वादांचं आगार बिग बॉसचं घर..., The unexpectedness of the Bigg Boss house

वादांचं आगार बिग बॉसचं घर...

वादांचं आगार बिग बॉसचं घर...

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
बिग बॉसच्या गेल्या सहा सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये अनेक वेळा वाद झाल्याचं पहायला मिळालं..पण ब-याच प्रकरणात तो प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचं उघड झालं...बिग ब़ॉसच्या घरातील आजवरच्या वादावरचा हा स्पेशल रिपोर्ट

बिग बॉसचं वादशी सुरुवातीपासूनचं नातं आहे..बीग बॉसच्या पहिल्या सिझनपासून ते प्रेक्षकांनी अनुभवलं आहे..बिग बॉसचं पहिलं सिझन आयटम गर्ल राखी सावंतमुळे चर्चेत आलं होतं.. अभिनेत्री आणि मॉडेल कश्मीरा शाह आणि राखी यांच्यात चांगलाच कलगितुरा रंगला होता..राखी आणि कश्मीरा यांच्या विषयी बिग बॉसच्या घरातील अन्य़ स्पर्धकांना जेव्हा त्याचं मत विचारलं गेलं तेव्हा या दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली आणि हा वाद बराच रंगला होता..राखी चांगलीच भडकली होती आणि त्यामुळेच तिला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला..

बिग बॉसच्या दुस-या सिझनमध्ये राजा चौधरीने धुमाकूळ घातला होता.. संभावना सेठ आणि राजा यांच्यातली जवळीक चर्चेचा विषय ठरली होती...

खरं तर सुरुवातील हे दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते..मात्र पुढे त्यांच्याती मैत्री वाढत गेली..राज चौधरी आणि इतर स्पर्धकांमध्ये वारंवार होणारं भांडणही कळीचा मुद्दा ठरला होता..याच सिझनमध्ये राजा चौधरी , राहून महाजन, जुल्फी सैयद आणि अशुतोष कौशिक हे बिग बॉसचे नियम मोडल्यामुळे वादात सापडले होते..मात्र त्यांनी माफी मागितल्यामुळे तो वाद शमला..

बिग बॉस तीनमध्ये कमाल खान आणि रोहित वर्मा यांच्यात असाच वाद रंगला होता.. कमाल खानने तर रोहित वर्माला डायनिंग टेबलवर पाण्याची बाटली फेकून मारली होती..मात्र ही बाटली रोहितला लागण्याऐवजी ती शमिता शेट्टीला लागली होती..या घटनेनंतर कमाल खानला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं होतं...

सीझन चारमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री विणा मलीक आणि अश्मीत पटेल यांचा रोमान्स चांगलाच गाजला होता..विणाच्या या वर्तणूकीमुळे नाराज झालेल्या मोहम्मद इक्बाल नावाच्या पाकिस्तानी नागरिकाने तिच्या विरोधात पाकिस्तान हायकोर्टात खटला दाखल केलाहोता..

बिग बॉस सिझन चारमध्ये विणा अश्मीत प्रमाणेच डॉली बिंद्राने चांगलाच धुमाकुळ घातला होता..डॉली बिंद्रा आणि श्वेता तिवारी यांच्यात वारंवार खटके उडत असंत...बिग बॉसने दिलेलं टास्क पूर्ण करण्यावरुन त्यांच्यात अनेक वेळा वाद झाले..त्यांच्यातला वाद अनेक वेळा हामरीतुमरीवर जावून पोहोचला होता...

बिग बॉसमधील वादाचा हा सगळा इतिहास पहाता हीच या शोची युएसपी असून शोमध्ये टीकून राहण्यासाठी स्पर्धक य़ा मार्गाचा अवलंब करत असल्याचं वारंवार उघ़ड झालंय..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 17, 2013, 20:43


comments powered by Disqus