Last Updated: Monday, May 7, 2012, 11:37
www.24taas.com, जळगाव 
सरकारी अधिकाऱ्यानं बदली झाल्यानंतर तीन महिन्यांमध्ये सरकारी बंगला सोडावा असा नियम आहे. जळगावात मात्र एका अधिकाऱ्यानं तब्बल १० वर्षांपासून बंगल्याचा ताबा सोडलेला नाही.
तापी खोरे विकास महामंडळातले अभियंते व्ही डी पाटील गेली दहा वर्ष जळगावातल्या सरकारी बंगल्यात राहत आहेत. या काळात त्यांची जळगावातून धुळे, नाशिक तसंच नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली. तरीही त्यांनी जळगावातल्या बंगल्याचा ताबा सोडलेला नाही.
तीन महिन्यानंतर आणखी तीन महिने त्यांना सरकारी बंगल्यात राहण्याची परवानगी मिळू शकते. मात्र त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत सरकारी बंगल्यात राहता येत नाही असे राज्यपालांचे निर्देश आहेत. पाटील यांना मात्र हे नियम लागू नसल्याचं दिसतं नाही.
First Published: Monday, May 7, 2012, 11:37