Last Updated: Thursday, April 4, 2013, 23:57
www.24taas.com, मुंबईउत्तर कोरियाने युद्धाची तयारी सुरु केलीय....त्यांनी दक्षिण कोरिया तसेच अमेरिकेच्या दिशेनं आपली क्षेपणास्त्र तैनात केली आहेत..तसेच आपल्या रॉकेट युनिट्सला अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यास सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे..
उत्तर कोरीयाची प्रक्षोभक वक्तव्य आणि धमक्या हे एक षडयंत्र असून तणाव निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे.पण उत्तर कोरीयाला यातून काहीच साध्य होणार नाही.उलट यामुळे उत्तर कोरीया एकटा पडेल आणि पूर्वोत्तर आशियात शांतता कायम ठेवण्याच्या प्रयत्नांना खिळ बसेल - जॉर्ज लिटिल, प्रवक्ता पेंटागन
उत्तर कोरीयाच्या हुकूमशाहने राजधानी प्यॉगंयॉगमध्ये हजारो नागरिकांना एकत्र केलं...एक भव्य मोर्चा काढला...उत्तर कोरीयाकडून कोणत्याही क्षणी क्षेपणास्त्र सोडण्याचा आदेश दिला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय..
अमेरिका कोणत्याही परिस्थितीशी समाना करण्यास सज्ज आहे.पण उत्तर कोरीयाने धमक्या देणं बंद करावं - - जॉर्ज लिटिल, प्रवक्ता पेंटागन
उत्तर कोरीया ब्लकमेल करत असल्याचं जगभरातील जनकारांच म्हणनं आहे..पण किम जॉन्गच्या मनात काय चाललंय या विषयी कोणीच ठामपणे सांगू शकत नाही..
हे युद्ध टाळण्यासाठी जगभरातील देश पर्यत्न करत आहेत..तसेच हा तणाव कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं चीनचे परराष्ट्रमंत्री लावरोव य़ांनी म्हटलं आहे..उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे तो देश एकाकी पडेल असं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी सांगितलंय..
खरंतर १९५३ पासून उत्तर कोरिया युद्धाच्या उंबरठ्यावर आहे..१९५३मध्ये झालेल्या युद्ध विरामानंतर उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये शांततेसाठी कोणतीत चर्चा झाली नाही..पण आता २०१३मध्ये पुन्हा युद्धाचे ढग जमा झाले आहेत..१२ फेब्रुवारी २०१३ला उत्तर कोरियाने अणु परीक्षण केलं आणि त्यांच्यावर पुन्हा एकदा निर्बंध लादले गेल्यानंतर युद्धाचं वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली..अशातच दक्षिण कोरीयाने अमेरिकेच्या सैनिकासह संयुक्त सैन्य प्रात्येक्षिक केली...विशेष म्हणजे त्या प्रात्येक्षिका दरम्यान यूएस बी-२ या बॉम्बवर्षाव करणा-या विमानांचा वापर करण्य़ात आला..या घटनाक्रमामुळे उत्तर कोरियाचा शासनकर्ता किम जॉन्ग भडकला...त्याने अमेरिका आणि दक्षिण कोरियाला अणुयुद्धाची धमकी दिली..तसेच वरिष्ठ सैन्य अधिका-यांसोबत चर्चा करुन रणनिती निश्चित केली..अमेरिका तसेच दक्षिण कोरीयातील प्रमुख शहरावर हल्ल्याची योजना किम जॉन्गने आखली आहे..उत्तर युएस मिलिट्री बेस , दक्षिण कोरीया आणि पॅसिफीक महासागरातील क्षेत्रावर हल्ला करण्यास सज्ज राहण्याचा आदेश उत्तर कोरियाने आपल्या सगळ्या रॉकेट युनिटसला दिला आहे..
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेशी उत्तर कोरियाचं वैर आहे..त्यांच्यातील हा संघर्ष अनेक दशकांपासून चालत आला आहे..उत्तर कोरियाने युद्धाची धमकी दिली असली तरी त्यांच्यात यापूर्वीही युद्ध झालं आहे...
सन १६६८...याच काळात कोरियन नागरिकांना सिला राजाच्या काळात खरी ओळख मिळाली..चीन आणि जपानपासून वेगळ होऊन कोरियाने जगाच्या नकाशावर आपलं स्थान निर्माण केलं..पण कोरियाला या स्थानापर्यंत पोहचण्यासाठी जवळजवळ बाराशे वर्ष लागली..
सन १९१० ...जपानने सैन्यबळावर कोरियाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं...जपानने कोरियावर कब्जा केला..त्यामुळे बंडाचा झेंडा उभारला गेला...कोरियन नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी बंडखोर संघटना स्थापन केली..त्यांच्या स्वातंत्र्य युद्धात काही चीन आणि काही सोव्हिएत कम्यूनिस्टांनी त्यांना साथ दिली..अमेरिकेनेही काही संघटनांना मदत केली होती....चीनच्या कम्यूनिस्टांना सोबत घेऊन किम संग यांनी जपान विरुद्ध गनिमी युद्ध पुकारलं....
सन १९४५...दुसरं महायुद्ध संपल्यानंतर ३६ वर्षांनी गुलामीच्या श्रृंखला तोडून कोरिया जपानच्या गुलामगिरीतून मुक्त झालं..कोरियाने गुलामगिरीच्या श्रृखंला तोडल्या ख-या पण समस्यांच्या बेड्या मात्र कायम राहिल्या..जपानी गेले मात्र सोव्हियत सैन्याने कोरियाच्या उत्तर भूभागावर कब्जा केला..तसेच किम संग यांचा राज्याभिषेक केला....दुसरीकडं अमेरिकाने कोरियाच्या दक्षिण प्रांतावर झेंडा रोवला आणि कम्यूनिस्ट विरोधी नेते सीगमन री यांच्याकडं सत्ता सोपवली... त्यामुळे कोरियाचे दोन तुकडे झाले...उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया....
१५ ऑगस्ट १९४८...तनाव वाढत गेला...सीगमन री यांनी अखंड कोरियावर अधिकार सांगत सियोलमध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाची स्थापना केली..या घटनेला २५ दिवस उलटले नाही तोच किम संग यांनी प्यांगयांगमध्ये डेमोक्रेकिट पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाची घोषण करत संपूर्ण कोरियावर हक्क सांगितला.
२५ जून १९५०...सीगमन री यांच्या एक पाऊल पुढ जात किम संग यांनी चीन आणि सोव्हिएत युनियनच्या मदतीने दक्षिण कोरियावर हल्ला केला..आणि ख-या अर्थाने येथूनच युद्धाला सुरुवात झाली..अमेरिकेच्या सैन्यानेही त्याला चोख उत्तर दिलं..पुढे तीन वर्ष ते युद्ध चाललं...अनेक शहरं उध्वस्त झाली...लाखो नागरिक मृत्यूमुखी पडले...
२७ जुलै १९५३.... लाखो लोकांच्या बळी घेतल्यानंतर हुकूमशाहाच्या रक्ताची तहान शमली आणि युद्धबंदीची घोषणा करण्यात आली..पण दोन्ही देशातील तनाव मात्र जराही कमी झाला नाही..पुढच्या काही दशकांत दोन्ही देशातील परिस्थिती बरीच बदलली..
९०च्या दशक उजा़डलं तेव्हा पूर्व युरोप आणि सोव्हिएत युनियनमधून कम्यूनिस्ट सरकार अस्ताला गेलं...आणि .कम्यूनिस्टांची सत्ता असलेल्या देशांकडून उत्तर कोरियाला मिळणा-या मदतीचा ओघ थांबला... त्याचा परिणाम उत्तर कोरियावर झाला..
८ जुलै १९९४ ...किम संग यांच्या मृत्यूमुळे सगळा देश हादरुन गेला....पण किम संग यांनी आपला मुलगा किम जॉगच्या हाती सत्ता सोपवण्याची तयारी त्या आधिच करुन ठेवली होती..किम संगच्या मृत्यूनंतर किम जॉन्गने देशाची सूत्र हाती घेतली..किम जॉन्गने सत्ता हाती घेतल्यानंतर सैन्यावर विशेष लक्ष्य केंद्रीत केलं...अणुवस्त्र सज्जतेवर भर दिला..मात्र देशातील जनता अन्न अन्न करु लागली...
१७ डिसेंबर २०११ ...मध्ये किम जॉग इलच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा किम जॉन्ग उनने सत्ता हाती घेतली..राजा बदललला मात्र धोरण बदलली नाही...
आवघ्या जगाला ज्याने तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं त्याच्या विषयी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत..अमेरिके सारख्या बडाढ्य राष्ट्राला त्याने युद्धाची धमकी दिलीय..तसेच दक्षिण कोरियाला बेचीराख करण्याचा चंग त्याने बांधला आहे..
निरागस चेहरा...पण जगाला नष्ट करण्याची स्वप्न तो पहातोय..याच नाव आहे किम जॉन्ग उन...उत्तर कोरियाचा हा हुकूमशाह अवघ्या ३० वर्षाचा आहे...पण त्याच्या धमकीने अमेरिकेलाही चिंतेत टाकलंय...१९८४ साली जन्मलेल्या किम जॉन्गने आपला पिता किम जॉग इलच्या मृत्यूनंतर सत्ता हाती घेतली..विशेष म्हणजे पित्यामृत्यू पर्यंत त्याच्या नावाची कोणतीच चर्चा नव्हती...पण पित्याच्या मृत्यूनंतर १५ दिवसांनीच किम जॉन्गने उत्तर कोरियाची सूत्र हाती घेतली..किम जॉन्ग उन हा मॉर्निग स्टार किंग या नावाने ओळखला जातो..उत्तर कोरियाचे संस्थापक किम द्वितीय यांच्या चेह-याशी किम जॉन्गचा चेहरा मिळता जुळता असल्यामुळे त्याच्या हाती सत्ता सोपवल्याचं बोललं जातंय.. काहींच्या म्हणण्यानुसार किम जॉन्गने आपला चेहरा किम द्वितीय यांच्या प्रमाणे दिसावा म्हणून प्लॅस्टिक सर्जरी करुन घेतली आहे..आपल्या आजोबांप्रमाणे किम जॉन्गने आपली सगळं लक्ष्य अणुवस्त्र सज्जतेवर केंद्रीत केलं आहे..
युद्धाचे ढग जमा झाले आहेत..सगळं जग युद्ध टाळण्य़ासाठी प्रयत्न करत आहे...मात्र किम जॉन्गने अमेरिका आणि दक्षिण कोरियाला धडा शिकवण्याची धमकी दिली आहे...
First Published: Thursday, April 4, 2013, 23:57