विदर्भातील राहुल रोहणे IFS - Marathi News 24taas.com

विदर्भातील राहुल रोहणे IFS

www.24taas.com, चंद्रपूर
 
चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुऱ्यातील राहुलनं रोहणे परिवारासह राजु-याचं नाव उंच केलयं. गरीब कुटूंबातील २४ वर्षीय राहुलनं कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय IFS चा गड सर केलाय. आपल्या कर्तृत्वानं त्यानं इच्छा तिथे मार्ग ही म्हण प्रत्यक्षात साकारली आहे.
 
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काहीही अशक्य नाही हे दाखवून दिलयं चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुऱ्यातील राहूल रोहणेनं. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्यानं IFS ची परिक्षा उत्तीर्ण केलीये. राज्यातून तिसरा आणि विदर्भातून एकमेव असं त्याचं यश सगळ्यांना दिपवणारं आहे. पण हे यश प्रतिकूल परिस्थितीत मिळवण राहुलसाठी सोपं नव्हतं. त्या परिस्थितीतही काबाडकष्ट करत त्याच्या आईनं त्याला शिकवलं. आईच्या या कष्टाचे राहूलनं अखेर चिज करत इतिहास रचला.
 
‘लाथ मारेन तिथे पाणी काढेल’ असा स्वभाव असलेल्या राहुलनं शालेय जीवनापासून अगदी BSC आणि MSC तही पहिला क्रमांक सोडला नाही. आईनं केलेले कष्ट आणि राहुलच्या मेहनतीनं मिळवलेलं यश इतरांसाठी प्रेरणादायी असंच आहे.
 
विदर्भात स्पर्धा परिक्षेचे वातावरण अजुनही बाल्यावस्थेतच आहे. त्यातच UPSC बाबत अनास्थाचं आहे. या मोठ्या यशानंतर शाळा हीच स्पर्धा परिक्षांची केंद्र व्हावीत अशी राहुलनं व्यक्त केलेली भावना बोलकी आहे. हलाखीच्या स्थितीत त्यानं कमावलेल्या यशाचं समाधान कैक पटींनी जास्त आहे.

 

First Published: Saturday, April 7, 2012, 14:52


comments powered by Disqus