तालिबानी कहर - Marathi News 24taas.com

तालिबानी कहर

www.24taas.com, मुंबई
 
रविवारी दुपारी अफगाणिस्तानातील काबूल शहर अक्षरश: हादरुन गेलं होतं...कारण तालिबान्यांनी एकाचवेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवला होता..विशेषत: अमेरिका, जर्मन, ब्रिटन आणि रशियाच्या दूतावासाला त्यांनी लक्ष्य केलं होतं..बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या आवाजानं काबूल शहर दणाणून गेलं होतं....
तालिबान्यांच्या हल्ल्यामुळं  रविवारी अफगाणिस्तान पुन्हा एकदा हादरुन गेलं होतं...काबूलमध्ये एकाचवेळी ठिकठिकाणी डझनभर दहशतवादी हल्ले केले गेले...
 
अफगाणिस्तानच्या संसंदेवर हल्ला
या हल्ल्यांची सुरुवात अफगाणिस्तानच्या संसदेपासून झाली...दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास  अफगाणिस्तानच्या संसदेबाहेर  अनेक स्फोट झाले...या हल्ल्याची माहिती मिळताच सगळीकडं एकच खळबळ उडाली...लोक जीव वाचविण्यासाठी सुरक्षीत स्थानाकडं  पळत सुटले होते...सर्वत्र उडालेल्या घबराटीचा फायदा घेत तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या संसदेत शिरण्याचा प्रयत्न केला...मात्र दहशतवाद्यांचा तो प्रयत्न तिथ असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला...तालिबान्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी जबरदस्त फायरिंग केलं....विशेष म्हणजे अफगाणिस्तानच्या खासदारांनीही  शस्त्र हाती घेऊन तालिबान्यांचा मुकाबला केला...सुरक्षा रक्षक आणि खासदारांनी प्रतिउत्तरादाखल केलेल्या गोळीबारमुळं संसदेत शिरण्य़ाचा दहशतवाद्यांचा प्रयत्न  फसला..दोन्ही बाजूंनी जोरदार धुमश्चक्री सुरु होती... तालिबान्यांनी एकीकडं संसदेवर हल्ला केला होता तर त्याच वेळी दुसरीकडंही हल्ल्याच्या बातम्या येवून थडकत होत्या...
अमेरिकन  दूतावासावर हल्ला
दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला चढवला होता... या दुतावासाबाहेर त्यांनी स्फोट घडवून आणला  आणि त्यानंतर त्यांनी जोरदार गोळीबार केला...या हल्ल्यानंतर अमेरिकेचं दूतावास बंद करण्यात आलं...दहशतवाद्यांनी केवळ अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला होता असं नाही तर इतर देशांच्या दूतावासांनी त्यांनी टार्गेट केलं होतं...
 
जर्मनी, रशिया, ब्रिटन दूतावासांवर हल्ला
 
दहशतवाद्यांनी जर्मन, रशिया आणि ब्रिटनच्या दूतावासावरही हल्ला चढवला होता..जर्मन दूतावासावर हल्ल्यानंतर आग लागली होती....तसेच एका उच्चपदस्थ ब्रिटिश अधिका-याच्या घरावर रॉकेटने हल्ला करण्यात आला होता.. दहशतवाद्यांनी एकाचवेळी ठिकठिकाणी हल्ला करुन काबूलमध्ये मोठी दहशत निर्माण केली होती...त्यांनी एका मोठ्या हॉटेलवर हल्ला करुन कब्जा मिळवला होता...विशेष म्हणजे हे हॉटेल अमेरिकेच्या दुतावासापासून थोड्याच अंतरावर आहे..तसेच तुर्कस्तान आणि भारतीय दूतावासही थोड्याच अंतराव आहे....दहशतवाद्यांनु नाटोच्या कार्यालयालाही टार्गेट केलं होतं...काबूलमधील नाटोच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट घडवून आणला गेला...त्यानंतर सुरक्षा जवान आणि दहशतवादी यांच्यात बराच वेळ धुमश्चक्री सुरु होती..दहशतवाद्यांनी काबूलमध्ये सुनियोजन पद्धतीने  ठिकठिकाणी हल्ले करुन मोठी दहशत निर्माण केला आणि त्यानंतर तालिबान्यांनी या हल्ल्यांची जबाबदारी स्विकारली... हल्ल्याची जबाबदारी स्विकारतांना ही तर केवळ एक सुरुवात असल्याचं तालिबानने म्हटलंय... तालिबान्यांच्या या भीषण हल्ल्य़ामुळं  भविष्यात अफगाणिस्तानच नाही तर पाकिस्तानलाही मोठा धोका संभवतोय..या पार्श्वभूमिवर भारतालाही अधिक सतर्क रहावं लागणार आहे..
2 मे 2011 अमेरिकेच्या कमांडोजनी कुख्यात दहशतवादी ओसामाबीन लादेनचा खातमा केला...तर 15 एप्रिल 2012ला  अफगाणिस्तानच्या काबूल शहरात ठिकठिकाणी हल्ले करुन जगभर प्रचंड दहशत निर्माण केली... या दोन्ही घटनांमध्ये काही संबंधतर नाही ना अशी शंका आता व्यक्त केली जाऊ लागलीय..कारण लादेनच्या खातम्यानंतर तालिबान्यांनी केलेला हा सगळ्यात मोठा हल्ला होता...पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये दडून बसलेल्या ओसमा बीन लादेनला अमेरिकेच्या मरीन कमांडोजनी अवघ्या काही मीनिटातच यमसदनी धाडलं...त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना काबूल मध्ये हा हल्ला करण्यात आलाय... ओसमाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तालिबान्यांनी हा हल्ला तर केला नाही ना असा संशय व्यक्त केला जाऊ लागलाय..

लादेनच्या मृत्यूचा सूड ?
 
 
गेल्या वर्षी 2 मेला  अमेरिकेच्या कमांडोजनी पाकिस्तानाच्या अबोटाबादमध्ये केलेल्या एका धाडसी कारवाईत आपला सर्वात मोठा वैरी ओसामा बिन लादेन याला कायमचाच संपवला....
लादेनचा खेळ संपविल्यानंतर अल कायदा या लादेनच्या दहशतवादी संघटनेकडून मोठा दहशतवादी हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती....त्यामुळं अमेरिकेसह जगभरातील  गुप्तचर यंत्रणांचे कान उभे राहिले होतो....तालिबान आणि अल कायदाच्या कारवायांवर सतत नजर ठेवली जात होती...कोणत्याही प्रकारच्या घातपाती कारवाया होवू नये याची खबरदारी घेतली जात होती...मात्र तालिबानने आपली ताकद दाखवून दिलीच..

19 ऑगस्ट 2011 काबूलमध्ये ब्रिटिश कल्चरल सेंटरवर हल्ला


 
तालिबानच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ब्रिटिश कल्चरल सेंटरवर हल्ला करुन तालिबान जीवंत असल्याचं दाखवून दिलं होतं...लादेनच्या खातम्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता..या आत्मघातकी हल्ल्यात 9 लोक ठार झाले होते...
 
19 ऑगस्टच्या हल्ल्यानंतर तालिबान्यांनी 29 ऑक्टोबर 2011ला आणखी एक आत्मघातकी हल्ला केला...
 

29 ऑक्टोबर 2011 काबूलमध्ये आत्मघातकी कार बॉम्ब हल्ला


 
 
दहशतवाद्यांनी कारमध्ये स्फोट घडवून आणला होता...या हल्ल्यात नाटोंशी संबंधीत 13जण ठार झाले होते...गेल्या वर्षातील या काही हल्ल्याच्या घटना  घडल्या होत्या...मात्र या वर्षातील सर्वात मोठा हल्ला रविवारी दहशतवाद्यांनी घडवून आणला आहे..हा हल्ला सुनियोजीत असा होता...विशेष म्हणजे अफगाणीस्तानातून लवकरच  नाटोचे सैन्य माघारी बोलाविण्यात येणार आहे...अशा पार्शभूमिवर हा हल्ला करण्यात आल्यामुळं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत..
काबूलमध्ये झालेल्या तालिबानी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश झालाय..नाटोच्या हल्ल्याचं निमित्त करुन 5 महिन्यापूर्वी पाकिस्ताननं अफगाणिस्तानातील नाटोचा सप्लाय रोखला होता..त्यामुळं नाटो सैन्याला अडचणींना सामोरं जावं लागलं..पण त्याच काळात तालिबान्यांना अधिक बळ मिळालं..आणि रविवारी काबूलमध्ये झालेल्या हल्ल्यात ते दिसूनही आलंय..
 
26 नोव्हेंबरला पाकिस्तानच्या सैन्यचौकीवर नाटोच्या हेलिकॉप्टरने केलेल्या  हल्ल्यात 24  सैनिक ठार झाले...पण या घटनेनंतर पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातले संबंध बरेच तानले गेले होते...या घटनेवरुन पाकिस्तानने अमेरिकेवर चांगलंच तोंडसूख घेतलं होतं...तसेच अमेरिकेला आपलं शम्सी एअरबेस काही तासात रिकामं करण्यास भाग पाडलं होतं...पाकिस्तानने अमेरिकेला केवळ शम्सी एअर बेस सोडण्यास सांगितंल असं नाही तर अफगाणिस्तानातील  नाटोचा सप्लायही बंद केला होता..अमेरिकेला धडा शिकवण्याचा उद्देशातूनच पाकिस्तानने ही कारवाई केली होती..त्या घटनेला आता जवळपास 5 महिन्यांचा कालावधी उलटला आहे.... सप्लाय बंद झाल्यामुळं नाटोला अडचणींना सामोरं जावं लागतंय... नोटोच्या सैन्याला अडचणी येत असल्याचा फायदा घेत तालिबानने आपली ताकद वाढविली..आणि रविवारी  काबूल शहरावर हल्ला चढवून एकच दहशत निर्माण केली... त्या हल्ल्याची सगळ्या जगाने दखल घेतली...मात्र त्याचवेळी  पाकिस्तानने त्या घटनेकडं कानाडोळा करत ती नाटोची जबाबदारी असल्याचा आव आणला...अमेरिकेनं मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषीत केलेला दहशतवादी हाफीज सईदने आपली संघटना जमात ए उदवाच्या माध्यमातून अमेरिकेच्या विरोधात मोठ्याप्रमाणात नोटाच्या विरोधात आंदोलनं केली..पाकिस्तानला नेहमीच समर्थन देणा-या चीनने या वेळीही आपली परंपरा कायम ठेवलीय..चीनने उघडपणे पाकिस्तानला समर्थन दिलंय..अमेरिकेनं दहशतावदाविरोधात सुरु केलेल्या युद्धातून पाकिस्तानने अंग काढून घेण्यास सुरुवात केलीय..  पण गेल्या काही दिवसात अमेरिकाचा पाकिस्तानवर दबाव वाढला असून त्या दबावापोटीच  नाटोचा सप्लाय पुन्हा सुरु करण्यास पाकिस्तान राजी झालं आहे...पण गेल्या पाच महिन्यात नाटोचा सप्लाय बंद केल्यामुळं तालिबानला मोठं बळ मिळालं असून त्याला जबाबदार कोण ?

अफगाणिस्तानातून नाटोचं सैन्य मागे घेण्याची घोषणा अमेरिकेनं यापूर्वीच केली आहे..त्या घोषणेनुसार 2013च्या मध्यापर्यंत अफगाणिस्तानला सत्ता सोपवली जाणार आहे.. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा आणि ब्रिटिश पंतप्रधान डेव्हीड कॅमरुन यांनी घेतलेल्या निर्णयानुसार 2014पर्यंत अफगाणिस्तानातून नाटोचं सर्व सैन्य माघारी बोलाविण्यात  येणार आहे..त्यानंतर अफगाणिस्तानाच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक सुरक्षा यंत्रणेवर सोपविण्यात येणार आहे..विशेष म्हणजे या वर्षीच्या अखेरीस नाटोचं सैन्य परतण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे..अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करजाई यांनी नाटोच्या सैन्य कपातीची मागणी केली आहे..मात्र अफगाणीस्तानातून संपूर्ण सैन्य माघारीला त्यांनीही विरोध दर्शवला आहे..या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमिवर भारताने बघ्याची भूमिका न घेता अफगाणिस्तानच्या बाजून भक्कमपणे उभे रहावी अशी मागणी अफगाणिस्तानातील तालिबान विरोधी गटाने केलीय..
 
लादेनच्या शोधासाठी मित्र राष्ट्रांच्या फौजा अफगाणीस्तानात उतरल्यानंतर तालिबानचा अंत होईल असं वाटलं होतं...कारण आधुनिक शस्त्रानिशी मित्रराष्ट्र तालिबानचा बिमोड करण्यासाठी आफगाणीस्तानच्या भूमीवर उतरलं होतं...मात्र इतक्या वर्षानंतरही तालिबानने हार मानली नाही... गेल्या 2 वर्षात तालिबानच्या  कृष्णकृत्यावर नजर टाकल्यास हे सहज लक्षात येईल..तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलमध्ये एकदाच अनेक ठिकाणी हल्ला करुन आपण सक्रिय असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलंय...पण गेल्या वर्षी तालिबानने अशाच प्रकारे अनेक वेळा आपल्या आस्तित्वाची जाणीव करुन दिली होती...
 
6 डिसेंबरला एका शिया मशिदीवर दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला होता...या हल्ल्यात 12 निष्पाप नागरिक ठार झाले होते... खरं तर मोठा नरसंहार करण्याचा त्यांचा डाव होता..पण त्यात त्यांना यश आलं नाही...29 ऑक्टोबरला  तालिबानी दहशतवाद्यांनी नाटोच्या सैनिकांवर  आत्मघातकी हल्ला केला होता...त्या हल्ल्यात नाटोच्या 13 सैनिकांना आपले प्राण गमावाले लागले. 20 ऑक्टोबरला बुर्रहनुद्दीन रब्बानी या शांतिदूताची तालिबान्यांनी हत्या केली...शांती प्रक्रिया खंडीत करण्याचा त्यांचा उद्देश होता...
19 ऑगस्टला  तालबान्यांनी ब्रिटिश सांस्कृतिक केंद्रावर हल्ला चढविला होता... त्या हल्ल्यात 9जणांचा मृत्यू झाला होता...  28 जून 2011ला  इंटर कॉन्टिनेंटल हॉटेलवर तालिबान्यांनी  हल्ला केला त्या हल्ल्य़ात  10 जणांचा मृत्यू झाला.
21 मे 2011ला तालिबान्यांनी मिलिटरी हॉस्पिटलवर हल्ला केला त्या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला...
28 जानेवारी 2011ला तालिबान्यांनी सुपर मार्केटला टार्गेट केलं होतं...त्या हल्ल्यात  9 जणांचा मृत्यू झाला. केवळ गेल्य़ा महिन्यातच तालिब्यानी अफगाणिस्तानात हल्ला केला असं नाही तर 2010मध्येही त्यांनी अनेक वेळा आत्मघातकी हल्ला करुन मोठी दहशत निर्माण केली होती...
 
19 डिसेंबर 2010ला सैन्याच्या एका बसवर तालबानी दहशतवाद्यांनी  आत्मघातकी हल्ला..त्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू
10 ऑगस्ट 2010ला  विदेशी कंपाऊंडवर हल्ला केला त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला
18 मे 2010ला नाटोच्या ताफ्यावर हल्ला केला गेला...त्यामध्ये नाटोचे 6 सैनिक आणि 12 नागरिक ठार झाले
26 जानेवारी 2010ला हॉटेल आणि श़ॉपिंग सेंटरवर तालिबान्यांनी  हल्ला चझवला होता...त्यामध्ये14 जणांचा मृत्यू...
18 जानेवारी 2010ला शॉपिंग सेंटरसह अनेक ठिकाणी तालिबान्यांनी हल्ले केले होते त्या हल्ल्यात 4 सैनिक आणि एक नागरिक ठार झाला होता...गेल्या दोन वर्षात तालिबान्यांनी अनेक वेळा हल्ले करुन निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे...
 




First Published: Tuesday, April 17, 2012, 00:08


comments powered by Disqus