आफ्रिका दौऱ्यात कोणाची लागणार वर्णी, Who will dark horse for south Africa tour

आफ्रिका दौऱ्यात कोणाची लागणार वर्णी

आफ्रिका दौऱ्यात कोणाची लागणार वर्णी

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कॅरेबियन बेटं आणि झिम्बाब्वे दौरा गाजवल्यानंतर टीम इंडियातील सिनीअर प्लेअर्स विश्रांती घेत असले तरी... इंडिया ए टीममधील यंग चेहरे द.आफ्रिकेतील ट्रायंग्युलर सीरिज गाजवण्यास सज्ज झाले आहेत... गुरूवारी ऑस्ट्रेलिया `ए`टीमला आव्हान देण्याकरता पुजाराच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सरसावली आहे...

चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखालील इंडिया ए टीमसाठी द.आफ्रिकेतील ट्रायंग्युलर वन-डे सीरिज ही नोव्हेंबरमध्ये होणा-या प्रमुख सीरिजपूर्वीची ऑडिशन ठरणार आहे... या 16 सदस्यीय भारतीय ए टीमसमोर प्रथम आव्हान असणार आहे ते ऑस्ट्रेलिया ए टीमचे... द.आफ्रिका दौ-यावर गेलेल्या इंडिया ए टीममधील स्क्वॉडपैकी 10 सदस्य हे झिम्बाब्वेला व्हाईटवॉश देणा-या टीम इंडियात होते... त्यामुळे द.आफ्रिका दौ-यापूर्वी इंडिया ए स्क्वॉडची तयारी चांगलीच म्हणावी लागेल... तर या इंडिया ए स्क्वॉडमधील इतर 6 क्रिकेटर्सची नॅशनल क्रिकेट ऍकेडमीतील कॅम्पमधून निवड झाली आहे... इंडिया ए टीमची प्रमुख मदार असणार आहे ती कॅप्टन चेतेश्वर पुजारावर...

चेतेश्वर पुजारा
आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्या विशाल खेळींनं नवनवे किर्तिमान रचणा-या पुजाराला अनेक क्रिकेट तज्ञांनी राहुल द्रविडचा वारसदार म्हणून घोषित केलं आहे... आधी सौराष्ट्रकडून खेळताना डोमेस्टिक क्रिकेट गाजवणा-या पुजाराने नोव्हेंबर 2010साली टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं...मिळालेल्या पहिल्या संधीचं सोन्यात रूपांतर करत भारताला विजय मिळवून देण्यात पुजाराचा सिंहाचा वाटा होता... त्यानंतर झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुजाराचं कमबॅक दमदार राहिलं... वेस्ट इंडिजविरूद्ध इंडिया ए टीममधून फॉर्म आणि फिटनेस सिद्ध केल्यानंतर पुजाराची पुन्हा टीम इंडियाच्या टेस्ट स्क्वॉडमध्ये वर्णी लागली... आणि पुजाराने रन्सचा पाऊसच पाडला... त्याने 2012मध्ये दोन डबल सेंच्युरीसह चार सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरी झळकावताना 65.55च्या सरासरीने 1 हजार 180 रन्स तडकावून काढल्या होत्या...इंडिया ए टीमसह द.आफ्रिका दौरा भारताच्या नोव्हेंबर महिन्यातील दौ-याच्या पार्श्वभूमीवर त्या कंडिशन्सशी जुळवून घेण्यास पुजाराकरता महत्त्वाचा ठरणार आहे...

शिखर धवन
आतापर्यंत डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणा-या शिखरकरता इंग्लंडमध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरला कलाटणी देणारी ठरली... त्याआधी 2011मध्ये वन-डे पदार्पण करणा-या धवनकरता पहिली सीरिज तितकीशी लकी ठरली नाही... पदार्पणात खेळलेल्या 4 वन-डेत त्याला केवळ 65 रन्सच करता आल्या... मात्र त्यानंतर जुन 2013मध्ये पुन्हा संधी मिळालेल्या धवनने अशा काही गब्बर खेळी केल्या... की प्रतिस्पर्ध्यांना केवळ त्याच्या आठवणींनीच दरदरून घाम फुटायला लागला... 2013मध्ये धवनने 14 वन-डेत मॅच विनिंग 3 सेंच्युरीसह 54.38च्या सरासरीने 707 रन्स चोपून काढले... धवनच्या खात्यात आतापर्यंत केवळ एका टेस्टचीच नोंद आहे... मात्र त्याचं टेस्ट पदार्पण हे जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या कायम स्मरणात राहणारं ठरलं... त्याने पदार्पणातच फास्टेट टेस्ट सेंच्युरी झळकावण्याचा रेकॉर्ड करत ऑस्ट्रेलियाच्या तोंडचं पाणीच पळवलं होतं...

अजिंक्य रहाणे
परफॉर्मन्स देऊनही कमनशिबी ठरणा-या अजिंक्य रहाणेकरता इंडिया ए टीमचा द.आफ्रिकन दौरा टीम इंडियात कमबॅक करण्याकरता सुवर्णसंधी ठरू शकतो... 6 वर्ष मुंबईकडून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खो-याने रन्स केल्यानंतर अजिंक्यची 2011च्या इंग्लंड दौ-याकरता टीम इंडियात निवड झाली... तेव्हापासून अजिंक्य प्लेईंग इलेव्हनच्या आतबाहेर करत आहे... रहाणेच्या खात्यात 17 वन-डेत 454 रन्सची नोंद आहे... तर दुखापतग्रस्त शिखर धवनची रिप्लेसमेंट म्हणून अजिंक्यला भारताचं टेस्टमध्येही प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली...

सुरेश रैना
सुरेश रैना हा टीम इंडियाचा हुकूमाचा एक्का... आतापर्यंत वन-डे क्रिकेटमध्ये टीमकरता संकटमोचक ठरलेला रैना टेस्टमध्ये मात्र अपयशी ठरला... आतापर्यंत 174 वन-डेत भारताचं प्रतिनिधीत्व करणा-या रैनाला केवळ 17 टेस्टच खेळण्याची संधी मिळाली आहे... सुरेश रैनाचं टेस्ट पदार्पण धवनसारखंच विस्फोटक ठरलं... डेब्यु टेस्टमध्ये लंकेविरूद्ध रैनाने सेंच्युरी ठोकत सर्वांचंच लक्षं वेधलं... मात्र त्यानंतरच्या 16 टेस्टमध्ये त्याला केवळ 24.92च्या सरासरीने रन्स करता आल्या... त्यामुळे वन-डेत दमदार दिसणा-या रैनावर टेस्टमध्ये मात्र फ्लॉप ठरल्याचा शिक्का बसला आहे... त्यामुळे द.आफ्रिकेविरूद्ध इंडिया एचा दौरा हा रैनाकरता अग्निपरिक्षा घेणारा ठरेल...

अंबाती रायडू
आयपीएलमधील सेन्सेशनल क्रिकेटर अशी ओळख असणा-या रायडूने सिलेक्टर्सचं लक्षं वेधून घेतलं...आणि त्याची झिम्बाब्वे दौ-याकरता निवड झाली... पहिल्याच वन-डेत झिम्बाब्वेविरूद्ध नॉट आऊट 63 रन्सची खेळी करणारा रायडू भारताच्या विजयाचा हिरो ठरला... मात्र पुढील तीन वन-डेत त्याला आपल्या खेळाची छाप पाडण्यात अपयश आलं... आणि म्हणूनच रायडूही द.आफ्रिका दौ-यात पुन्हा बहारदार खेळी करण्यास सज्ज असेल...

रोहित शर्मा
रोहित शर्मा हा टीम इंडिया आणि सिलेक्टर्सकरता न सुटलेलं कोडं आहे... रोहित शर्मात टॅलेंट ठासून भरलेलं आहे... मात्र त्याच्या खेळात कंन्सिस्टन्सी अजिबात नाही... विराट, रैना, धवन, रहाणे यांसारखे क्रिकेटर्स त्याच्या मागाहून येऊन टेस्टही खेळले... मात्र तुलनेने सिनिअर असलेल्या रोहितला 102 वन-डेनंतरही टेस्ट खेळण्याचं भाग्य मात्र लाभलेलं नाही... नेहमी टीमच्या आतबाहेर राहणा-या रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीपाठोपाठ कॅरेबियन बेटांवर झालेल्या ट्रायंग्युलर सीरिजमध्ये ओपनिंगला येत धडाकेबाज खेळ केला... त्याने ओपनिंगला येऊन खेळलेल्या 14 वन-डेत 5 हाफ सेंच्युरीसह 493 रन्स केले... मात्र झिम्बाब्वेविरूद्ध तो पुन्हा फ्लॉप ठरला... त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात द.आफ्रिकेच्या दौ-यावर जाणा-या टीम इंडियात रोहितला टेस्टमध्ये स्थान पटकवायचं असल्यास... इंडिया ए दौ-यातही सातत्यपूर्ण खेळ करावा लागणार आहे...

मुरली विजय
तामिळनाडूचा ओपनिंग बॅट्समन असणा-या मुरलीने आपल्या पाच वर्षांच्या आंतरराष्ट्रिय करिअरमध्ये 16 टेस्ट खेळल्या आहेत... नोव्हेंबर महिन्यातील टीम इंडियाच्या द.आफ्रिका दौ-याकरता ओपनिंग बॅट्समन म्हणून सिलेक्टर्सची पहिली आवड आहे ती मुरली विजयची... त्याआधी भारताच्या दौ-यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाला 4-0 असा व्हाईटवॉश देण्यात प्रमुख भुमिका बजावली होती ती मुरली विजयनेच... मुरलीने या सीरिजमध्ये दोन सेंच्युरींसह 61.42च्या सरासरीने सर्वाधिक 430 रन्स चोपून काढले... त्यामुळेच इंडिया ए कडून खेळणा-या मुरली करता द.आफ्रिका दौरा तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार...

दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिकला कधीही टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्म्याटमध्ये आपली जागा पक्की करता आली नाही.. आणि त्याला कारण म्हणजे विकेटकीपर कॅप्टन धोनीचा धमाका... मॅचविनींग खेळी करणा-या धोनीमुळे कार्तिकला तितकीशी संधी मिळाली नाही... आयपीएलचा सहावा सीझन गाजवल्यानंतर त्याला इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीकरता टीम इंडियात संधी मिळाली होती... कार्तिकला सीनिअर टीम इंडियाच्या द.आफ्रिका दौ-यात स्थान पटकवायचं असल्यास... इंडिया ए टीममधून खो-याने रन्स करावे लागणार आहेत...

मोहम्मद शमी आणि जयदेव उनाडकत
झिम्बाब्वे दौ-यात मोहम्मद शमी आणि जयदेव उनाडकत यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करताना आपली छाप पाडली... डोमेस्टिक क्रिकेटमध्ये या दोन्ही बॉलर्सनी आपल्या वेगाच्या जोरावर विकेट्सचा पाऊस पाडला... आणि आपापल्या होम टिम्सना विजयी करण्यात मोलाची भुमिका बजावली...

परवेझ रसूल
आयपीएल सीझन सिक्स आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर परवेझ रसूलची झिम्बाब्वे दौ-याकरता टीम इंडियात निवड झाली होती... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणारा तो पहिलाच जम्मू काश्मिरचा क्रिकेटर ठरला... मात्र त्याला या दौ-यात एकही वन-डे खेळण्याची संधी मिळाली नाही... त्यामुळे इंडिया ए टीमच्या द.आफ्रिका दौ-यात त्याला आपल्या कामगिरीची छाप पाडण्याची संधी मिळेल...
एकूणच इंडिया ए स्क्वॉडवर नजर टाकल्यास द.आफ्रिकेत रंगणा-या या ट्राय सीरिजमध्ये भारतीय टीम विजयी धडाका कायम राखण्यास उत्सुक असतील... आणि टीममध्येही चढाओढ असेल ती टीम इंडियाच्या सिनिअर स्क्वॉडमध्ये जागा पटकावण्यासाठी..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 7, 2013, 19:38


comments powered by Disqus