
मूग 75 80
डाळी या महानगरापासून ते छोट्या गावातल्या कुटूंबात हा नेहमीच्या जेवणासाठी लागणारा महत्वाचा विषय.. सर्वच डाळीमध्ये झालेल्या दरवाढीचा फटका गृहिणीना सहन करावा लागतोय. डाळीच्या या भाववाढीला मागणी-पुरवठ्याचा कारण महत्वाची ठरतंय. कृषि मंत्रालयाच्या एका अहवालानुसार 2011-12 मध्ये डाळींचे उत्पादन 182.4 लाख टनात घट होवून 172.8 लाख टन झालं होतं. यानुसार डाळीमध्ये दहा लाख टन उत्पादन हे मुळातच कमी झालय. एकूणच या सा-या गोष्टीचा विचार करता आणि देशभराच डाळीची मुळातचं असलेल्या मागणीचं प्रमाण पाहता सर्वसामांन्यासमोर वाढलेल्या महागाईतही त्याच दरानं हतबलपणे डाळी विकत घेण्याशिवाय पर्याय नसल्याचं निराशाजनक चित्र दिसतय

हॉटेल असो वा घर.. खमंग खाद्यपदार्थासाठी बटाटा आणि मसाल्याचा मोठ्या प्रमाणावर होतो. पण वाढलेल्या महागाईमुळे आता मसाले आणि बटाट्याच्या किमतीही गेल्या महिन्याभरात प्रंचंड वाढल्या आहेत. महागाईच्या वणव्यात किचनला सर्वाधिक फटका सहन करावा लागतोय. तेल, डाळीसारखाचं बटाट्याला दैनदिनं जीवनात महत्वाच स्थान आहे. आणि म्हणूनच बटाट्याची भाववाढीचा जाच सहन करावा लागतोय. पंजाबमध्ये गेल्या वर्षी झालेल्या बटाट्याच्या अतिरिक्त उत्पादनाचा फटका हा खुद्द बटाटे शेतक-याना बसलाय. गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाल्यामुळे बटाटे फेकण्याची वेळ शेतक-यांवर आलीय..पण आता मात्र बटाटेच्या किमती वाढू लागल्यायत
पंजाबमध्ये बटाट्याच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झालीय. बटाट्याची पन्नास किलोची गोणी काही महिन्यापुर्वी 250 रुपयाला मिळायची त्याची किमत आता वाढून 350 वर पोहोचली आहे. खराब हवामानाचा फटका हा बटाटा उत्पादनाला बसालाय. यामुळेच उत्पादनात तीस ते 35 टक्क्याची घट झालीय. मागील वर्षी झालेल्या अफाट उत्पादनामुळे यंदा नुकसान नको म्हणून शेतक-यानी बटाट्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच आज बटाट्याचे दर वाढत चाललेयत.. बटाट्याच्या वाढलेल्या किमतीमागे केवळ पंजाबच नाही तर उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा कमी झालेलं बटाट्याचे उत्पादन मानलं जातय. त्यातच वाढलेल्या छुप्या करांमुळे किचन बजेटमध्ये ताण येतोय. असाच महागाईचा सामना हा मसाल्याच्या पदार्थाच्या किमंतीसाठीही करावा लागतोय.
दोन महिन्यात वाढलेयत सर्वच मसाल्याचे दर वाढलेत. त्यामुळे सर्वच मसाल्याच्या दरात 10 ते 45 रुपयांची वाढ दिसून येत आहे.
तिखट दरवाढवस्तू (किलो) पुर्वी आताजीरे 170 190मेथी 35 40काळी मिरी 370 390लवंग 870 1100बडिशेप 80 100लाल मिर्ची 85 110 मसाल्याच्या भावातली हि दरवाढ वेगवेगळ्या चवीच्या मसाल्यासाठी खिशाला तिखट बनवतेय. बाजारात सर्वच महागाई वाढत असतानाही मसाल्याचे पदार्थ महागण्यामागे वेगळीच गणित असल्याचे तज्ञ सांगतायत.. मल्टी कमोडिटी एक्सचेंज मुळे होत असलेली खरेदी विक्री आणि सटटेबाज वाढवत असलेला दर या मुळे बाजारात मसाल्याचे दर वाढत चाललेयत.. मागील दोन महिन्यात मसाल्याचे भाव हे 15 ते 25 टक्क्यांनी वाढलेयत. यामागचं प्रमुख कारण हे दक्षिण भारतातून मंदावलेली मसाल्याची आवक मानली जातेय.. त्यातच बाजारात सर्वच ठिकाणी झालेल्या महागाईचा परिणाम हा मसाले आणि बटाट्याच्या दरावर दिसतोय.. आणि म्हणूनच सर्वसामान्याना दर एकूनच आलू तडका अनुभव घ्यावा लागत आहे.
गेल्या महिन्याभरात वाढलेली महागाई पुढील काही काळात आणखीन वाढण्याची शक्यता आहे.. कारण देशाच्या आणि राज्याच्या बजेटमध्ये सुचवण्यात आलेली करवाढ आणि तिचे परिणाम आता प्रत्यक्ष स्वरुपात दिसणार आहे.. आणि या सा-यांना सामोरं जावं लागणार आहे ते सर्वसामान्य मध्यमवर्गींयाना.. 
आज दरदिवशी सर्वसामान्याचां सामना हा महागाईशी होतोय.. कधी देशाचं नियोजन खातं सर्वसामान्य माणसाला 28 रुपयाच्या वर खर्च होतो म्हणून त्याला गरिब म्हणून जगू देत नाही.. आणि त्याच वेळी बाजारात वाढलेली महागाई त्याला धड शांत झोपही देत नाही.. देशात सर्व्हीस टॅक्स वर वाढलेला केवळ 12 टक्केचा आकडा हा केवळ नव्हता तर प्रत्येक वस्तुवर कसा छुपा परिणाम करणारा आहे य़ाची दाहकता आज सर्वसामान्यांना सहन करावी लागतेय. आज पेट्रोलचे दर असो वा हॉटेलिंगच्या.. घराच्या वाढलेल्या किमती किवा सर्वच जिवनावश्यक वस्तूच्या भडकलेल्या किमती.. आज सर्वच क्षेत्रात अक्राळविक्राळ वाढलेला महागाईचा आकडा दिसतोय. प्रणव मुखर्जी यानी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याअगोदर सर्वांनीच त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा ठेवल्या होत्या.. खरतर देशाचे पंतप्रधान मनमोहनसिंग हे अर्थशास्त्रज्ञ असताना देशाच्या अर्थव्य़वस्थेवर नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा होती पण गेल्या दोन टर्ममध्ये महागाईचा आलेख नियंत्रणात ठेवण सोडाचं, उलट आता या आलेखाने तक्ता फाडण्याचीच भाषा सुरु केलीय. प्रणव मुखर्जी अर्थसंकल्पात दिलासा देतील अशी अपेक्षा होती.. पण 1 एप्रिलपासून लागू झालेल्या नव्या भाववाढीत आता मात्र सर्वसामान्याची पार दैना झालीय.
प्रणवदांनी महाग केलेल्या वस्तूच्या यादी ही न संपणारी अशीच आहेटिव्ही
फ्रिज
एसी
इलेक्ट्रॉनिक वस्तू
विमान प्रवास
हॉटेलिंग
फोन बिल
मोठ्या कार

सायकल
सोनं
प्लॅटिनम
हिरा
सिगारेट
बिडी
तंबाखू
गुटखा
सिमेंट
पार्लर
कॉम्प्युटर
ब्रॅण्डेड कपडे
प्रवास
ड्रायक्लिनिंग
घर
कोचिंग क्लास
तेल
साबण
शॅम्पू
टायर
प्रणवदांनी वाढवलेल्या या सर्वच वस्तूचे पडसाद आता थेट सर्वसामान्याला सहन करावं लागतोय. कारण पार्लर असो वा शॅम्पू..सर्वच वस्तूचे चढ्या किमतीचा फटका सहन करावा लागतोय..प्रणवदापाठोपाठ अजित पवारांच्या राज्याच्या बजेटमध्येही सर्वसामान्याची निराशाच झालीय.
अजितदादानीही सर्वसामान्याना महागाईचे चटकेच दिलेत. गॅस
पेट्रोल
सिएनजी
कार
बिडी
प्लॅस्टर ऑफ पॅरिस
ग्राफिक्स आऊट
देशाच्या आणि राज्याच्या बजेटमध्ये महागाईचं ओझ हे सर्वसामान्यावर लादल गेलय.. आणि बजेटच्या अंमलबजावणीत या सा-यात वाढलेले आकडे सर्वसामान्यांना घाम फोडतायत.. कारण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या असो देशातल्या महागाईचं दान पडतं ते केवळ सर्वसामान्याच्यांच पदरात...
First Published: Wednesday, April 4, 2012, 23:21