Last Updated: Saturday, December 14, 2013, 16:20
सर्वसामान्यांवर आधीच महागाईची कु-हाड कोसळत असताना आता नोव्हेंबरअखेर किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय... गेल्या ९ महिन्यांमधला हा उच्चांक आहे... चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला धुव्वा, आणि येणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाई लक्षणीय वाढतेय... अर्थतज्ज्ञ, विश्लेषकांनी किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर हा ऑक्टोबरप्रमाणंच दोन अंकी स्तरावर राहील असा अंदाज व्यक्त केला होती.
मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबरअखेरीस किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय.