Last Updated: Tuesday, October 1, 2013, 17:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईम्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमधले रहिवासी अक्षरशः नरकयातना भोगत होते. जिथं दहा मिनिटं उभं राहिलं तरी जीव गुदमरतो तिथं गेली अनेक वर्षं दोनशे कुटुंब कसेबसे दिवस काढत आहेत. झी मीडियानं हाच मुद्दा लावून धरला आणि अखेर इथल्या रहिवाशांना न्याय मिळाला. झी मीडियाच्या रिपोर्टनंतर सरकारला खडबडून जाग आली.
मुंबईतील म्हाडाच्या ट्रान्झिट कँपमध्ये गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून राहणा-या रहिवाशांना कायमस्वरुपी घर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी ही माहिती दिलीय. झी मीडियानं ट्रान्झिट कँपमध्ये वर्षानुवर्ष राहणा-या नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली होती. त्याची दखल घेत राज्य शासनानं ट्रान्झिट कॅम्पमध्ये खितपत पडलेल्या सुमारे 4 हजार कुटुंबांना दिलासा दिलाय.
ट्रान्झिट कँपमधल्या भाडेकरुंच्या मूळ अधिकारांवर कुठल्याही पद्धतीनं गदा येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. मात्र या रहिवाशांना आपल्या मूळ घराचा हक्क सोडावा लागणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 1, 2013, 17:44