उ.कोरियाः हुकूमशहाने काकाच्या कुटुंबाला संपवलं!

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 21:32

उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन यानं आपल्या जवळच्या नातेवाईकांची हत्या केल्याचं सांगण्यात येतंय. साऊथ कोरियन मीडियानं दिलेल्या बातम्यांनुसार, किमनं त्याचे काका जेंग-सोंग-थाएक यांच्या मुलांना, भावांना आणि नातवंडांनाही ठार मारलंय.

उत्तर कोरियन हुकूमशहाने काकाला मारले क्रूरपणे

Last Updated: Saturday, January 4, 2014, 16:35

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांने आपल्या सख्या काकांची क्रुरपणे हत्या केली. त्यांने १२० भुकेलेल्या कुत्र्यांच्या पिंजऱ्यात सोडून दिले. या कुत्र्यांनी त्यांचे लचके तोडून त्यांना मारले. या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तिसऱ्या महायुध्दाचे ढग

Last Updated: Thursday, April 4, 2013, 23:57

उत्तर कोरियाने युद्धाची तयारी सुरु केलीय....त्यांनी दक्षिण कोरिया तसेच अमेरिकेच्या दिशेनं आपली क्षेपणास्त्र तैनात केली आहेत..तसेच आपल्या रॉकेट युनिट्सला अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यास सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे..

अमेरिकेला प्रत्युत्तरासाठी उ. कोरियाचे रॉकेट सज्ज

Last Updated: Friday, March 29, 2013, 13:29

अमेरिकेची मुख्य भूमी तसेच दक्षिण कोरियाच्या सैन्य छावण्यांवर रॉकेट हल्ला करण्यासाठी तयारी करण्याचे आदेश उत्तर कोरियाचे नेता किम जोंग यांनी दिले आहे.

उत्तर कोरियाने घेतली अणुचाचणी

Last Updated: Tuesday, February 12, 2013, 13:08

उत्तर कोरियाने आज मंगळवारी तिसरी अण्वस्त्र चाचणी घेतली. पीगयाँग शहरापासून उत्तरेकडे आज सकाळी अण्वस्त्राची चाचणी घेण्यात आली.

भयंकर! पोटच्या गोळ्यालाच मारून भरलं पोट…

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 13:05

उत्तर कोरियात पडलेल्या दुष्काळानं आपल्याच पोटच्या गोळ्याला मारून खाण्याची वेळ नागरिकांवर आलीय. भूकेचा कहर या नागरिकांवर असा काही कोसळलाय की, कबरीमध्ये पुरलेल्या आपल्या नातेवाईकांचे मृतदेहही उकरून काढून या नागरिकांना खावे लागत आहेत.

उ. कोरियाने अण्वस्त्रे नष्ट करावीत - चीन

Last Updated: Thursday, April 19, 2012, 12:26

उत्तर कोरियाने आपली ताकद दाखविण्यासाठी रॉकेट प्रक्षेपण केरण्याचा प्रयत्न केला. मात्र , याची गंभीर दखल चीनने घेतली आहे. उत्तर कोरियाने आपल्याकडील अण्वस्त्रे नष्ट करावीत, असा सल्ला चीनने दिला आहे. त्यामुळे चीन आणि उ. कोरिया यांच्यातील संबंध बिघडण्यास होण्याची शक्यता आहे. चीनचा सल्ला उ. कोरिया किती मनावर घेईल, याबाबत शंका आहे.

उ.कोरियाचे रॉकेट प्रक्षेपण फसले

Last Updated: Friday, April 13, 2012, 14:06

उत्तर कोरियाने आपली ताकद दाखविण्यासाठी रॉकेट प्रक्षेपण केले खरे मात्र, काही कालावधीच ते कोसळले. या रॉकेटचे अवशेष समुद्रात सापडले आहेत. त्यामुळे उत्तर कोरियाची मोहीम फसली आहे. हे रॉकेट कोसळ्याची माहीती उ. कोरियाच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उत्तर कोरियाचे सत्ताधीश किम जाँग यांचे निधन

Last Updated: Monday, December 19, 2011, 12:25

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झालं. नॉर्थ कोरियावर असलेली पोलादी पकड आणि अणवस्त्र सज्ज होण्याच्या महत्वाकांक्षेने साऱ्या जगात सुरक्षेच्या बाबतीत चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं.