मुंबई, दिल्ली पुन्हा अतिरेक्याचे टार्गेट, अलर्ट जारी

Last Updated: Friday, June 20, 2014, 13:06

मुंबईसह राज्यातील काही महत्वाच्या शहरांची रेकी दहशतवाद्यांनी केली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दिल्ली आणि मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखल्याची माहिती एनआयए या संस्थेने दिलेय. तसा इशाराही देण्यात आल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

छत्तीसगड येथील नक्षली हल्ल्यात 12 ठार

Last Updated: Saturday, April 12, 2014, 22:37

छत्तीसगडमधील बिजापूर तालुक्यात निवडणूक अधिकारी पथकावर नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला केला. या हल्यात यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांसह राखीव दलाचे जवान ठार झालेत. मृतांचा आकडा 12 असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्यासाठी एक बस आणि अॅब्युलन्स वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

यासिन भटकळचा खळबळजनक खुलासा

Last Updated: Friday, February 7, 2014, 22:08

यासिन भटकळचा खळबळजनक दावा. १३ जुलै २०११ ला दादरमध्ये केलेल्या स्फोटात यासिन भटकळला पोलीस व्हॅन पोलिसांसकट उडवायची होती, असा खळबळजनक खुलासा झालाय.

`असीमानंदांच्या स्फोटा`चे आज संसदेत पडसाद?

Last Updated: Friday, February 7, 2014, 11:12

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा देशातील विविध बॉम्बस्फोटांना `आशिर्वाद` होता, असा खळबळजनक दावा या स्फोटांतील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केलाय.

"मालेगाव-समझौता बॉम्बस्फोट भागवतांच्या संमतीने"

Last Updated: Thursday, February 6, 2014, 12:56

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहमतीनंच समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधली मक्का मशीद आणि अजमेरमधल्या दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खळबळजनक दावा या स्फोटातील आरोपी स्वामी असिमानंद यांनी केलाय.

... आणि अजित पवार माधव भंडारींवर भडकले

Last Updated: Sunday, December 1, 2013, 20:52

शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळं सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघेल अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

२६/११ हल्ल्याला पाच वर्ष, हुतात्मांना श्रद्धांजली

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 13:18

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या जखमा मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. आज पोलीस जिमखान्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शशी थरूरही उपस्थित होते.

अमेरिकेचा ड्रोन हल्ला; पाकिस्तान तालिबानचा म्होरक्या ठार

Last Updated: Saturday, November 2, 2013, 17:18

पाकिस्तानात शुक्रवारी केल्या गेलेल्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी तालिबानचा म्होरक्या हकीमुल्ला महसूद याच्यासहीत आणखी सहा दहशतवादी मारले गेलेत.

दिवाळीत अतिरेकी हल्ल्याची शक्यता, सुरक्षेत वाढ

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 14:10

बिहारमधील पाटणा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर राज्यात अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. दिवाळीच्या सणात हल्ल्याची शक्यता असल्याने मुंबईसह अन्य शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई हल्ल्याबाबत बराक ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडणी

Last Updated: Thursday, October 24, 2013, 15:18

अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानऊघडणी केली आहे.

बॉम्ब घडविण्याची प्रेरणा हॉलिवूड चित्रपटांमुळे - यासिन भटकळ

Last Updated: Friday, September 27, 2013, 18:10

मला बॉम्ब घडविण्याची प्रेरणी ही चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली आहे. हॉलिवूडमधील चित्रपटातील बॉम्ब स्फोट दृश्यांच्यामाध्यमातून प्रेरणा घेतल्याची कुबली आंतरराष्ट्रीय दहशतवादी यासिन भटकळ यांने दिली आहे.

मुंबईत शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 08:46

मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतरही महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. मंगळवारी सकाळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका अज्ञाताने शिवानी प्रमोद शिंदे (१३) या शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला केला. ती गंभीर जखमी झाली. तिला ५५ टाक्के पडले आहेत.

मुंबई रेल्वे स्थानकात महिलेवर पुन्हा हल्ला

Last Updated: Saturday, August 24, 2013, 13:47

मुंबईतल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सीएसटी स्टेशनवर महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. कल्याणला जाणा-या लोकलमध्ये महिला डब्यात एका गरदुल्ल्यानं महिलेला हातात अॅसिड असल्याची भीती दाखवत, तिची बॅग आणि मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला.

पाकचं ‘नापाक’ कृत्य सुरूच, पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न

Last Updated: Sunday, August 18, 2013, 16:04

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन सेक्टर इथं पहाटे तीन वाजता नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यात भारतीय सैन्याला यश आलंय.

दिल्लीचा लाल किल्ला उडवण्यांची अतिरेक्यांची धमकी

Last Updated: Friday, August 9, 2013, 16:18

मुंबईत २६/११ चा हल्ला करणारा मास्टरमांईड हाफिज सईदने एतिहासिक लालकिल्ला उडवण्यांची धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी दिल्लीत हाय अलर्टचा इशारा दिला आहे.

संरक्षणमंत्री अँन्टोनी विरोधात लोकसभेत नोटीस

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 11:55

संरक्षणमंत्री ए.के.अँन्टोनी यांच्या विरोधात भाजपनेते यशवंत सिन्हा यांनी लोकसभेत नोटीस बजावलीय. तर विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार हल्ला केला.

पाकचा नाही तर अतिरेक्यांचा हल्ला - अँन्टोनी

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 10:58

पाकिस्तानी सैन्याच्या वेशात भारतीय हद्दीत घुसून अतिरेक्यांनीच जवानांवर हल्ला केला, असे धक्कादायक वक्तव्य संरक्षणमंत्री ए के अँन्टोनी यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुशर्रफ यांना बूट मारला!

Last Updated: Friday, March 29, 2013, 13:06

एका अज्ञात व्यक्तीने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर बुट फेक केली आहे. मुशर्ऱफ सिंध हायकोर्टात आले असता हा प्रकार घडला.

फिल्म रिव्ह्यू :`द अटॅक्स ऑफ २६/११`... जिवंत कथा!

Last Updated: Friday, March 1, 2013, 11:42

‘हा सिनेमा म्हणजे एकप्रकारे त्या दशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे’ असं रामगोपाल वर्मा यांनी आधीच स्पष्ट केलंय आणि खरोखरच या सिनेमाला ‘त्या’ घटनेशी निगडीत असलेल्या भावनांनी जोडण्यात ते यशस्वीही झालेत.

26/11 : NSG कमांडोंकडे सरकारचं दुर्लक्ष

Last Updated: Thursday, November 22, 2012, 14:04

26/11हल्ल्यातील NSG शूर कमांडोंकडे सरकारचे दुर्लक्ष केले आहे. कमांडोंना वेळेवर पेन्शन मिळत नाही, माहितीच्या अधिकारात झाले उघड झाले आहे. जखमी NSG कमांडोंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप NSG कमांडो सुरेंद्र सिंग यांनी केला आहे.

अशी दिली असावी कसाबला फाशी

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 14:32

२६ / ११चा दहशतवादी कसाबला आज सकाळी साडे सातच्या सुमारास फाशी देण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबरला कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला.

कसाबला फाशी, व्यक्त करा तुमच्या भावना

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 12:31

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. या प्रकरणी तुम्हांला काय वाटते आम्हांला सांगा आम्ही त्याला देऊ प्रसिद्धी....

कसाबला फाशी : पाकिस्तानी मीडियानं भूमिका घेणं टाळलं

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 17:55

भारतात उघडउघडपणे कसाबच्या फासावर जाण्याच्या बातमीवर आनंद व्यक्त केला जातोय तिथं पाकिस्तानी मीडियानं मात्र कोणतीही भूमिका घेण्याचं सपशेल टाळलंय.

`कसाबला फाशी... अफजल गुरुचं काय?`

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 10:59

कसाबच्या फाशीवर भाजपानं आनंद व्यक्त करत, मुंबई हल्ल्यातील पीडितांनी आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही हीच भावना व्यक्त करताना संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुचं काय? असा सवाल केंद्र सरकारला केलाय.

कसाबचा मृतदेह पाकने मागितलाच नाही- शिंदे

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 11:12

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे.

कसाबची शेवटीची इच्छा काहीच नाही

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 13:07

कसाबला आज सकाळी फार गुप्ततेत फाशी देण्यात आली, असली तरी काही बातम्या आता समोर येत आहे. कसाबला फाशी देताना विचारण्यात आले की, अंतीम इच्छा काय आहे. त्यावर त्याने आपली अंतीम इच्छा काहीच नाही, किंवा आपण काय करू इच्छितो असे त्याने काहीच सांगितले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईकरांनी व्यक्त केले समाधान

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 11:19

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याचे कळताच मुंबईतील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या फाशीचे स्वागत केले आहे.

कसाबच्या दयेचा अर्ज गृहमंत्रालयाने फेटाळला

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 19:27

मुंबईत झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबने दिलेली द्या याचिका गृह मंत्रालयाने मंगळवारी रद्द केलीय.

मुंबई हल्ल्यातील आणखी एकाला अटक

Last Updated: Sunday, July 1, 2012, 14:59

सौदी अरबमध्ये आणखी एक दहशतवादी ताब्यात घेण्यात आलाय. मेहमूद फसिह असं या दहशतवाद्याचं नाव आहे. मुंबई हल्ल्यासह भारताताली अनेक बॉम्बस्फोटात फसिहचा मुख्य सहभाग असल्याचा संशय आहे. फसिहला सौदी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता त्याला भारतात आणण्यासाठी भारत सरकारतर्फे हालचाली सुरू झाल्यात.

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आमदार निवासात

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 14:13

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर पकडण्यात आलेला २६/११ मुंबईतील हल्ल्यातील कुख्यात दहशतवादी सैय्यद जबीउद्दीन अबू जिंदाल तथा अबू हामजा हा महाराष्ट्र सरकारमधील आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या निवासस्थानी राहीला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्याला याप्रकरणी गृहमंत्रालयाने क्लिन चीट दिल्याचे फौजिया खान यांनी म्हटले आहे.

२६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्याला अटक

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 09:49

२६/११ मुंबई हल्ल्यातील एका दहशतवाद्याला आज सोमवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय या दिल्लीच्या विमानतळावर अटक करण्यात आली आहे. आज सकाळी या दहशतवाद्याला स्पेशल सेलने पकडले.

"मला वाचवा हो वाचवा"- सईद

Last Updated: Thursday, April 19, 2012, 00:09

पाकिस्तान सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येऊन कुठलीही प्रतिकूल कारवाई करू नये, अशी लष्कर-ए-तोएबाचा संस्थापक हाफिझ सईद याने लाहोर कोर्टाकडे मागणी केली आहे.

तालिबानी कहर

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 00:08

लादेनच्या शोधासाठी मित्र राष्ट्रांच्या फौजा अफगाणीस्तानात उतरल्यानंतर तालिबानचा अंत होईल असं वाटलं होतं...कारण आधुनिक शस्त्रानिशी मित्रराष्ट्र तालिबानचा बिमोड करण्यासाठी आफगाणीस्तानच्या भूमीवर उतरलं होतं...मात्र इतक्या वर्षानंतरही तालिबानने हार मानली नाही..

'२६/११' हल्ल्यामागेही लादेन?

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 09:33

अल-कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन याचाही २६/११च्या मुंबई हल्ल्यामध्ये महत्वाचा सहभाग होता. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यात १६६ लोकांचा बळी गेला होता, तर ३०० हून जास्त लोक जखमी झाले होते.

सईदवर अमेरिकेचे ५१ कोटींचे इनाम

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 14:34

अमेरिकन सरकारने हाफिझ सईदला पकडण्यासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्याला दहा दशलक्ष डॉलर्सचं इनाम जाहीर केलं आहे. हाफिझ सईद मुंबईवर झालेल्या 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्यामुळे भारताच्या दहशवादाविरुधच्या लढ्याला आणइ सईद दहशतवादी कारवायांना जबाबदार असल्याचा दाव्यालाही बळकटी मिळाली आहे.

कराचीत मैदानाबाहेर आफ्रिदीची 'फटकेबाजी'

Last Updated: Saturday, March 24, 2012, 11:46

पाकिस्तीनचा फिरकी खेळाडू शाहिद आफ्रीदीने मैदानाबाहेर 'फटकेबाजी' केल्याने क्रिकेट वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे. शाहिदने कराचीत त्याच्या चाहत्यांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे आफ्रिदीवर जोरदार टीका होत आहे.

पाकिस्तानी मदरशातून बंदिस्त मुलांची सुटका

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 15:38

पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं ही गोष्ट पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. कराची येथील एका इस्लामी मदरशाच्या तळघरात ५० हून अधिक मुलं व तरुण साखळदंडांनी बांधून ठेवले असल्याचं आढळून आलं.

२६/११च्या त्रुटी कायम, अहवालाकडे कानाडोळा

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 07:14

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या त्रुटी संदर्भात चौकशी करण्यासाठी नेमलेल्या राम प्रधान समितीने केलेल्या २६ महत्त्वपूर्ण सूचनांपैकी काहींची अद्याप पूर्तता होऊ शकलेली नाही.

मुंबई अजूनही असुरक्षितच!

Last Updated: Saturday, November 26, 2011, 08:10

२६/११ च्या हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मुंबई पूर्ण सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनीच याची कबुली दिली आहे. मुंबईच्या सागरी सीमा पूर्णःत सुरक्षित नसल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त आरुप पटनाईक यांनी म्हटलंय.

सीसीटीव्हीने होणार प्रत्येक चौक चौकस !

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:52

नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या परिसरातल्या प्रत्येक प्रवेशद्वार आणि सार्वजनिक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.या सुरक्षा व्यवस्थेसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

राहुल, अडवाणी, मोदी दहशतवाद्यांचे 'टार्गेट'

Last Updated: Thursday, November 3, 2011, 08:24

काँग्रेसचे राहुल गांधी, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, पंजाबचे मुख्यमंत्री बादल हे दहशतवाद्याच्या निशाण्यावर आहेत.