Last Updated: Wednesday, November 23, 2011, 10:13
झी २४ तास वेब टीम, पुणे पिंपरी चिंचव़ड शहरातल्या सांगवीतला हिमांशू पाटील उर्फ गोपाळ पाटील उर्फ मुन्नाभाई एमडी. दहावी पास असलेल्या या मुन्नाभाईनं बोगस डिग्रीच्या आधारे सांगवीत हॉस्पिटल थाटलं होतं. बोगसगिरीला सरावलेल्या या मुन्नाभाईनं एक बायको असताना चक्क दुसरं लग्न केलं. त्यामुळं संतापलेल्या पहिल्या बायकोनं या मुन्नाभाईचं बिंग फोडलं. त्यानंतर हा मुन्नाभाई एमडी फरार झालाय. झी २४ तासनं या बातमीचा सातत्यानं पाठपुरावा केला. त्यामुळं आता महापालिकेनं बोगसगिरी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्यात.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे अनेक मुन्नाभाई असल्याचं खासगीत सांगितलं जातं. सामान्य़ रुग्णांच्या जीवाशी खेळणा-या अशा मुन्नाभाईंना शोधण्याची गरज निर्माण झालीये.
First Published: Wednesday, November 23, 2011, 10:13